आता पावसाळा सीझन चालू आहे मग दुपारी चहा बरोबर आपण काही नाश्ता बनवतो. आपण कांदा भजी, बटाटा भजी, पालक भजी, कोबीची भजी आपण निरनिराळ्या प्रकारची भजी बनवतो पण कधी अश्या पद्धतीने बटाटा भजी बनवली नसतील. बटाटा भजी बनवताना बटाटे चिरावे किंवा कापावे लागत नाही.
The Marathi Crispy Potato Pakora can of be seen on our YouTube Channel of Crispy Outstanding Batata Bhaji Potato Bhajji Without Cutting
नवीन पद्धतीने बटाटा भजी खूप छान टेस्टी व कुरकुरीत लागतात. तसेच बनवायला अगदी सोपी अ झटपट होणारी आहेत. आपण नाश्तासाठी किंवा जेवणात साईड डिश म्हणून सुद्धा बनवू शकतो. बटाटा भजी आपण टोमॅटो सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर सर्व्ह करू शकतो.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहीत्य:
3 मोठ्या आकाराचे बटाटे
2 टे स्पून कॉर्नफलोर
2 टे स्पून मैदा किंवा तांदळाचे पीठ
3-4 हिरव्या मिरच्या
4-5 लसूण पाकळ्या
½ ” आले तुकडा
1 टे स्पून कोथिंबीर (चिरून)
मीठ चवीने
तेल तळण्यासाठी
कृती: लसूण सोलून बारीक चिरून घ्या. आले धुवून सोलून बारीक चिरून घ्या. कोथिंबीर धुवून चिरून घ्या. हिरवी मिरची चिरून घ्या.
प्रथम बटाटे स्वच्छ धुवून, सोलून मोठ्या भोकाच्या किसणीवर केसून घ्या. मग एका बाउलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये किसलेले बटाटे घालून पाण्यातून मग काढून दुसऱ्या बाऊलमद्धे पाणी घेऊन त्यामध्ये घाला मग तिसऱ्या बाउलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडेसे मीठ घालून त्यामध्ये केसलेले बटाटे घाला. मग तिसऱ्या पाण्यातील किसेलेले बटाटे पाणी दाबून काढून बाउलमध्ये ठेवा.
आता बटाट्यामद्धे मैदा, कॉर्नफ्लोर, हिरवी मिरची, आले-लसूण, कोथिंबीर, मीठ चवीने घालून मिक्स करून घ्या.
कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झालेकी त्यामध्ये छोटी छोटी भजी घालून छान कुरकुरीत तळून घ्या. अश्या प्रकारे सर्व भजी तळून घ्या.
गरम गरम बटाटा भजी टोमॅटो सॉस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करा.