वाटली डाळ ही डिश चनाडाळ भिजवून बनवली जाते. वाटलीडाळ ही महाराष्ट्रियन लोकांची लोकप्रिय पारंपरिक डिश बनवायला अगदी सोपी व झटपट होणारी आहे. तसेच चटपटीत व खमंग लागते.
वाटली डाळ आपण गणपती उत्सवमध्ये गणपती बापांच्या आरतीच्या वेळी खिरापत म्हणून वाटू शकतो. गौरी गणपतीला जेव्हा गौरी जेवतात तेव्हा वाटली डाळ अगदी आवर्जून करतात. तसेच आपण ब्रेकफास्टला किंवा जेवणात सुद्धा सर्व्ह करू शकतो.
The Marathi Maharashtrian Traditional Watli Dal can of be seen on our YouTube Channel of Khamang Watli Dal Vatli Dal Chana Dal
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहीत्य:
1 कप चनाडाळ
2 हिरव्या मिरच्या (चिरून)
1/2 “ आले (चिरून)
मीठ चवीने
कोथिंबीर व ओले खोबरे सजावटीसाठी
फोडणी करिता:
2 टे स्पून तेल
1 टी स्पून मोहरी
1 टी स्पून जिरे
¼ टी स्पून हिंग
5-6 कडीपत्ता पाने
¼ टी स्पून हळद
¼ टी स्पून लाल मिरची पावडर (एच्छिक)
1 छोटा कांदा (बारीक चिरून)
कृती:
चनाडाळ स्वच्छ धुवून 5 तास पाण्यात भिजत ठेवा. कांदा बारीक चिरून घ्या. कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. आले धुवून चिरून घ्या. हिरवी मिरची चिरून घ्या.
चनाडाळ मधील पाणी पूर्ण काढून मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या. त्यामध्ये हिरवी मिरची, आले व थोडे मीठ घालून जाडसर वाटून घ्या.
एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, कडीपत्ता, घालून चिरलेला कांदा घालून 2 मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या. कांदा परतून झाल्यावर त्यामध्ये हळद व थोडेसे मीठ घालून मिक्स करून त्यामध्ये वाटलेली डाळ घालून मंद विस्तवावर परतून घ्या.
डाळ चांगली शिजली की त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर व ओला नारळ घालून मिक्स करून बाउलमध्ये काढून वरतून कोथिंबीर व ओल्या नारळाने सजवून गरम गरम चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर सर्व्ह करा. किंवा नुसती वाटली डाळ सुद्धा सर्व्ह करू शकता.