शेजवान सॉस हा चायनीज सॉस असून मस्त टेस्टी लागतो. चायनीज डिश आता भरतात सुद्धा लोकप्रिय आहेत. शेजवान सॉस वापरुन आपण बरेच पदार्थ बनवू शकतो. तसेच आपण शेजवान सॉस वापरुन शेजवान फ्राईड राईस सुद्धा बनवू शकतो.
The Marathi language Tasty Spicy Schezwan Chicken Fried Rice in Marathi can of be seen on our YouTube Channel of Schezwan Chicken Fried Rice for kids
शेजवान चिकन फ्राईड राईस बनवताना आल-लसूण पेस्ट व शेजवान सॉस वापरला आहे त्यामुळे छान चमचमीत स्वादिष्ट लागतो. आपण राईस बनवताना चिकन व भाज्या वापरल्या तर तो पौस्टीक सुद्धा होईल. शेजवान चिकन फ्राईड राईस बनवायला अगदी सोपा व झटपट होणारा आहे. चिकन न वापरता सुद्धा भाज्या वापरुन बनवू शकतो. मुलांना शाळेत जाताना डब्यात द्यायला सुद्धा मस्त आहे.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहीत्य भात राईस बनवण्यासाठी:
2 कप बासमती तांदूळ
1 टी स्पून मीठ
10-12 मिरे
1 दालचीनी तुकडा
2 तमालपत्र
1 टी स्पून शहाजिरे
2 लवंग
2 हिरवे वेलदोडे
250 ग्राम बोनलेस चिकन
1 ½ टे स्पून तेल
1 टे स्पून आल=लसूण
1 मोठा कांदा (उभा पातळ चिरून)
1 टी स्पून मीठ
¼ टी स्पून आजीनोमोटो
1 टी स्पून व्हनिगर
4 टे स्पून शेजवान सॉस
1 अंडे (ऑम्लेटसाठी)
¼ कप कांदा पात (चिरून)
कृती: प्रथम तांदूळ धुवून अर्धातस बाजूला ठेवा. बोनलेस चिकन शीजवून घ्या. कांदा उभा पातळ चिरून घ्या. कांदा पात चिरून घ्या.
एका मोठ्या आकाराच्या पॅनमध्ये 4-5 कप पाणी घेऊन गरम करायला ठेवा. पाणी गरम झालेकी त्यामध्ये मीठ, लवंग, तमालपत्र, मिरे, शाहजिरे, वेलदोडे, दालचीनी घालून मग त्यामध्ये धुतलेले तांदूळ घालून 5 मिनिट भात शीजू द्या. भात 90% शिजला की विस्तव बंद करून पॅनवर झाकण ठेवून जास्तीचे पाणी काढून घ्या. मग भात पॅनमध्ये एकसारखा करून त्यावर झाकण ठेवा. पॅन परत मंद विस्तवावर ठेवून 4-5 मिनिट भात शीजू द्या. आता विस्तव बंद करून पॅन खाली उतरवून भात थंड करायला ठेवा.
दुसऱ्या एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये आल-लसूण पेस्ट घालून 1 मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये उभा चिरेलेला कांदा घालून गुलाबी रंगावर परतून घ्या. आता त्यामध्ये व्हनिगर, शेजवान सॉस घालून मिक्स करून शेजवलेला भात घालून मिक्स करून चांगला परतून घ्या. मग त्यामध्ये चिरलेली कांदा पात घालून मिक्स करून घ्या.
एक बाउलमध्ये अंडे फोडून त्यामध्ये चवीने मीठ व लाल मिरची पावडर घालून काटे चमचानि फेटून घ्या. एक पॅन वर थोडेसे तेल घालून त्यावर फेतलेले अंडे घालून पसरवून त्याचे ऑमलेट बनवून घ्या. ऑमलेटच्या उभ्या पातळ स्ट्रिपस कापून राईस वर घालून सजवा.
आता गरम गरम शेजवान चिकन फ्राईड राईस सर्व्ह करा.
How to make Schezwan Sauce at Home: Schezwan Sauce