गरमी म्हणजेच उन्हाळा ह्या सीझनमध्ये आपण स्कीन म्हणजेच त्वचाची काळजी घेतली पाहिजे गरमी पासून आपण आपल्या स्कीनचा बचाव करायचा असेल तर चंदन हा एक चांगला उपाय आहे. चंदन हे आयुर्वेदमध्ये एक चांगले ब्यूटी इंग्रीडीयंट्स आहे जे आपण अगदी भरवसा ठेवून वापरू शकतो.
The Marathi Sandalwood Powder Benefits for Skin for in Marathi can of be seen on our YouTube Channel of Chandan Powder Benefits For Skin
चंदन हे एक सुगंधीत लाकूड आहे. ज्याचा उपयोग आयुर्वेदमध्ये बऱ्याच उपचारासाठी केला जातो. चंदनमध्ये बरेच औषधी गुण आहेत ज्याचा उपयोग स्कीनच्या तक्रारीसाठी केला जातो. म्हणजेच स्कीन वरील पिंपल्स, स्कीन टैन पासून स्कीन वरील सुरकुत्या ह्यावर फायदेमंद आहे. चंदनमध्ये एंटीसेप्टिक गुण आहेत त्याचा उपयोग जखम बरी करण्यासाठी सुद्धा करू शकता. चंदन पावडर वापरुन आपण आपली स्कीन मऊ म्हणजेच सॉफ्ट व चमकदार बनवू शकतो. त्याच बरोबर स्कीनशी जुळलेल्या समस्या सुद्धा दूर करू शकता.
खरम्हणजे आपली बिझी लाईफ स्टाईल त्यामुळे येणारे पिंपल्स, डार्क सर्कल सारखे स्कीन प्रॉब्लेम होतात. सूर्याच्या तेजस्वी किरणापासून आपण बचाव केला पाहिजे. त्यासाठी चंदन एक चांगला उपाय आहे. आज आपण आपली स्कीन चंदन वापरुन कशी चमकदार बनवू शकतो ते पाहूया.
1. ऑयली स्कीन म्हणजेच तेलकट स्कीन पासून बचाव:
जर आपली स्कीन ऑईली आहे तर आजिबात घाबरू नका. त्यासाठी चंदन पावडर मध्ये गुलाबपाणी मिक्स करून त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावा थोडावेळ तसेच ठेवा मग थंड पाण्यानी चेहरा स्वच्छ धुवावा असे केल्याने ऑईली स्कीन पासून आपल्याला झुटकारा मिळू शकेल.
2. डार्क सर्कल पासून आराम मिळेल:
गरमीच्या सीझनमध्ये डार्क सर्कलच्या बऱ्याच समस्या होतात. त्याचे कारण झोप नीट नहोणे, तसेच सारखे चिंतित राहणे. जर आपण डार्क सर्कलच्या समस्यामुळे परेशान आहात तर 1 टे स्पून चंदन पावडर व नारळाचे तेल मिक्स करून त्याची पेस्ट बनवून डोळ्या खालील सर्कलवर लावून थोडे मालीश करा. असे रोज केले तर डार्क सर्कल च्या समस्या पासून आपल्याला आराम मिळू शकेल.
3. आपल्या स्कीनला सनटैन और सनबर्न होण्या पासून वाचवू शकतो:
गरमीच्या सीझनमध्ये घराबाहेर पडल्यावर आपली स्कीन सनटैन और सनबर्न च्या समस्या होण ही एक बाब आहे. परंतु चांदनचा फेस पॅक लावण्यामुळे ह्या समस्या दूर होतात. त्यासाठी आपल्याला एक चमचा काकडीचा रस, एक चमचा दही, एक चमचा मध, 2-3 लिंबुरसचे थेंब व एक चमचा चंदन पावडर मिक्स करून त्याचे पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावून थोडा वेळ तसेच ठेवावे मग थंड पाण्यानी चेहरा धुवावा. त्यामुळे आपल्या चेहऱ्या वरील डार्क स्पॉट, सनटैन व सनबर्नच्या समस्या दूर होतील.
4. सॉफ्ट स्कीन साठी:
प्रतेक व्यक्तीला वाटते की आपली स्कीन सॉफ्ट, चमकदार असावी. पण धूळ, माती व प्रदूषण ह्यामुळे ते तसे होऊ शकत नाही. जर तुम्ही सुद्धा अश्या समस्या पासून परेशान असाल तर चंदनच्या तेलाने चेहऱ्यावर मसाज करून रात्रभर चेहरा तसाच ठेवावा मग सकाळी उठल्यावर कोमट पाण्यानी चेहरा धुवावा.
वरील माहिती फक्त आपल्याला माहिती देण्याच्या उदेशाने दिली आहे जर आपल्याला स्कीनच्या समस्या असतील तर डॉक्टरी सल्ला घ्यावा.
Very nice details