पोहे ही महाराष्ट्रियन लोकप्रिय डिश आहे. पोहे प्रतेक प्रांतात निरनिराळ्या पद्धतीने बनवले जातात. आता तर पोहे चायनामध्ये सुद्धा बनवतात पण ते बनवताना चायनीज सॉस वापरुन बनवले जातात. तसेच त्यामध्ये भाज्या सुद्धा वापरल्या जातात. त्यामुळे अश्या प्रकारचे पोहे पौष्टिक बनतात. तसेच त्याची टेस्ट निराळी लागते त्यामुळे मुले आवडीने खातात.
The Marathi language Tasty Spicy Chinese Poha With Vegetables For kids in Marathi can of be seen on our YouTube Channel of Tasty Spicy Chinese Poha With Vegetables For kids
मुलांना नेहमी वेगवेगळ्या प्रकारच्या डिश टेस्ट करायला आवडतात. चायनीज पोहे ही सुद्धा निराळी चवीष्ट डिश आहे. चायनीज पोहे बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहेत.
आपण चायनीज पोहे नाश्तासाठी किंवा दुपारी चहा बरोबर सुद्धा सर्व्ह करू शकतो.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 2 जणसाठी
साहीत्य:
1 कप पोहे
1 टे स्पून तेल
1 छोटा कांदा (उभा पातळ चिरून)
1 हिरवी मिरची (चिरून)
3-4 लसूण पाकळ्या (बारीक चिरून)
¼ कप कोबी (उभा पातळ चिरून)
1 छोटीशी शिमला मिरची (चिरून)
2 फ्रेंच बिन्स (चिरून)
1 छोटे गाजर (चिरून)
1 टी स्पून सोया सॉस
1 टी स्पून चिली सॉस
1 टी स्पून टोमॅटो सॉस
¼ टी स्पून आजीनो मोटो
¼ टी स्पून मिरे पावडर
मीठ चवीने
कृती: प्रथम पोहे चाळणीमध्ये घेऊन त्यावर 2 मोठे ग्लास पाणी घालून मिक्स करून घ्या. मग 10 मिनिट तसेच बाजूला ठेवा. कोबी, शिमला मिरची, बिन्स भाज्या चिरून घ्या. कांदा उभा पातळ चिरून घ्या. हिरवी मिरची चिरून घ्या. लसूण चिरून घ्या.
एका मोठ्या आकाराच्या कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये चिरलेले लसूण व कांदा घालून 2 मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये चिरलेला कोबी, शिमला मिरची, गाजर, बिन्स घालून परतून घ्या. मग त्यामध्ये अजिनो मोटो व थोडेसे मीठ घालून मिक्स करून भिजवलेले पोहे घालून चिली सॉस, सोया सॉस, टोमॅटो सॉस, शेजवान सॉस, मिरे पावडर घालून मिक्स करून मंद विस्तवावर गरम करून घ्या. वरतून कांदा पात चिरून घाला.
गरम गरम चायनीज पोहे सर्व्ह करा.