आपल्याला माहिती असेलच की आंबा हा फळांचा राजा आहे. त्याचा रंग व सुगंध आपल्याला मोहून टाकतो. आंबा हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप हितावह आहे. खर म्हणजे भारतातील आंबे जगभर प्रसिद्ध आहेत. आपण आंब्याचा वापर भाजी, चटणी, पन्हे, जूस, आइसक्रीम, लोणचे, मिल्क शेक, आंबा पोळी आंब्याचा रस काढून खाण्यासाठी सुद्धा करतो.
आपल्या भारतात आंब्याचे उत्पादन बऱ्याच प्रमाणात होते त्यामुळे सर्वाना सेवन करणे परवडते.
The Marathi Health Benefits of Eating Mango can of be seen on our YouTube Channel of Mango Benefits
आंब्याचे औषधी गुणधर्म:
1. कॅन्सर पासून बचाव:
आंब्यामध्ये एंटी ऑक्सिडेन्ट कोलोन कॅन्सर, ल्युकेमिया व प्रोस्टेट कॅन्सर पासून बचाव करण्यासाठी फायदेमंद आहे. तसेच त्यामध्ये एस्ट्रागालिन व फिसेटीन सारखे बरेच तत्व आहेत त्यामुळे कॅन्सर होण्यापासून बचाव होतो.
2.डोळ्यांचे आरोग्य चांगले राहून चमकदार बनतात:
आंब्यामध्ये विटामीन ‘A’ भरपूर प्रमाणात आहे. ते आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेमंद आहे. त्यामुळे डोळ्यांची दृष्टी चांगली राहते.
3.कोलेस्ट्रॉल नियमित राहते:
आंब्यामद्धे फायबर व विटामीन ‘C’ भरपूर आहे. त्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल संतुलित राहण्यास मदत होते.
4.त्वचासाठी फायदेमंद:
आंब्याचा रस काढून त्याचा पॅक चेहऱ्याला लाऊन त्याने मालीश केल्यास चेहऱ्यावर चकाकी येते.
5.पचनशक्ती चांगली राहते:
आंब्यामद्धे बरेच एंजाइम्स आहेत ते प्रोटिनला थांबवण्याचे काम करते त्यामुळे आपले जेवण लवकर पचण्यास मदत होते. त्याच बरोबर त्यामध्ये असणारे साइट्रिक एसिड, टार्टरिक एसिड शरीरातील क्षार संतुलित ठेवण्यास मदत करते.
6.शरीराचे वजन कमी करण्यास मदत करते:
शरीराचे वजन कमी करण्यासाठी आंबा सेवन करणे हा एक चांगला उपाय आहे. आंब्याच्या कोईवरील रेषा शरीराची चरबी कमी करण्यास मदत करते. आंब्याचे सेवन केल्यावर भूक कमी लागते. त्यामुळे जास्तीचे खाणे होत नाही.
7.रोग प्रतिकार शक्ति वाढते:
आंब्याचे सेवन केल्याने रोग प्रतिकार शक्ति वाढते. शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. अनिमिया रोग दूर होतो.
8.स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते:
ज्या व्यक्तिमध्ये विसारभोळेपणा आहे त्यांनी आंब्याचे सेवन जरूर करावे. कारणकी त्यामध्ये असणारे ग्लुटामिन एसिड नावाचे तत्व स्मरणशक्ति वाढण्यास मदत करते. त्यामुळे रक्तातील पेशी वाढतात. म्हणून गर्भवती महिलानी आंब्याचे सेवन जरूर करावे.
9.गरमी पासून बचाव:
गरमीच्या दिवसांत जर आपल्याला दुपारी बाहेर पडायचे असेल तर एक ग्लास कैरीचे पन्हे पिऊन बाहेर पडावे. त्यामुळे उन्हाचा त्रास होणार नाही. पन्हे शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य ठेवते. उन्हाळ्यातील सर्वात बेस्ट पेय पन्हे आहे.