आंबा मॅंगो फळांचा राजा हे आपल्याला माहिती आहेच. पण आपल्याला फक्त सीझनमध्येच आंबा चाखायला मिळतो. ते पण फक्त एप्रिल मे मध्ये मिळतो. जर आपण आंबा वर्षभर टिकवून ठेवला तर आपल्याला पाहिजे तेव्हा आंब्याचा रस वापरुन पदार्थ बनवता येतील.
The Marathi How to store mangoes for long time in Marathi can of be seen on our YouTube Channel of How to Preserve ripe mangoes for long time without preservations
आपण घरच्या घरी आंब्याचा रस वर्षभरासाठी साठवून ठेवू शकतो ते पण काही प्रीझरवेटीव्ह न वापरता. तसेच विस्तवावर न शिजवता म्हणजेच अगदी नैसर्गिक पद्धतीने.
आंब्याचा रस साठून ठेवताना एक खबरदारी घ्यायची ती म्हणजे फक्त प्लॅस्टिक हवाबंद डब्यात किंवा काचेच्या बरणीत किंवा झाकण असलेल्या काचेच्या बाउलमध्ये साठून ठेवायचा आहे स्टीलच्या किंवा कोणत्याही धातूच्या डब्यात आंब्याचा रस साठून ठेवायचा नाही नाहीतर त्याचा रंग काळपट होतो व त्याची चव सुद्धा बदलते.
आपण दोन पद्धतीने आंबा कसा साठवायचा ते पहाणार आहोत.
पहिली पद्धत:
पहिल्या पद्धतीने आपण प्रथम आंबे स्वच्छ धुवून, पुसून घ्यावे. मग देठा कडचा भाग सुरीने कापून हळुवारपणे आंब्याची साल काढावी. मग हातानी त्याचा रस एका भाड्यात काढावा. अश्या प्रकारे सर्व आंब्याचा रस भाड्यात काढून बोटांनीच रसातिल गठुळया मोडून एक सारखा रस करून घ्यावा. मग छोटे हवाबंद डबे घेऊन त्यामध्ये थोडीशी साखर घालावी मग त्यावर आंब्याच्या रस ओतून वरतून परत थोडीशी साखर घालून डब्याचे झाकण घट्ट बंद करावे. (लहान डब्बे घेतले तर आपल्याला पाहिजे तेव्हडा रस वापरता येतो.) सर्व डब्यात रस भरून झाला की डब्बे फ्रीजर मध्ये ठेवावे. मग पाहिजे तेव्हा आंब्याचा रसाचा डब्बा काढून एक तास बाजूला ठेवून मग रस वापरावा.
दुसरी पद्धत:
प्रथम आंबे स्वच्छ धुवून पुसून कोरडे करावे. मग त्याची साल काढून त्याचे मध्यम आकाराचे तुकडे किंवा फोडी करून घ्या. मग झिपलॉक् बॅग मध्ये त्या फोडी भरून पिशवीतील हवा हळुवारपणे दाबून काढून झिप लावून फ्रीजरमध्ये ठेवून मग पाहिजे तेव्हा काढून वापरू शकता.