सोयाबीन ही एक बी आहे त्याचा खाण्यासाठी व तेल काढण्यासाठी उपयोग होतो. त्यामध्ये बरेच पोषक तत्व आहेत त्याच्या आपल्या शरीराला खूप फायदा होतो. सोयाबीन मधून आपल्याला भरपूर प्रोटीन मिळतात म्हणून शाकाहारी लोकांनी त्याचा जास्त वापर करावा. कारण त्याच्या सेवनाने हाडे मजबूत बनून फ्रैक्चर होण्याचा संभव कमी होतो. आपल्या भारतात सोयाबीन सर्वत्र उपलब्ध होते. त्याच्या सेवनाने शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहते. सोयाबीन पासून दूध, टोफू, सोया सॉस व बिन पेस्ट बनवतात. त्याच्या गुणांमुळे डॉक्टर सोयाबीन सेवनाचा सल्ला देतात.
The Marathi Health Benefits Of Soybeans Soya Beans can of be seen on our YouTube Channel of Soya Beans Good For Health
सोयाबीन सेवनाचे फायदे अनेक आहेत पण त्यातील मुख्य फायदे आपण पहिले तर आपण सुद्धा सोयाबीनचे सेवन जरूर चालू कराल.
1. मधुमेहसाठी सोयाबीन फायदेमंद:
साखर असलेले पदार्थ सेवन केल्याने मधुमेहच्या समस्या वाढू शकतात. सोयाबीन ही लो ग्लाइसेमिक इंडेक्स फूड आहे म्हणजेच इतर पदार्थ मधून जे ग्लुकोज आपल्या रक्तात मिसळून शुगर लेवल वाढू शकते असे पदार्थ म्हणून त्याच बरोबर आपण सोयाबीनचे सेवन करावे. मधुमेह असणाऱ्या लोकानी सोयाबीनचे सेवन करणे फायदेशीर आहे. त्यामधील ग्लुकोज नियंत्रणात करते व इंसुलिनमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करते. त्याच बरोबर त्यामध्ये कार्बोहाइड्रेटचे प्रमाण कमी असल्या कारणाने मधुमेह असणाऱ्या लोकानी सोयाबीन सेवन करावे.
2.हाडांच्या आरोग्यासाठी फायदेमंद:
सोयाबीनच्या सेवनाने हाडे मजबूत होतात. सोयाबीन एस्ट्रोजन हार्मोन (त्यालाच फिमेल हार्मोन्स सुद्धा म्हणतात) व हाडांना सौरक्षण देण्यास सहायक आहे. तसेच त्याच्या तत्वा मुळे हाडे कमजोर होण्यापासून वाचतात.
3. हृदयाच्या आरोग्यासाठी सोयाबीन:
सोयाबीन च्या सेवणाने हृदयाचे आरोग्य चांगले राहते. त्यामध्ये एंटीऑक्सीडेंट गुण आहेत त्यामुळे सूज व हृदय रोग होण्यापासून बचाव करण्यास मुख्य भूमिका घेते व हृदय रोग होण्यापासून बचाव होतो.
4. शरीराचे वाढलेले वजन कमी करण्यासाठी सोयाबीन:
सोयाबीनमुळे शरीराचे वजन व चरबी कमी होण्यास मदत होते. शरीराला एनर्जी मिळून खाद्य पदार्थ पचण्यास मदत होते व त्याच बरोबर चरबी वाढते ती रोकण्यास मदत मिळते. पॅन त्याच बरोबर व्यायाम सुद्धा करायला पाहिजे.
5.कॅन्सर पासून बचाव करते सोयाबीन:
सोयाबीनमध्ये आइसोफ्लेवोंस (एक प्रकारचे रासायनिक कंपाऊंड) योग्य मात्रामद्धे आहे. त्याच बरोबर फाइटोकेमिकल्सचे मुख्य स्तोत्र सुद्धा आहे. म्हणून ही दोन्ही तत्व एंटीकैंसर च्या रूपात आपला आसर दाखवतात. सोयबिनच्या सेवनाने स्तन व गर्भाशय कॅन्सरच्या रोगा पासून वाचण्यास मदत मिळते.
6.कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते:
सोयाबीनचे सेवन करण्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. सोयाबीनमध्ये आइसोफ्लेवोंस नावाचे तत्व आहे जे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. सोयाबीन मुळे खराब कोलेस्ट्रॉलचे (LDL) प्रमाण कमी होऊन चांगले कोलेस्ट्रॉल वर काही परिणाम होत नाही.
7. त्वचासाठी फायदेमंद सोयाबीन:
सोयाबीन मध्ये एंटी-इंफ्लेमेटरी व कोलेजन चे गुण आहेत त्यामुळे आपली स्कीन तेजस्वी व तरुण होण्यास मदत होते. तसेच त्यामधील एंटी-ऑक्सीडेंटचे तत्व आहे त्यामुळे तेजस्वी किरणा पासून बचाव होतो. व त्याचा आपल्या स्कीन ला चांगला उपयोग होतो.
8.केसांच्या आरोग्यासाठी फायदेमंद:
सोयाबीनमध्ये फाइबर, विटामिन-बी, विटामिन-सी व मिनरल्स आहेत. त्यामुळे केसांच्या मजबूतीसाठी फायदेमंद आहे. त्यामध्ये आयर्न आहे त्यामुळे केस गळण्यापासून बचव होतो.
सोयाबीन पासून आपल्या शरीराला बरेच फायदे होतात पण त्याचे अतिसेवन केल्याने नुकसान सुद्धा होते. म्हणून सोयाबीन योग्य प्रमाणात सेवन करावे.