आपल्याला माहिती असेलच डाळीमद्धे पोषक तत्व, प्रोटीन व औषधी गुणधर्म आहेत. मसूर डाळीमद्धे सुद्धा भरपूर औषधी गुणधर्म आहेत. जे आपल्या शरीराला उपयोगी आहेत. त्याचे काय फायदे आहेत आहेत ते आपण पाहूया.
प्रथम आपण त्याचे औषधी गुणधर्म काय आहेत ते पाहू या:
मसुरच्या डाळीमध्ये एंटीऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात आहे. त्याच बरोबर मसूर डाळीमद्धे शरीराचे वजन कमी, कॅन्सर, हृदय रोग ह्यावर फायदेशीर आहे. त्यामध्ये पोषकतत्व भरपूर प्रमाणात आहेत.
The Marathi Masoor Dal Health Benefits can of be seen on our YouTube Channel of Masoor Dal Benefits For Heart, Skin, Hair
मसूरडाळीचे सेवन करणे आपल्या शरीरासाठी फायदेमंद आहे. त्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. त्यामध्ये सूक्ष्म पोषक तत्व आहेत त्याच बरोबर प्रीबायोटिक कार्बोहाइड्रेट त्यामुळे ती पचनास सोपी होते. त्यामध्ये फायबर आहे त्यामुळे मधुमेह, कॅन्सर, हृदय रोग व शरीराचे वजन कमी करण्यास फायदेमंद आहे. म्हणूनच मसूरडाळीचे सेवन करावे.
१. शरीराचे वजन कमी करण्यास फायदेमंद:
मसुरच्या डाळीमद्धे फाइबर व प्रोटीन भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे तिचे सेवन केल्यास भूक कमी लागते व शरीराचे वजन नियंत्रणात राहते. पॅन त्याच बरोबर शरीराला आवश्यक व्यायाम सुद्धा पाहिजे.
२. हृदय व कोलेस्ट्रॉलसाठी फायदेमंद:
शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढणे म्हणजे हृदयरोगासाठी आमंत्रण. मसुरच्या डाळीतील फाइबर कोलेस्ट्रॉला नियंत्रणात ठेवते. त्याच बरोबर पॉलिफिनोल युक्त मसूर डाळमध्ये एंटी कोलेस्टेरोलेमिकचा प्रभाव आहे. त्याच बरोबर होमोसिस्टीन नावाच्या एमीनो एसिडला नियंत्रणात करण्यासाठी मदतगार आहे. त्यामुळे रक्तातील वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी होऊन हृदयरोगाचे प्रमाण कमी होते.
३. ब्लड शुगरसाठी मसूरडाळ फायदेमंद:
जास्त प्रमाणात साखरेचे सेवन केल्यास ब्लड शुगर वाढते. ब्लड शुगर वाढल्यास मसूरडाळीचे सेवन करावे. कारण की मसुरच्या डाळीमद्धे डायबीटीक पेशंट व इतर निरोगी लोकांमधील ब्लड शुगर, लिपीड व लिपोप्रोटीन मेटाबॉलिज्म मध्ये सुधारणा करण्याची क्षमता आहे. त्याच बरोबर त्यातील फायबर ब्लड शुगर कमी करण्यास मदत करते व त्यातील कॉम्प्लेक्स कार्बोहाइड्रेट आहेत ते रक्तामध्ये हळू हळू मिसळून ब्लड शुगर लेवल योग्य ठेवते.
४. पचण्यास फायदेमंद:
कधी कधी आपण असे काही सेवन करतो की त्यामुळे त्याचा परिणाम पचनक्रियावर होतो. अशावेळी मसूर डाळीमधील फायबर पचनशक्ति सुधारण्यास मदत करते.
५. इम्यूनिटी वाढण्यास मदतगार:
मसुरच्या डाळीमद्धे ऐसे पेप्टाइड्स आहे त्यामुळे शरीरातील एंटीमाइक्रोबियल जिवाणूच्या हालचाली वाढण्यास मदत होते. त्यामुळे इन्फेक्शन होत नाही.
६. कॅन्सरसाठी मसूर डाळ फायदेमंद:
मसूरच्या डाळीच्या सेवनाने पोट, थायराइड, लिवर, स्तन व प्रोस्टेट च्या कॅन्सरच्या बरोबर अजून काही कॅन्सर पासून बचाव करते. मसूरमध्ये लेक्टिन (एक प्रकार चे प्रोटीन) म्हणजेच एंटी-कैंसर गुण आहेत. त्यामुळे ट्यूमर वाढत नाही. मसूरच्या डाळीच्या सेवाना बरोबर डॉक्टर इलाज करणे सुद्धा जरुरीचे आहे.
७. दांत व हाडांसाठी फायदेमंद:
हाडांमद्धे अशक्त पणा आला की सांधे दुखायला लागतात. त्यासाठी मसूर डाळ फायदेमंड आहे. करणकी त्यामध्ये कैल्शियम, मैग्नीशियम व फास्फोरस आहे त्यामुळे दांत व हाडे मजबूत बनतात व सांधे दुखी थांबून दांत सुद्धा मजबूत बनतात.
८. गर्भावस्थामध्ये मसूर डाळीचे सेवन करणे फायदेमंद:
गर्भावस्थामध्ये बऱ्याच महिलाना अशक्त पणा येतो म्हणून मसूर डाळीचे सेवन करावे. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळून अशक्तपणा कमी होतो. मसूर डाळीमद्धे काही प्रमाणात फॉलिक एसिड आहे जे गर्भावस्थामध्ये बाळासाठी व मातेसाठी फायदेमंद आहे. गर्भावती महिलानी रोज फोलेट म्हणजेच फोलिक एसिड जे मसूर डाळीमद्धे आहे त्याचे सेवन केले पाहिजे.
९. त्वचेसाठी फायदेमंद:
प्रतेकला वाटते की आपली त्वचा चांगली असावी. म्हणून त्यासाठी बाजारातील महागडी क्रीम किंवा ट्रीटमेंट घेतात. त्यापेक्षा मसुरच्या डाळीचा वापर करा. मसुरच्या डाळी पासून बनवलेला फेस पॅक जास्त फायदेमंद होईल. त्याच्या मुळे अशुद्ध त्वचा दूर होते. त्यामुळे त्वचा कोमल, तरुण व चमकदार बनते. मसुरच्या डाळीच्या पाण्यानि भाजलेली त्वचा चांगली होण्यास मदत होते.
१०. केसांच्या समस्या दूर करते:
केस गळण्याचे प्रमाण बऱ्याच लोकांमध्ये असते. केस गळण्याच्या उपाया साठी आपण बराच खर्च सुद्धा करतो पण त्याचा फायदा होत नाही. मसूरच्या डाळीमद्धे प्रोटिन व एंटीऑक्सीडेंट आहेत जे केसांची मूळ घट्ट करते. त्यामुळे केस गळणे कमी होते.