मुरमुरे ही सर्वाना आवडतात. त्याचा चिवडा अगदी मस्त लागतो किंवा त्याची चटपटीत भेळ आपल्या तोंडाला पाणी आणते. मुरमुरे ही पचायला हलके असतात. आपण मुरमुरे वापरीन डोसा बनवला आहे का? मुरमुरे वापरुन डोसा बनवून पहा तुम्हाला व मुलांना नक्की आवडेल. मुलांना भूक लागली की मुरमुरेचा डोसा सर्व्ह करता येतो.
मुरमुरेचा डोसा आपण टोमॅटो सॉस किंवा चटणी बरोबर सुद्धा सर्व्ह करू शकतो.
The Marathi Murmura Dosa For Kids can of be seen on our YouTube Channel of Murmura Dosa | Puffed Rice Dosa For Breakfast
बनवण्यासाठी वेळ: १० मिनिट
वाढणी: ७-८ डोस बनतात
साहीत्य:
२ कप मुरमुरे
१ कप रवा
१/२ वाटी दही
मीठ चवीने
१ १/२ कप पाणी
१ टी स्पून इनो
तेल डोस भाजण्यासाठी
फोडणीकरिता:
१ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१ टी स्पून जिरे
२ हिरव्या मिरच्या (चिरून)
८-१० कडीपत्ता पाने
कृती: सर्व प्रथम मुरमुरे मिक्सरच्या भांड्यात घेऊन ग्राइंड करून घ्या. मग एका बाउलमध्ये त्याची पावडर काढून घ्या. मग त्यामध्ये रवा, दही व मीठ घालून मिक्स करून घेऊन त्यामध्ये १ १/२ पाणी घालून मिक्स करून ३० मिनिट झाकून ठेवा. मग त्यामध्ये जरूरत नुसार थोडे पाणी घालून मिश्रण डोशाच्या पिठाप्रमाणे बनवून घ्या.
फोडणीची वाटी गरम करायला ठेवा त्यामध्ये तेल घालून गरम झाल्यावर मोहरी, जिरे, हिरवी मिरची व कडीपत्ता घालून खमंग फोडणी मिश्रणावर घालून मिक्स करा.
नॉनस्टिक तवा गरम करून त्यावर डोशाचे एक डाव मिश्रण घालून बाजूनी थोडेसे तेल घालून डोसे दोन्ही बाजूनी भाजून प्लेट मध्ये काढून घ्या, अश्या प्रकारे सर्व डोस बनवून घ्या.
गरम गरम कुरकुरीत डोस चटणी बरोबर किंवा टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.