काही वर्षा पूर्वी महिला मुलतानी मातीचा उपयोग आपले सौदर्य वाढवण्यासाठी करत. मग रेडिमेड पॅक आल्यामुळे मुलतानी मातीचे महत्व कमी झाले.
मुलतानी माती हे एक नॅच्युरल ब्युटी मटेरियल आहे. त्याच्या वापरण्यामुळे काही सुद्धा साईड इफेक्ट होत नाहीत. आपण सुद्धा आपली त्वचा उजळ करण्यासाठी व त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी करू शकता. आपण पाहू या मुलतानी माती वापरण्याचे फायदे काय आहेत.
The Marathi Multani Mati Benefits in Marathi can of be seen on our YouTube Channel of Multani Mati Benefits For Skin And Hair
पूर्वी महिला मुलतानी मातीचा वापर बऱ्याच प्रमाणात करत. मग कालांतराने ब्युटि प्रॉडक्ट आले मग मुलतानी मातीचा वापर कमी झाला. पण रेडिमेड ब्युटि प्रॉडक्ट वापरुन त्याचे खूप साईड इफेक्ट व्हायला लागले. मग आता परत मुलतानी मातीचे महत्व वाढले आहे कारण की त्याचे काही सुद्धा साईड इफेक्ट होत नाहीत मुलतानी माती मध्ये फक्त चेहराच चमदार होत नाही तर आपल्या शरीराची पूर्ण त्वचा चमकदार होऊ शकते. असे नॅच्युरल गुण त्यामध्ये आहेत. गरमीच्या सीझनमध्ये सुद्धा आपण मुलतानी माती वापरुन आपला चेहरा, स्कीन, आपले सौदऱ्य वाढण्यासाठी वापरू शकता. पण मुलतानी माती वापरण्याची योग्य पद्धत आवलंबली पाहिजे.
आपली त्वचा बनवते चमकदार:
आपण रोज साबण वापरतो त्यामुळे आपली त्वचा कोरडी व बेजान बनते. मुलतानी मातीमध्ये चंदन पावडर व गुलाबपाणी वापरुन त्याची पेस्ट बनवून आंघोळ करण्यापूर्वी अर्धा तास लावली असे आठोडयातून 2-3 वेळा करावे थोड्याच दिवसांत आपली स्कीन चमकार व ताजी तवानी होईल.
डेड स्कीन सुद्धा निघून जाते:
आपण अंघोळीच्या वेळेस आपल्या पूर्ण शरीराला साबण लावण्याच्या आयवजी मुलतानी माती लावली तर कोरडी बेजान त्वचा चांगली बनते. त्याच बरोबर डेड झालेली त्वचा निघून जाण्यास मदत होते. त्याच बरोबर त्वचेची छिद्र उघडून आपल्या त्वचेला ऑक्सिजन मिळून आपली त्वचा चमकदार बनते व कोणते सुद्धा इन्फेक्शन होत नाही.
सुरकुत्या कमी होतात:
वयोमाना नुसार स्कीन लुज होते व सुरकुत्या येतात त्यासाठी मुलतानी माती उपयोगी आहे. त्यामुळे वाढत्या वयातील सुरकुत्या येत नाहीत. असे होऊ नये म्हणून रोज मुलतानी मातीचा वापर केला तरी चालेल.
घामोळ्या पासून छुटकारा:
गरमीच्या सीझनमध्ये घामोळ्या येणे हे स्वाभाविक आहे. तसेच ही समस्या अगदी कॉमन आहे. ह्यावर सुद्धा मुलतानी माती फायदेमंद आहे. त्यासाठी मुलतानी मातीमध्ये कडूलिंबची पान पेस्ट करून मिक्स करा व त्याचा लेप जेथे जेथे घामोळ्या आल्या आहेत तेथे लावा त्यामुळे अगदी तुरंत आराम मिळेल. व काळे डाग सुद्धा पडणार नाहीत.
केसांसाठी उपयोगी:
मुलतानी माती चेहऱ्या बरोबरच केसांसाठी सुद्धा उपयुक्त आहे. मुलतानी माती ताकामद्धे भिजवून केसांवर लावली तर केसांमधील कोंडा निघून जाईल व केस गळणे सुद्धा थांबेल.