Mango Suji (Sooji, Semolina) Cake Without Oven, Maida, Curd And Egg In Marathi
आपण आता पर्यन्त केकचे अनेक प्रकार बघितले. आता आपण रवा वापरुन आंब्याचा केक कसा बनवायचा ते पहाणार आहोत. मॅंगो सुजी केक बनवताना आपण मैदा, दही किंवा अंडे वापरले नाही तसेच ओव्हन सुद्धा वापरला नाही. अगदी सोप्या पद्धतीने पॅनमध्ये केक बनवला आहे.
The Marathi Mango Semolina Cake in Marathi can of be seen on our YouTube Channel of Mango Suji (Sooji) Cake Without Oven, Maida, Curd And Egg
मॅंगो सुजी केक चवीला अप्रतिम लागतो. आपण स्वीट डिश म्हणून किंवा डेझर्ट म्हणून सुद्धा मॅंगो सुजी केक बनवू शकतो. रवा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे.
मॅंगो सुजी केक मुले व मोठी माणसे सुद्धा अगदी आवडीने खातील बनवून पहा नक्की आवडेल.
बनवण्यासाठी वेळ: 15 मिनिट
बेकिंग वेळ: 40 मिनिट
वाढणी: 4 जाणसाठी
साहीत्य:
1 मोठा हापूस आंबा (रस काढून)
1 ½ कप रवा
½ कप साखर
½ कप दूध
½ कप तेल
1 ½ टी स्पून बेकिंग पावडर
ड्रायफ्रूट सजावटीसाठी
कृती:
प्रथम आंबा स्वच्छ धुवून त्याचा रस काढून घ्या. जूसरच्या भांड्यात आंब्याचा रस व साखर घेऊन ग्राइंड करून घ्या. रवा मिक्सरच्या भांड्यात थोडा बारीक करून घ्या.
एका मोठ्या आकाराच्या भांड्यात मिक्सरमधून काढलेला आंब्याचा रस, व रवा मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये दूध व तेल घालून मिक्स करून बाऊलवर झाकण ठेवून 30 मिनिट बाजूला ठेवा.
नॉनस्टिक पॅन गरम करायला ठेवा. त्यामध्ये एक स्टँड ठेवा. केकच्या भांड्याला तेलाचा हात लावून त्यावर गव्हाचे पीठ शिंपडून भांडे बाजूला ठेवा.
रव्याच्या मिश्रणावरील झाकण काढून बघा. रवा चांगला फुलून आला असेल. जर मिश्रण जास्त घट्ट वाटले तर थोडेसे दूध घालून परत मिश्रण हलवून घ्या. मग त्यामध्ये बेकिंग पावडर घालून मिक्स करून घ्या.
केकच्या भांड्यात मिश्रण घालून त्यावर ड्रायफ्रूटने सजवून भांडे पॅन मध्ये ठेवा. पॅनचे झाकण लावून विस्तव मंद ठेवून 40 मिनिट केक बेक करायला ठेवा. 40 मिनिट झालेकी झाकण काढून केक सुरीने चेक करून पहा सुरीला मिश्रण चिटकले नसेलतर विस्तव बंद करून पाच मिनिट भांडे तसेच ठेवा. मग झाकण काढून केकचे भांडे बाहेर काढून केक थंड करायला ठेवा.
मॅंगो-सुजी केक म्हणजेच आंबा-रव्याच्या केक थंड झाल्यावर कापून सर्व्ह करा.