कचोरी हा सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे. कचोरी आपण वेगवेगळे सारण भरून बनवू शकतो. त्यातील एक पदार्थ म्हणजे प्याज म्हणजेच अनियन कचोरी. कचोरी आपण नाश्तासाठी बनवू शकतो. पॅन बरेच वेळा आपल्याला कचोरी हा तळलेला पदार्थ खायचा नसतो तर त्याचा एक ऑप्शन म्हणजे त्याचा पराठा बनवणे.
कचोरी किंवा अनियन पराठा हा पंजाबी लोकांचा आवडता व लोकप्रिय पदार्थ आहे. कांद्याचा पराठा हा मस्त टेस्टी व कुरकुरीत लागतो. अनियन पराठा बनवायला अगदी सोपा व झटपट होणारा आहे.
The Marathi Punjabi Onion Kachori Paratha can of be seen on our YouTube Channel of Punjabi Onion Kachori Paratha Kanda Paratha Pyaj Paratha
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 3 पराठे
साहीत्य: आवरणासाठी:
1 कप गव्हाचे पीठ
1/3 टी स्पून मीठ
1 टी स्पून तेल
तेल व तूप किंवा बटर भाजण्यासाठी
सारणासाठी:
2 टे स्पून तेल
½ टी स्पून जिरे
½ टी स्पून ओवा
½ टी स्पून हिंग
2 हिरव्या मिरच्या (बारीक चिरून)
2 कांदे (बारीक चिरून)
1 टी स्पून आल-लसूण (बारीक चिरून)
1 टी स्पून तेल + ½ कप बेसन
¼ टी स्पून गरम मसाला
½ टी स्पून लाल मिरची पावडर
½ टी स्पून धने-जिरे पावडर
¼ टी स्पून काळे मीठ
½ टी स्पून मीठ
1 टे स्पून कोथिंबीर (चिरून)
कृती:
आवरणासाठी: एका बाउलमध्ये गव्हाचे पीठ, मीठ व पाणी घालून पीठ मळून घ्या व झाकण ठेवून थोडावेळ बाजूला ठेवा.
सारणासाठी: कांदा, कोथिंबीर बारीक चिरून घ्या. आल-लसूण पेस्ट करून घ्या.
एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे, ओवा व हिरवी मिरची घालून थोडेशी परतून घ्या मग त्यामध्ये बेसन घालून गुलाबी रंगावर भाजून घ्या. बेसन भाजून झाल्यावर त्यामध्ये चिरलेला कांदा व आल-लसूण पेस्ट घालून परतून घ्या. मग त्यामध्ये गरम मसाला, लाल मिरची पावडर, धने-जिरे पावडर, काळे मीठ, साधे मीठ घालून मिक्स करून थोडेसे परतून घेऊन कोथिंबीर घालून सारण बाजूला काढून ठेवा.
कचोरी पराठा बनवण्यासाठी मळलेल्या पिठाचा एक मध्यम आकाराचा गोळा घेऊन पुरी सारखा लाटून त्यामध्ये 2 टे स्पून सारण भरून पुरी बाजूनी मोदक करतो तशी मुडपून घेऊन गोळा बंद करा. व हलक्या हातानी पराठा थोडासा जाडसर लाटून घ्या. नॉनस्टिक तवा गरम करून त्यावर पराठा थोडे तेल घालून खमंग भाजून घ्या.
कांदा पराठा बनवण्यासाठी मळलेल्या पिठाचे दोन मध्यम आकाराचे गोळे घेऊन पुरी सारखे लाटून घ्या. एका पुरीवर 2 टे स्पून सारण ठेऊन पसरून घ्या. मग त्यावर दुसरी पुरी ठेवून बाजूनी दाबून पराठा लाटून घ्या. नॉनस्टिक तवा गरम करून त्यावर पराठा थोडे तेल घालून खमंग भाजून घ्या.
गरम गरम कांदा कचोरी पराठा टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.