आपण घराची सजावट करतो. तेव्हा भितीवर छायाचित्र किंवा शोभेच्या वस्तु ठवतो. तेव्हा आपण घरामध्ये अगदी मस्त घडयाळ सुद्धा लावतो. पण घडयाळ लावताना योग्य त्या दिशेला लावावे नाहीतर त्याचे दुष्परिणाम सुद्धा भोगावे लागतात. आपण घराबाहेर पडताना किंवा घरात आल्यावर आपले लक्ष सहज घड्याळा कडे जाते. त्यावर सुद्धा बरेच काही परिणाम अवलंबून असतात.
The Marathi Wall Clock Correct Direction can of be seen on our YouTube Channel of Wall Clock Correct Direction As Per Vastu Shastra
आपल्या घरात दारे खिडक्या किंवा मुख्य दरवाजा वास्तुशास्त्रा प्रमाणे असतो तसेच कोणत्या भिंतीवर घडयाळ लावावे त्याचे सुद्धा शास्त्र आहे. जर आपण चुकीच्या दिशेला घरात घडयाळ लावले तर त्यामुळे वास्तुदोष वाढतात व आपल्या जीवनशैलीवर त्याचा परिणाम होतो.
वास्तुशास्त्रामध्ये प्रतेक गोष्टीला नियम आहेत. जर आपण नियमाप्रमाणे सर्व केले तर सगळे मंगलच घडते. व घरातील व्यक्तीला त्याचा लाभ सुद्धा होतो. घरामध्ये किंवा दुकानामद्धे लावलेले घडयाळ आपले जीवन सुलभ बनवू शकते. ते कसे ते आपण पाहूया.
1. घराच्या दक्षिण दिशेला घडयाळ लावलेतर आपल्या प्रगतीमध्ये अडथळे येतात. घराची दक्षिण दिशा म्हणजे यमाची दिशा मानली जाते. दक्षिण दिशेला घडयाळ लावल्यास घरातील मुख्य व्यक्तीच्या आरोग्यावर वाईट परिमाण होतो.
2. दरवाजाच्या वरती सुद्धा घडयाळ लावू नये. त्यामुळे घरात येताना व बाहेर जाताना निगेटिव्ह एनर्जीचा सामना करावा लागतो.
3. घरामध्ये बंद पडलेले घडयाळ ठेवू नये त्यामुळे निगेटिव्ह एनर्जी वाढते. तसेच बरोबर वेळ लावून 10-15 मिनिट पुढे ठेवावे त्यामुळे आपली प्रगती चांगली होते.
4. काही लोकाना सकाळी लवकर उठावे लागते त्यामुळे ते आपले हातातील घडयाळ झोपताना उशीच्या खाली ठेवतात असे करणे चुकीचे आहे. त्यामुळे त्याचा नकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर पडतो.
5. घराच्या पश्चिम दिशाला घडयाळ लावणे शुभ मानले जाते. त्यामुळे घरातील व्यक्तिना नवीन गोष्टी करण्यासाठी अवसर प्राप्त होतो. तसेच उत्तर दिशेला लावलेले घडयाळ पैशाच्या नुकसानी पासून वाचवते.
6. घड्याळातिल वेळ एकदम बरोबर पाहिजे. वेळ बरोबर नसेलतर नुकसान होण्याचा संभव असतो. घडयाळ अश्या ठिकाणी लावावे जेणे करून सर्वाना नीट दिसेल.
7. भिंतीवरील घड्याळाची नेहमी सफाई करावी त्यावर धूळ बसू देवू नये. जर घड्याळाची काच फुटली असेल तर लगेच बदलावी.
8. आपण संगीत असणारे घडयाळ लावले तर ते घराच्या ब्रह्मस्थानी लावावे त्यामुळे दोन फायदे होतात. घरातील लोकांची प्रगती होण्यास संधी मिळतात व नकारात्मक ऊर्जा जाऊन सकारात्मक ऊर्जा घरात येते.