आता आंब्याचा सीझन चालू आहे. आपण आंब्याच्या रसा पासून बऱ्याच प्रकारच्या निरनिराळ्या रेसीपी पाहिल्या आता आपण झटपट आंब्याचे पुडिंग पाहणार आहोत.
आंबा ही असे फळ आहे की ते सर्वाना आवडते. त्याचा रंग व सुगंध आपल्याला मोहून टाकतो. त्याच्या रसा पासून आपण बरेच पदार्थ बनवू शकतो. आंब्याचे पुडिंग बनवायला अगदी सोपे झटपट होणारे आहे. आपण डेझर्ट म्हणून घरी पार्टीला किंवा जेवण झाल्यावर सर्व्ह करू शकतो. आंब्याचे पुडिंग थंडगार करून सर्व्ह करा.
The Marathi Mango Pudding No Gelatin No Agar Agar No China Grass can of be seen on our YouTube Channel of Delicious Mango Pudding
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 2 जणसाठी
साहीत्य:
1 मोठा हापूस आंबा (गर काढून)
1 कप दूध
½ कप साखर
3 टे स्पून कॉर्नफ्लोर
¼ कप दूध
सजावटीसाठी आंबा किंवा चेरी
कृती:
आंबा चांगला स्वच्छ धुवून पुसून त्याचा रस काढून घ्या. एका बाउलमध्ये कॉर्नफ्लोर व दूध मिक्स करून घ्या. पण गुठळी रहाता कामा नये. मिक्सरच्या भांड्यात आंब्याचा रस, साखर व दूध घालून ब्लेंड करून घ्या.
नॉनस्टिक पॅन मध्ये आंब्याचे ब्लेंड केलेले मिश्रण काढून 5 मिनिट शीजवून घ्या. मग त्यामध्ये कॉर्नफ्लोरचे मिश्रण घालून मिक्स करून मिश्रण थोडे घट्ट होई पर्यन्त आटवून घ्या. कॉर्नफ्लोर
मुळे मिश्रण लगेच घट्ट व्हायला लागेल. मग विस्तव बंद करून मिश्रण थोडे थंड करायला ठेवा. मिश्रण थोडे थंड झाल्यावर स्टीलच्या डेकोरेटीव्ह बाउल मध्ये काढून एकसारखे करून घ्या. मग फ्रीजमद्धे थंड करून प्लेट मध्ये काढून आंब्याच्या फोडीनि किंवा चेरीने सजवून सर्व्ह करा.