हिंदू धर्म अनुसार अक्षय तृतीया ह्या दिवसाला खूप महत्व आहे. अक्षय तृतीया हा पूर्ण दिवस खूप शुभ मानला जातो. दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्ष तृतीया ह्या दिवशी अक्षय तृतीया हा दिवस असतो. धार्मिक शास्त्रानुसार अक्षय तृतीया ह्या दिवशी सर्व पापांचा नाश होऊन सर्वत्र सुख प्रदान करणारी तिथी मानली जाते.
The Marathi language Akshaya Tritiya 2021 Importance And Muhurat in Marathi can of be seen on our YouTube Channel of Akshaya Tritiya 2021 Importance And Muhurat
अक्षय ह्याचा अर्थ कधीही नष्ट होणार नाही. ह्या दिवशी सौभाग्य व चांगल्या फळांची प्राप्ती होते. ह्या दिवशी कोणते सुद्धा चांगले केलेले कार्य मनुष्य च्या जीवनात कधीही समाप्त होणार नाही असे चांगले फळ देतो. म्हणून म्हणतात की ह्या दिवशी दान धर्म केल्याने निश्चित चांगले फळ देतो. अक्षय तृतीया ह्या दिवशी विवाह करतात त्यामुळे जीवनभर चांगली साथ मिळते.
अक्षय तृतीया तिथि-
अक्षय तृतीया ह्या वर्षी 14 मे 2021 शुक्रवार ह्या दिवशी साजरी करायची आहे.
अक्षय तृतीया ह्या तिथीचे महत्व :
अक्षय तृतीया हा संपूर्ण दिवस शुभ मानला जातो. साडेतीन मुहूर्त पैकी एक मुहूर्त मानला जातो. ह्या दिवशी कोणते सुद्धा शुभ कार्य करण्यासाठी मुहूर्त पाहायची गरज नाही. कोणत्या सुद्धा वेळी आपण चांगले कार्य करू शकतो.
अक्षय तृतीया ह्या दिवशी भगवान विष्णु व माता लक्ष्मी ह्यांची पूजा केल्यामुळे विशेष फळ प्राप्त होते.
धार्मिक शास्त्र अनुसार अक्षय तृतीया ह्या दिवशी भगवान परशुराम ह्याचा जन्म झाला होता.
तसेच गणेशजिनि ह्या दिवशी भगवान व्यास यांच्या सोबत महाभारत लिहायला सुरवात केली होती. ह्या दिवशी गंगा स्नान व भगवान श्री कृष्ण हयाना चंदन लावणे शुभ मानले जाते.
अक्षय तृतीया ह्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून श्री भगवान विष्णु ह्याची विधी पूर्वक पूजा करून होम=हवन, जप व दान करावे. ह्या दिवशी पिंड न देता विधीपूर्वक ब्रह्मणांस भोजन द्यावे. दान देताना कलश, पंखा, खाट, फळ, साखर, ह्याचे दान करावे. छत्री दान करावी.
महिलांसाठी हा दिवस महत्व पूर्ण आहे. ह्या दिवशी चैत्र मास महिन्यात स्थापित चैत्र गौरीचे विसर्जन करतात. ह्या दिवशी महिला हळदी-कुकु करतात. ह्या दिवशी सौभाग्य वती महिलाना घरी बोलवून देवीचा दर्जा देवून पूजा करतात व त्याच्या पाया पडून त्यांना भेटवस्तु देतात.
अक्षय तृतीया ह्या दिवशी पितृ संबंधित कार्य करणे शुभ मानले जाते.
धार्मिक मान्यता अनुसार ह्या दिवशी दान- पुण्य करण्याचे अधिक महत्व आहे.
अक्षय तृतीया ह्या दिवशी सोने खरेदी करण्याची परंपरा आहे. असे म्हणतात की ह्या दिवशी सोने खरेदी केल्याने घरात सुख समृद्धी येते.
अक्षय तृतीया शुभ मुहूर्त :
अक्षय तृतीया तिथि प्रारंभ: 14 मे 2021 सकाळी 5 वाजून 38 मिनट पासून
अक्षय तृतीया तिथि समाप्त: 15 मे 2021 को सकाळी 7 वाजून 59 मिनट पर्यन्त
अक्षय तृतीया पूजा शुभ मुहूर्त:
सकाळी 5 वाजून 38 मिनट ते दुपारी 12 वाजून 18 मिनट पर्यन्त
म्हणजेच : 06 तास 40 मिनट