सदाफुली सदाबहार फूल म्हणजे औषधांचा भंडार तिच्या पाकळ्यामध्ये आजारांवर इलाज
आपल्याला सदाफुली हे झाड माहीत असेलच ह्या झाडाला रोज फुले येतात म्हणूनच त्याला सदाफुली असे म्हणतात. ते दिसायला आकर्षक दिसते तसेच त्याचे औषधी गुणधर्म सुद्धा बरेच आहेत.
The Marathi language Health Benefits of Evergreen Flower Sadafuli or Sadabahar in Marathi can of be seen on our YouTube Channel of Sadabahar Sadafuli Health Benefits
1. सदाफुली ह्या फुलामद्धे एलकालॉइड्स, एजमेलिसिन, सरपेटिनन नावाचे तत्व आहे ते आपल्या शरीरासाठी फायदेमंद आहे. जर रोज सदाफुलीच्या पाकळ्या वाटून त्याचा रस रोज सेवन केल्याने डायबीटीज दूर होण्यास मदत होते.
2.सदाफुलीमध्ये रेसपीन, विनक्रिस्टीन व विनबलासटीनचे क्षार आहेत त्यामुळे शरीरातील टॉकसीन काढून टाकण्यास मदत होते.
3.सदाफुलीच्या पाकळ्यांचा रस नाक व गळ्यातील इन्फेक्शन दूर करण्यास मदत होते कारण की त्यामध्ये विंडोलिन नावाचे तत्व आहे.
4.सदाफुलीच्या पाकळ्यांचा रस दिमागचे काही रोग असतील तर दूर करण्यास मदत करते. त्यामधील पोषक तत्व अनिद्रा, वेडेपणा व एनजायएटी ह्या रोगापासून बचाव करते. जर कोणाला टेंशनमुळे झोप येत नसेल व डोके जड झाले असेल एक चमचा रस काढून मधा बरोबर घ्या.
5. सदाफुलीच्या पाकळ्यांचा रस मांसपेशिया ना ठीक करतो. तसेच महिलांच्या पिरीयडसमध्ये अनियमितता असेल तर नियमित होते. तसेच त्यामुळे शरीरातील रोग प्रतिकार शक्ति वाढून शरीर स्ट्रॉंग बनते.
6. कॅन्सर सारखा रोग वाढला की मगच तो समजतो. तेव्हा ऑपरेशन हा एकच इलाज राहतो. आयुर्वेदमध्ये पांढऱ्या रंगाच्या सदाफुली मध्ये कॅन्सर वर इलाज आहे. असे म्हणतात.
7. सदाफुलीच्या पाकळ्यांचा रस आपल्या त्वचेवरील डाग धब्बे दूर करून त्वचेची छिद्र मोकळी करून अधिकचे तेल निघून तसेच घाण निघून जाण्यास मदत करते.
8. कॅन्सर ह्या रोगावर सदाफुली फायदेमंद:
सदाफुलीच्या पाकळ्या कॅन्सर विरोधी आहेत. ते कॅन्सर रोग वाढण्या पासून बचाव करतो तसेच आपले आरोग्य चांगले ठेवण्यास मदत होते. जर कॅन्सरच्या पहिल्या स्टेजला सदाफुलीच्या पाकळ्याचा रस दिला तर हा रोग वाढण्या पासून बचाव होतो. व समजा कॅन्सर शेवटच्या स्टेजमध्ये असेल तर सदाफुलीच्या पाकळ्याचा रस दिल्याने रोग प्रतिकार शक्ति वाढून जीवित हानी होत नाही.
9. डायबीटीज असणाऱ्या व्यक्तिमध्ये एंटीडायबीटीकचे काम करते. ते रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. ह्याच्या पानाचा रस सुधरूड लोक सुद्धा करू शकतात. त्यामुळे रोग प्रतिकार शक्ति वाढते. तसेच ज्याना हृदय रोग आहे किंवा हाय बीपी आहे असे लोक सुद्धा करू शकतात.
सदाफुलीच्या पाकळ्यांचा कसा उपयोग करावा:
सदाफुलीच्या पाकळ्यांचे चूर्ण बनवून 1/2 चमचा नाश्ता झाला की पाण्या सोबत घ्यावे. किंवा त्याचा रस बनवून सुद्धा सेवन करू शकता. रस काढताना रोज 5 ताजी पान घेऊन त्याचा रस काढून गाळून जेवण झाल्यावर सेवन करावा.
टीप: सदाफुलीच्या पाकळ्यांचा रस कडवट असतो त्यामुळे रिकाम्या पोटी सेवन केला तर उलटी होऊ शकते. म्हणूनच काही खवून मगच करावा. लहान मुलांना हा रस देताना साखर मिक्स करून द्यावा.