प्रतेक घरामध्ये सुगंधित दालचीनी असतेच. दालचीनीचा उपयोग जेवणातील स्वाद वाढवण्यासाठी केला जातो. दालचीनीचा उपयोग फक्त स्वयंपाक करताना केला जात नसून बऱ्याच प्रकारची औषधे बनवण्यासाठी केला जातो. आयुर्वेद व पारंपारिक औषधे बनवण्यासाठी दालचीनीचा उपयोग केला जातो.
The Marathi Cinnamon Dalchini Benefits And Side effects in Marathi can of be seen on our YouTube Channel of Dalchini Benefits And Side effects
एलोपेथी औषधे बनवण्यासाठी सुद्धा दालचीनीचा उपयोग केला जातो. वैद्यनिकांच्या मते लवंगच्या नंतर दालचीनी एंटीऑक्सिडेन्ट आहे. पूर्वीच्या काळा पासून दालचीनीचा उपयोग मसाला बनवताना केला जातो. रोममद्धे दालचीनीचा उपयोग मृत शरीरातून येणाऱ्या दुर्गधी साठी केला जातो तेथे तर दालचीनी खूप महाग असेली तरी ती अश्या प्रकारे वापरली जाते.
दालचीनी फायदे:
आयुर्वेद नुसार दालचीनीचे फायदे अनेक आहेत. दालचीनी फक्त मधुमेह, पचनक्रिया संबंधीत तक्रारी, कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशर, मानसिक स्वाथ ठीक करण्यासाठी उपयोगी आहे. त्याच बरोबर मासिक पाळीच्या समस्या सुद्धा कमी होतात. चला तर मग आपण पाहू या दालचीनीचे फायदे, नुकसान काय आहेत.
दालचीनी मधुमेह नियंत्रणात ठेवते:
मधुमेह असणाऱ्याना दालचीनी एक वरदानच आहे. कारणकी मधुमेह असणाऱ्याना दालचीनी सेवनाचा खूप फायदा होतो टे स्वस्थ व दैनदीन जीवन चांगल्या प्रकारे जाण्यास मदत करते. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते. त्यासाठी आपल्याला आपल्या रोजच्या आहारात दालचीनीचे सेवन करावे लागेल. आपल्याला दालचीनी पावडर बनवून सकाळी व संध्याकाळी आपल्या नाश्तावर किंवा चहामध्ये एक चिमूट दालचीनी पावडर टाकून त्याचे सेवन करायचे आहे. किंवा दुधामद्धे सुद्धा मिक्स करून घेवू शकता.
दालचीनीचा चहा वाढवते आपल्या दिमागची क्षमता:
दालचीनीच्या सेवनाने आपली मानसिक क्षमता वाढते. त्याच्या वासानीसुद्धा आपले दिमाग एकदम काम करायला लागते. दालचीनीच्या सेवनाने ध्यान, स्मरण शक्ति वाढते. दालचीनीच्या एंटीऑक्सिडेन्ट च्या गुणधर्मामुळे पार्किंसन व अल्जाइमर सारख्या विकारांना वाढण्या पासून थांबवण्यास मदत होते.
ज्याना परीक्षाचे टेंशन वाटते त्यांनी दालचीनी पावडर घालून चहा सेवन करावा त्यामुळे मन प्रफुलीत होऊन आपले कार्य पूर्ण होईल.
दालचीनी हृदय रोगापासून बचाव करते:
दालचीनी मधील एंटीइंपलेमेटरी गुणांमुळे हृदय त्याच्या आसपासच्या रक्त वाहिन्याना नुकसान होण्यापासून बचाव होतो. आजकाल लोक फास्ट फूड सेवन जास्त करतात त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढून हृदयरोग वाढण्यास मदत होते.
दालचीनीचे औषधी गुण कॅन्सरपासून बचाव करते:
दालचीनीच्या सेवनाने कॅन्सरच्या पेशी तयार होण्यापासून बचाव होतो. जर आपण नियमित दालचीनीचे सेवन केले तर कॅन्सर होण्यापासून आपण थांबवू शकतो. दालचीनी ल्युकेमिया च्या पेशी वाढण्यापासून थांबू शकते.
दालचीनी कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवते:
दालचीनी मधील विशेष तत्व कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी करण्यास मदत करते. LDL म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी करून HDL म्हणेच चांगले कोलेस्ट्रॉलचा स्तर नियंत्रणात ठेवते. व हृदय रोगापासून दूर ठेवते. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवायचे असेल तर दररोज एकदा तरी दालचीनी पावडर चहा किंवा कॉफी किंवा जेवणात सेवन करा.
दालचीनीचे तोटे:
दालचीनी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह असली तरी त्याचे प्रमाणा बाहेर सेवन केले तर त्याचे तोटे सुद्धा होतात. ज्या स्त्रीया गरोदर आहेत व स्तनपान करीत आहेत त्यांनी दालचीनीचे नियमित सेवन करू नये.
दालचीनीचे सेवन प्रमाणा पेक्षा जास्त केले तर लिव्हरला नुकसान होऊ शकते. तसेच गर्भाशय सुद्धा छोटे होऊ शकते. काही जणांना दालचीनी एलर्जी सुद्धा असू शकते.