सोयाबीन आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. सोयाबीनमध्ये बरेच आजार बरे करण्याचे गुणधर्म आहेत. त्याच बरोबर इन्फेक्शन बरे करण्याचा इलाज सुद्धा आहे. सोयाबीन आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. सोयाबीनमध्ये बरेच आजार बरे करण्याचे गुणधर्म आहेत. त्याच बरोबर इन्फेक्शन बरे करण्याचा इलाज सुद्धा आहे. सोयाबीनमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात आहे. त्याच बरोबर त्यामध्ये मिनरल्स, विटमिन बी कॉम्प्लेक्स व विटमिन ए आहे. तसेच सोयाबीनमध्ये आयरन, मैंगनीज, फॉसफोरस, कॉपर, पोटेशियम, जिंक व सेलेनियम आहे. सोयाबीन मध्ये बरेच औषधी गुणधर्म आहेत.
The Marathi Soya Bean Bhaji can of be seen on our YouTube Channel of Spicy Restaurant Style Soya Bean Bhaji
सोयाबीनची भाजी बनवायला अगदी सोपी व झटपट होणारी आहे. सोयाबीनची भाजी आपण पराठा किंवा चपाती बरोबर सर्व्ह करू शकतो. सोयाबीनची भाजी आपण अगदी नवीन पद्धतीने बनवणार आहोत.
बनवण्यासाठी वेळ: 40 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहित्य:
1 कप सोयाबीन वडी
1 टे स्पून तेल तेल
1 ½ टी स्पून लाल मिरची पावडर
1 टी स्पून धने-जिरे पावडर
1 टे स्पून बटर किंवा तूप
मीठ चवीने
कोथिंबीर सजावटीसाठी
मसाला करिता:
1 टे स्पून तेल
2 मोठे कांदे (चिरून)
7-8 लसूण पाकळ्या
1” आले तुकडा
1 हिरवी मिरची
1 तमालपत्र
5-6 मिरे
½” दालचीनी तुकडा
2 लवंग
2 टे स्पून सुके खोबरे (किसून)
7-8 काजू
1 टी स्पून तीळ किंवा खसखस
1 मध्यम आकाराचा टोमॅटो (चिरून)
कृती: एका भांड्यात पाणी गरम करून घ्या. मग त्यामध्ये सोया वडी घालून मिक्स करून 30 मिनिट झाकून बाजूला ठेवा. 30 मिनिट झाल्यावर सोयावडी मधील पाणी चांगले दाबून काढून टाकून एका बाऊलमद्धे ठेवा.
कांदा चिरून घ्या. आले सोलून तुकडे करून घ्या. लसूण सोलून घ्या. कोथिंबीर धुवून चिरून घ्या.
एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये चिरलेला कांदा, आले व लसूण घालून गुलाबी रंगावर परतून घ्या. मग त्यामध्ये किसलेले सुके खोबरे, तमालपत्र, लवंग, मिरे, दालचीनी, काजू, तीळ किंवा खसखस घालून थोडेसे परतून घ्या. आता त्यामध्ये चिरलेला टोमॅटो घालून टोमॅटो थोडा मऊ होई पर्यन्त शिजवून घ्या. विस्तव बंद करून मसाला थंड झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्या.
कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये वाटलेला मसाला घालून थोडे तेल सुटे पर्यन्त परतून घ्या. मग त्यामध्ये लाल मिरची पावडर, मीठ चवीने, बटर किंवा तूप घालून 1 मिनिट परतून घ्या. आता त्यामध्ये पाणी काढून ठेवलेले सोया वडी घालून चांगले मिक्स करून 2-3 मिनिट परतून घ्या. म्हणजे प्रतेक वडीला मसाला लागेल मग त्यामध्ये 1 ½ कप पाणी घालून मिक्स करून कढईवर झाकण ठेवून 7-8 मिनिट शीजू द्या. मग झाकण काढून त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर घालून परत 3-4 मिनिट मंद विस्तवावर शीजू द्या.
गरम गरम चमचमीत सोयाबीनची भाजी बाउलमध्ये काढून वरतून कोथिंबीरने सजवून पराठा किंवा चपाती बरोबर सर्व्ह करा.