आपण फळांची किंवा फळ भाज्या ह्यांची साल कचरा समजून फेकून देतो पण त्याचे अगदी आश्चर्यकारक फायदे जाणून घेतले तर तुम्ही कधीसुद्धा साल फेकून देणार नाहीत. खर म्हणजे रोजच्या जीवनात त्याच्या वापराने बऱ्याच परेशानी दूर होऊ शकतात.
The Marathi Mango Peel Benefits For Skin And Plants can of be seen on our YouTube Channel of Mango Peel Uses for Skin And Plants
उन्हाळा चालू झाला की बाजारात आंबे दिसायला लागतात. सगळ्या फळांमद्धे आंबा ही फळ खूप रसदार, गोड, स्वादिष्ट व मधुर आहे. तसेच आंबा हा फळांचा राजा सुद्धा आहे. आपण आंबा सेवन केल्यावर त्याची साल बेकार समजून फेकून देतो. आपण जाणता का आंबा उष्ण कटिबंधातील फळ आहे त्याची साल हेल्दी व पौष्टिक गुणांनी भरलेली आहेत. त्यामुळे त्याच्या हेल्दी व ब्युटी च्या समस्यासाठी आपल्या रोजच्या जीवनात वापरुन समस्या दूर करू शकतो. चला तर आपण पाहू या की आपण आंब्याच्या सालाचे काय गुणधर्म आहेत.
आंब्याच्या सालीचे गुणधर्म:
एंटीऑक्सीडेंटचे प्रमाण भरपूर:
आंब्यामद्धे व त्याच्या सालीमद्धे एंटीऑक्सीडेंटचे प्रमाण भरपूर आहे. एंटीऑक्सीडेंट फ्री रेडिकल्स पासून होणारे नुकसान कमी करण्यास मदत करते. ज्याच्यामध्ये त्वचा, डोळे व हृदय सामील आहे.
चेहऱ्यावरील सुरकुत्या:
आंब्याच्या सालीमद्धे कायाकल्पचे गुण आहेत. ते आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या तयार होण्यास कमी करण्याचे काम करते. खर म्हणजे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे त्याला कोणी थांबवू शकत नाही पण आंब्याच्या सालीचा वापर करून त्याला काही काळासाठी थांबवू शकतो. फ्री रेडिकल्स वायु प्रदूषण, टेंशनच्या मुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडण्यास कारणीभूत आहे. त्याच बरोबर चेहऱ्या वरील काळे डाग कमी करण्यास मदत करते. आंब्याच्या सालीची पेस्ट करून तिचा लेप चेहऱ्यावर लाऊन 15 मिनिट ठेवून पाण्यानी धुवावा. आपण आंब्याची साल उन्हात सुकवून त्याची पेस्ट सुद्धा बनवू शकता.
चेहऱ्यावरील मूहासे दूर करते:
आंब्याच्या सालीचा उपयोग चेहऱ्यावरील मूहासे दूर करण्यास उपयोगी आहे. तरुण वयात ह्या समस्या प्रतेक मुला-मुलींना होतात. काही वेळेस आनुवंशिकते मुळे सुद्धा मूहासे येतात. आंब्याच्या सालीच उपयोग मूहासे घालवण्यासाठी सुद्धा केला जातो.
टैनिंग दूर करण्यास फायदेमंद:
आंब्याच्या सालीची पेस्ट करून चेहरा, हात व पायावर मालीश करा. त्यातील विटामीन ‘C’टैनिंग दूर करण्याचे काम करतो. आंब्याच्या सालीची पेस्ट लावल्यावर दही किंवा मलईने मसाज करून स्वच्छ पाण्यानि धुवा.
बागेतील झाडांसाठी चांगले खत:
आंबा मध्ये विटामीन A, B 6 च्या बरोबर फायबर, कॉपर, फोलेटचे प्रमाण भरपूर आहे. आपण आंब्याची साल बेकार समजून फेकून देतो. पण त्यामध्ये विटामीन ‘C’, E, पॉलीफेनोल, कैरोटीनॉयड व झाडांसाठी उपयुक्त फायबर आहे. त्यामुळे आंब्याच्या सालींचा वापर खत म्हणून करू शकता.
आंबा सेवन केल्यावर त्याच्या सालीचे छोटे छोटे तुकडे करून हवाबंद डब्यात भरून त्यामध्ये थोडे पानी घालून डब्याचे झाकण घट्ट बंद करून 24 तास तसेच ठेवावे. दुसऱ्या दिवशी झाकण काढून मिक्स करून परत डब्बा बंद करावा. मग तिसऱ्या दिवशी मिश्रण गाळून त्यामध्ये पाणी मिक्स करून पातळ झाडांना टाका त्यामुळे झाडे चांगली होतील. असे सीझनमध्ये आठोडयातून 2-3 वेळा करा.