आपल्याला आश्चर्य वाटेल की गूळ व मनूके सेवन केल्याने शरीराचे वजन कमी होते. पण वजन कमी करण्यासाठी आपल्याला आपल्या खाण्यावर नियंत्रण ठेवणे जरुरीचे आहे. वजन कमी करण्यासाठी आपल्याला रिफाइंड फूड कमी सेवन केले पाहिजे. त्याच बरोबर साखरेचे प्रमाण सुद्धा कमी करायला पाहिजे. आपण साखरेच्या आयवजी गुळाचे सेवन केले पाहिजे.
The Marathi Jaggery And Raisin For Weight Loss can of be seen on our YouTube Channel of Jaggery And Raisin Benefits For Weight Loss
गूळ व मनूके वजन कमी करण्यासाठी फायदेमंद आहे.
आजकाल बरेच लोक आपल्या शरीराचे वाढलेले वजनच्या मुळे जास्त चिंतित आहेत. त्यामुळे वजन कमी करण्यास बरेच प्रयत्न सुद्धा करतात. अगदी महागडी औषध वापरतात. महागड्या जीम मध्ये जातात. पण त्यासाठी आपल्याला आपल्या खाण्यावर जास्त लक्ष केंद्रित करायला पाहिजे. वजन कमी करायचे असेल तर रिफाइंड फूड कमी सेवन केले पाहिजे व तसेच फास्ट फूड सुद्धा वर्ज केले पाहिजे. साखरेचे प्रमाण कमी केले पाहिजे. साखरे आयवजी गूळ वापरा. गूळ व किसमिसचे सेवन करा.
गूळ व किसमिस सेवन करण्याचे फायदे:
गूळ आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावाह आहे. गुळामध्ये पौटेशियम, कैल्शियम, सेलेनियम, मैंगनीज व जिंक आहे. ते आपल्या शरीरासाठी उपयोगी आहे. गुळाच्या सेवनाने हाडे मजबूत बनतात. रक्त तयार होते. ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. रोग प्रतिकार शक्ति वाढते. जास्तीच्या कॅलरी बर्न होतात.
किसमिसमध्ये आयरन, पोटैशियम व कैल्शियम भरपूर प्रमाणात आहे. ते आपल्या शरीरासाठी फायदेमंद आहे. किसमिस शरीराची भूक भागवण्यास कोंट्रोलमध्ये ठेवतात. किसमिस मुळातच गोड असतात. किसमिस मुळे शक्ति येते. रक्त वाढण्यास विटामीन बी कॉम्प्लेक्स पाहिजे ते किसमिसमध्ये आहे. हाडे मजबूत बनतात व डोळ्याचे आरोग्य सुद्धा चांगले राहते.
वजन कमी करण्यासाठी गूळ व किसमिस दोन्ही उपयोगी आहेत. पण ह्याच्या अति सेवणाने वजन वाढू सुद्धा शकते. जर आपल्याला डायबिटीज आहे तर डॉक्टर सल्ला घेऊन ह्याचे सेवन करावे व त्याच बरोबर एक्सरसाइजकरणे सुद्धा जरुरीचे आहे. वजन कमी करण्यासाठी खाण्यावर बंधन, फास्ट फूड बंद व एक्सरसाइज करणे जरुरीचे आहे.