दाल बाटी ही एक राजस्थानी पारंपारिक डिश आहे. दाल बाटी ही डिश खास दिवशी राजस्थानी लोकांच्या घरी बनवली जाते. आता भारतभर ही डिश बनवली जाते. तिखट चमचमीत दाल बरोबर मस्त खुशखुशीत बाटी सर्व्ह करतात. आपण ब्रेकफास्टला किंवा जेवणात सुद्धा अश्या प्रकारची डिश बनवू शकतो. दाल बाटी डिश बनवायला अगदी सोपी आहे.
The Marathi Dal Bati Without Oven can of be seen on our YouTube Channel of Rajasthani Crispy Dal Bati Resturant Style in Pan
बाटी बनवताना ती गव्हाचे पीठ व रवा वापरुन तुपाचा जास्त वापर करून कोळसे वापरुन शेगडीवर भाजून गरम गरम सर्व्ह करतात. पण आता कालांतराने कोळसा न वापरता तंदूर किंवा ओव्हन किंवा गॅसवर सुद्धा बनवतात. आपण आपल्याला जसे सोपे वाटते तसे करतो.
आपण आज घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कमीत कमी साजूक तुपात बाटी बनवणार आहोत.
बनण्यासाठी वेळ: 45 मिनिट
वाढणी: 5-6 बाटी बनतात
साहित्य:
1 कप गव्हाचे पीठ
1/4 कप रवा
1/4 टी स्पून ओवा
1/4 टी स्पून जिरे
1 टे स्पून दही
1 टे स्पून तूप
1/4 टी स्पून (थोडे कमी बेकिंग सोडा)
मीठ चवीने
पाणी जरूरत नुसार
1/4 कप तूप (बाटी भाजण्यासाठी व वरतून घालण्यासाठी
कृती: एका मोठ्या आकाराच्या बाउलमध्ये गव्हाचे पीठ, रवा, जिरे, ओवा, दही, तूप, बेकिंग सोडा व मीठ घालून मिक्स करून घ्या. मग थोडे थोडे पाणी घालून आपण चपाती साठी जशी कणिक मळतो तशी मळून घ्या. कणिक मळल्यावर वरतून तुपाचा हात लावून 30 मिनिट झाकून बाजूला ठेवा. मग झाकण काढून कणकेचे एक सारखे 6 गोळे बनवा.
एका स्टीलच्या भांड्यात पाणी गरम करायला ठेवा. पाण्याला उकळी आलीकी त्यामध्ये बनवलेले गोळे घालून 15 मिनिट मध्यम विस्तवावर शीजवून घ्या. 15 मिनिट झालेकी शीजवलेले गोळे चाळणीमध्ये काढून थंड करायला ठेवा.
नॉन स्टिक पॅन गरम करायला ठेवा. त्यामध्ये 2 टे स्पून तूप घालून शीजवलेले गोळेठेवून दोन्ही बाजूनी छान खमंग खुशखुशीत भाजून घ्या. साधारणपणे गोळे भाजण्यासाठी 15 मिनिट लागतील. सर्व्ह बाटी भाजून झाल्यावर प्लेटमध्ये काढून वरच्या बाजूनी फोडून त्यामध्ये तूप घालून चमचमीत तिखट दाल बरोबर सर्व्ह करा.
दाल रेसीपी: साहीत्य:
½ कप तुरीची डाळ
½ टे स्पून तेल, 1 टी स्पून मोहरी
1 टी स्पून जिरे, ½ टी स्पून आले (ठेचून)
1 मोठी हिरवी मिरची (चिरून), ¼ टी स्पून हिंग
8-10 कडीपत्ता पाने, 1 टी स्पून लाल मिरची पावडर
¼ टी स्पून हळद, 2 टे स्पून कोथिंबीर (चिरून)
मीठ चवीने, 1 टे स्पून गूळ, 2 आमसुल
कृती:
तुरीची डाळ कुकरमद्धे 3-4 शिट्या काढून चांगली शीजवून घ्या. हिरवी मिरची चिरून घ्या. कोथिंबीर धुवून चिरून घ्या. आले ठेचून घ्या.
एका कढई मध्ये तेल गरम करून मोहरी, जिरे, हिंग, आल, हिरवी मिरची, कडीपत्ता, लाल मिरची पावडर घालून शेजवलेली डाळ, मीठ व थोडे पाणी घालून डाळीला चांगली उकळी आणा. उकळी आणल्यावर त्यामध्ये आमसुल, गूळ व कोथिंबीर घालून 2 मिनिट गरम करून विस्तव बंद करा.