आज आपण आपला डोळा लवणे किंवा फडफडणे त्याचे महत्वपूर्ण कारण म्हणजे शुभ का अशुभ आहे ते पाहणार आहोत. आपल्या शरीरातील कोणता ना कोणता भागात हालचाल होत असते. जसेकी डोळा लवणे, तळहाताला खाज येणे, ओठ फडफडणे, त्याचे साइंटिफिक कारण सुद्धा आहेत.
The Marathi Left Eye Blinking Scientific Or Astrology Reason can of be seen on our YouTube Channel of Right Eye Blinking Scientific Or Astrology Reason And Home Remedy
आपल्या घरातील वरिष्ठ व्यक्ति म्हणतात की उजवा डोळा (right eye) किंवा डावा डोळा (left eye) फडफडणे म्हणजे शुभ किंवा अशुभ संकेत आहे. मग आपण घराच्या बाहेर पडत नाही. आपले महत्वाचे काम असले तरी आपण घराच्या बाहेर पडत नाही. कारण आपल्याला वाटते ऑफिसमध्ये काहीतरी वाईट होणार, इंटरव्ह्यु मध्ये पास नाही होणार, आज मला पैसे नाही मिळणार, काही जरूरी काम असेल तर ते नाही होणार असे समजून आपण घराच्या बाहेर नाही पडत. करणकी आपल्याला वाटते की काहीतरी अपशकुन होणार. पण असे काही होत नाही हा आपल्या मनाचा खेळ असतो.
आपल्या वाटले की हे अशुभ आहे तर ते अशुभ आहे पण आपण नेहमी सकारात्मक विचार केला पाहिजे. तरी आपण पहाणार आहोत की डोळा फडफडणे ह्याचे कारण काय आहे व ते शुभ आहे का अशुभ तसेच त्याच बरोबर आपण वैज्ञानिक कारण व ज्योतिष शास्त्रा नुसार काय कारण आहे. स्त्री व पुरुष ह्याच्या मध्ये वेगवेगळे कारण आहे.
डोळा लवणे किंवा फडफडणे ह्याचे वैज्ञानिक कारण काय आहे.
डोळा लवणे ह्यामध्ये साइंटिफिक कारण आहे ते म्हणजे डोळ्याची मांसपेशी जर एकत्र आल्या तर डोळा फडफडायला लागतो. किंवा काही वेळेस आपण खूप सतत विचार करत बसतो व परेशान होतो त्यामुळे तनाव निर्माण होऊन आपला डोळा फडफडायला लागतो. किंवा एकाच जागेवर बसून एकटक पहात राहिलो तरी डोळा फडफडायला लागतो. किंवा काहीवेळेस खूप धावपळ झाली, झोप पूर्ण झाली नाही तरी डोळा फडफडायला लागतो.
ज्योतिष शास्त्रा नुसार डोळा फडफडण्याचे कारण काय आहे (eye blinking for male /female astrology meaning)
डोळा लवणे म्हणजे येणाऱ्या गोष्टीचे संकेत मिळतात, की चांगले होणार की वाईट होणार त्याच बरोबर स्त्री व पुरुष ह्याचे वेगवेगळे संकेत आहेत.
उजवा डोळा फडफडणे शुभ का अशुभ (right eye blinking for male or female)
पुरुषांच्या मध्ये उजवा डोळा फडफडणे शुभ मानले जाते म्हणजे येणाऱ्या काळामध्ये चांगल्या गोष्टी होणार व कामात सफलता मिळणार. पण स्त्रीयांच्या बाबतीत उलट असते की उजवा डोळा लवला तर अशुभ संकेत होतात.
डावा डोळा लावला तर शुभ का अशुभ ( left eye blinking for male or female)
स्त्री च्या बाबतीत डावा डोळा लवणे शुभ संकेत मानले जाते व शुभ घटना घडणार ह्याचे संकेत मिळतात व जेपण काम असेल ते नक्की होणार. त्याच बरोबर पुरुषाचा डावा डोळा लवणे म्हणजे अशुभ संकेत होतात म्हणजे भांडणे होणार काम होणार नाही.
आपले दोन्ही डोळे फडफडले तर ते शुभ आहे की अशुभ आहे.
जर स्त्री अथवा पुरुष ह्याचे दोन्ही डोळे लवले तर असे मानावे की शुभ संकेत मिळत आहेत आपले काम नक्की होणार.
डोळा लवणे किंवा फडफडणे ह्यावर उपाय काय आहे
जर आपला डोळा फडफडत आहे तर एक कापसाचा बोळा घेऊन ओला करून डोळ्याच्या पापण्यावर ठेवावा किंवा ओला कागद ठेवला तरी चालेल.
आपले दोन्ही डोळे फडफडत असतील तर आपला अंगठा किंवा बोट तळहातावर घासून बोट किंवा अंगठा आपल्या डोळ्यावर ठेवून हळुवारपणे मसाज करावा. त्याच्या मुळे डोळे लवणे थोड्या वेळात लगेच थांबेल.
डोळा लवणे किंवा फडफडणे ह्याचे शुभ अथवा अशुभ संकेत मानणे किंवा नमानणे ही आपल्यावर अवलंबून आहे. कधी कधी त्याचा आपल्याला प्रत्यय सुद्धा येतो.