आपल्या आईच्या जेवणात जो स्वाद असतो तो स्वाद दुसऱ्या कोणत्यापान जेवणात येत नाही असे सर्वजण पूर्वीपासून म्हणतात. पण असे का म्हणतात ह्याचा विचार आपण कधी केला का? खण्याचे नाव घेताच आपल्या तोंडाला पाणी सुटते. स्वयंपाक करणे ही महिलाना खूप आवडते व त्यांना तो करताना आनंद सुद्धा मिळतो. पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला जरासुद्धा वेळ मिळत नाही स्वयंपाक करताना छोट्या छोट्या बेसिक टिप्स लक्षात येत नाहीत. पण काळजी करू नका ह्या भागात आपण काही अश्या टिप्स पाहणार आहोत त्यामुळे आपला स्वयंपाक झटपट व चविष्ट बनू शकेल. आपली जेवणतील छोट्या छोट्या टिप्स आपले जेवण अगदी मस्त बनवू शकते.
The Marathi Best Cooking Kitchen Tips can of be seen on our YouTube Channel of Easy Kitchen Tips
बेस्ट किचन टिप्स:
पराठे स्वादिष्ट बनवण्यासाठी त्यामध्ये उकडलेला एक बटाटा मिक्स करून बनवा. आपण पराठे बनवतो तेव्हा आपण वरतून तेल किंवा साजूक तूप लावून भाजतो पण त्या आयवजी बटर लावून भाजले तर जास्त चविष्ट लागतात.
ग्रेवी ला घट्ट बनवण्यासाठी त्यामध्ये सत्तू मिक्स करून पहा त्यामुळे ग्रेवी घट्ट होऊन टेस्टी लागेल.
पकौड़े म्हणजेच भजी बनवताना त्यामध्ये एक चिमूट अरारोट व गरम तेलाचे मोहन घाला त्यामुळे भजी छान कुरकुरीत होतील.
पकौडें सर्व करताना त्यावर थोडासा चाट मसाला भुरभुरा त्यामुळे अजून टेस्ट वाढेल.
ह्या टिप्स जरूर वाचा त्यामुळे 6 चटण्या जर तुम्ही एकाच वेळेस टेस्ट केल्यातर त्याचा स्वाद तुम्ही कधीही विसरणार नाही.
भेंडीची भाजी जास्त वेळ ताजी राहण्यासाठी त्यावर थोडेसे मोहरीचे तेल चोळा.
नूडल्स शिजवताना उकळत्या पाण्यात थोडेसे मीठ व तेल घाला व नूडल्स शिजवून झाल्याकी त्यांना थंड पाण्यात घालून मग काढा त्यामुळे त्या एकमेकाना आजिबात चिटकत नाहीत.
आपण रायता बनवतो तेव्हा आपण जिरे व हिंग भाजून घालतो त्या आयवजी हिंग व जिरे घालून फोडणी करून घाला त्यामुळे जास्त स्वादिष्ट लागते.
राजमा किंवा उडीद डाळ शिजवताना पाण्यात मीठ घालू नका डाळ किंवा राजमा शिजायला वेळ लागतो.
पुऱ्या छान कुरकुरीत बनण्यासाठी पीठ मळताना थोडीशी साखर घाला त्यामुळे पुऱ्या बनवून झाल्यावर त्या जास्त वेळ फुगलेल्या राहतात.
पुरीचे पीठ मळताना त्यामध्ये थोडा रवा घालून मळा त्यामुळे पुऱ्या छान कुरकुरीत बनतात.
पनीर जास्तच घट्ट झाले असेलतर त्यावर एक चमचा साखर घालून 10 मिनिट कोमट पाण्यात ठेवा. त्यामुळे पनीर एकदम नरम होईल.
तांदूळ शिजवताना त्यामध्ये थोडेसे लिंबू पिळा त्यामुळे भात छान मोकळा होऊन पंढरा शुभ्र व टेस्टी बनतो.