श्रीखंड ही महाराष्ट्रियन लोकांची आवडती व लोकप्रिय डिश आहे. आता सर्व प्रांतात ती आवडीने बनवतात. आपण सणवार ह्या दिवशी किंवा पार्टीला किंवा लग्नाच्या मेनू मध्ये सुद्धा श्रीखंड बनवतो. महाराष्ट्रियन लोकांचा आवडता मेनू म्हणजे श्रीखंड पुरी होय.
गुडी पाडवा ह्या दिवशी महाराष्ट्रियन लोकांचे नवीन वर्ष चालू होते. तेव्हा प्रतेक घरासमोर गुडी उभारली जाते. तसेच तेव्हा उन्हाळा चालू होतो त्यामुळे आपण थंड गार श्रीखंड बनवतो. तसेच टे आंबटगोड लागते त्यामुळे छान टेस्टपण येते.
आपण श्रीखंड नेहमी मॅंगो, इलायची, ड्रायफ्रूट किंवा विविध फ्रूट घालून बनवतो. पण आज आपण गुडी पाडवा ह्या सणाच्या दिवशी तीन निराळ्या प्रकारे श्रीखंड बनवणार आहोत.
The Marathi language Maharashtrian Gudi Padwa Special Shrikhand in Marathi can of be seen on our YouTube Channel of Shrikhand Rajbhog, Chocolate and Paan shrikhand
गुडी पाडवा स्पेशल राजभोग श्रीखंड:
साहीत्य:
250 ग्राम चक्का
½ कप पिठीसाखर (टेस्ट नुसार)
½ टी स्पून वेलची पावडर
2 टे स्पून ड्रायफ्रूट
5-7 केसर काड्या
2 टे स्पून गरम दूध
अंगूरी रसगुल्ले
अंगूरी रसगुल्ले बनवण्यासाठी:
½ लिटर गाईचे दूध
1 टे स्पून लिंबुरस
3 टे स्पून साखर
कृती: गरम दुधामद्धे केसर भिजत ठेवा. प्रथम अंगूरी रसगुल्ले बनवून घ्या. त्यासाठी ½ लिटर गाईचे दूध गरम करून त्यामध्ये 1 टे स्पून लिंबुरस घालून दूध फाटलेकी एका मलमलच्या कापडावर मिश्रण ओतून त्यावर 2-3 ग्लास थंड पाणी घाला मग त्याची एक पोटली बांधून थोडा वेळ लटकवून ठेवा. पाणी पूर्ण निथळल्यावर छाना एका प्लेटमध्ये काढून मळून घेऊन त्याचे छोटे छोटे गोळे बनवा. एका मोठ्या आकाराच्या बाउलमध्ये 2-3 कप पाणी व साखर घेऊन गरम करायला ठेवा. मग त्यामध्ये बनवलेले गोळे घाला वरती झाकण ठेवून 7-8 मिनिट उकळू दया. मग विस्तव बंद करून थंड करायला ठेवा.
राजभोग श्रीखंड बनवण्यासाठी: चक्का चाळणीने चाळून घेऊन त्यामध्ये पिठीसाखर घालून मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये केसर दूध, वेलची पावडर व थोडेसे ड्रायफ्रूट घालून मिक्स करून घ्या. एका मोठ्या आकाराच्या बाउलमध्ये बनवलेले श्रीखंड व अंगूरी रसगुल्ले मिक्स करून त्यावर ड्रायफ्रूट घालून सजवा मग फ्रीजमध्ये थंड करून मगच सर्व्ह करा.
गुडी पाडवा स्पेशल चॉकलेट श्रीखंड:
साहीत्य:
250 ग्राम चक्का
½ कप पिठीसाखर (टेस्ट नुसार)
½ कप चॉकलेट सिरप
2 टे स्पून दूध
2 टे स्पून ड्रायफ्रूट
सजावटीसाठी: चॉकलेट तुकडे
कृती: प्रथम चक्का चाळणीने चाळून घ्या मग त्यामध्ये पिठीसाखर घालून मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये चॉकलेट सिरप, दूध, ड्रायफ्रूट घालून मिक्स करून घ्या. (जर चॉकलेट सिरप नसेल तर ड्रिंकिंग चॉकलेट किंवा डार्क चॉकलेट विरघळून त्यामध्ये फ्रेश क्रीम व थोडेसे दूध घालून मिक्स करून वापरू शकता)
चॉकलेट श्रीखंडवर ड्रायफ्रूटने सजवून थंड करून मग सर्व्ह करा.
गुडी पाडवा स्पेशल पान श्रीखंड:
साहीत्य:
250 ग्राम चक्का
½ कप पिठीसाखर (टेस्ट नुसार)
3 टे स्पून गुलकंद
1 टे स्पून बडीशेप
2 मोठ्या आकाराची विडयाची पान
1 टे स्पून बडीशेप गोळ्या
1 टे स्पून टुटी फ्रूटी
1 टे स्पून ड्रायफ्रूट
एक चिमूट हिरवा रंग
कृती: प्रथम चक्का चाळणीने चाळून घ्या मग त्यामध्ये पिठीसाखर घालून मिक्स करून घ्या. विडयाची पान बारीक चिरून घ्या. मिक्सरच्या भांड्यात चिरलेली विडयाची पान, बडीशेप, गुलकंद, 1 टे स्पून दूध घालून पेस्ट बनवून घ्या.
एका बाउलमध्ये बनवलेला चक्का, पेस्ट, घालून मिक्स करून घ्या. वरतून बडीशेप गोळ्या, टुटी फ्रूटी व ड्रायफ्रूट घालून सजवून थंड करून मग सर्व्ह करा.