अक्रोडचे औषधी गुणधर्म फायदे
आपण ड्रायफ्रूट पाहिले की आपल्याला ते लगेच तोंडात टाकावेसे वाटतात. कारण की ड्रायफ्रूट स्वादिष्ट लागतात त्याच बरोबर ते फायदेमंद सुद्धा आहेत. जर आपण आपल्या रोजच्या जेवणात सामील केले तर त्याचे आपल्या शरीराला चांगले फायदे होतात. बदाम, काजू, किसमिस खजूर व अक्रोड च्या सेवणाने आपले शरीर चांगले सुदरुड बनते. पण आज आपण अक्रोड विषई जाणून घेणार आहोत. आक्रोडमद्धे बरेच औषधी गुणधर्म आहेत.
The Marathi Health Benefits of Walnuts can of be seen on our YouTube Channel of 10 Health Benefits of Walnuts
अक्रोड सेवनाचे फायदे: Benefits of Walnut :
आक्रोडमद्धे पोषक गुण बरेच आहेत. अक्रोड सेवनाचे आपल्या आरोग्यासाठी फायदे किंवा अक्रोड बऱ्याच रोगांना दूर ठेवू शकतो.
1. हृदयाचे आरोग्य
अक्रोडच्या सेवनाने हृदयाचे आरोग्य चांगले राहते. आक्रोडमद्धे अल्फा लिनोलेनिक एसिड जे ओमेगा 3 फैटी एसिडचेच एक रूप आहे. ते रक्त वाहिन्यामद्धे जमा होणारे फैट (blood clot) रोकण्यास मदत करते. ज्याना हाय ब्लड प्रेशर आहे त्यांच्या साठी सुद्धा अक्रोडचे सेवन करणे फायदेशीर आहे. तसेच त्यामधील पॉलीअनसेचुरेटेड फैटी एसिड शरीरातील खराब कोलेस्ट्रोल (LDL) कमी करून चांगले कोलेस्ट्रोल (HDL) निर्माण करून हृदया संबंधित तक्रारी दूर करते.
2. मेंदूच्या आरोग्यासाठी
आक्रोडमद्धे भरपूर ओमेगा-3 फैटी एसिड आहे त्यामुळे आपले मेदूचे आरोग्य चांगले राहते. त्याच बरोबर ही पोलीअनसैचुरेटेड फैट आपली स्मरण शक्ति चांगली ठेऊन डिप्रेशन कमी करते.
3. कॅन्सरसाठी फायदेमंद
कॅन्सर सारख्या घातक आजाराला दूर ठेवण्याचे काम अक्रोड करते. आक्रोडमद्धे पोलीफिनोलचे तत्व आहे जे कॅन्सर होण्या पासून बचाव करते. तसेच त्यामध्ये एंटीकैंसरचे तत्व आहे त्यामुळे ट्यूमर होण्यापासून बचाव होतो. पण आपण अश्या घरेलू उपचार करण्यावर अवलंबून न रहात आपण डॉक्टरी इलाज केला पाहिजे.
4. हाडांचे आरोग्य चांगले राहते
आक्रोडमद्धे अल्फा लिनोलेनिक एसिड युक्त खाद्य पदार्थ आहे त्याच्या सेवनाने हाडांचे आरोग्य चांगले राहून मजबूत होतात. त्याच बरोबर त्यामध्ये कैल्शियम व फास्फोरस आहे त्यामुळे हाडांना ऑस्टियोपोरोसिस होणाऱ्या रोगापासून रोकले जाते. कॉपेर बोन मिनरल डेनसिटीला चांगले ठेवतो.
5. शरीराचे वजन कमी करण्यास मदत करते
अक्रोडमध्ये फैट व कैलोरीचे प्रमाण भरपूर आहे त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. अक्रोड भूक नियंत्रणात ठेवते व त्यामध्ये फायबर असल्यामुळे फैट कमी करते त्यामुळे वजन कमी करायचे असेल तर अक्रोड सेवन करावे.
6. गर्भावस्था
अक्रोडमध्ये फैटी एसिड, विटामिन-ए , ई व बी-कॉम्प्लेक्स आहे त्यामुळे बाळाच्या विकासात मदत होते. त्याच बरोबर आर्यन व कैल्शियम आहे जे एनीमिया पासून वाचवते.
7. इम्यून सिस्टम मजबूत करते
अक्रोड मध्ये प्रोटीन आहे त्यामुळे रोग प्रतिकार शक्ति वाढते.
8. चांगली झोप व तनाव रहित जीवन
आक्रोडचे सेवन केल्याने तनाव कमी होऊन झोपेच्या समस्यापासून छुटकारा मिळतो. अक्रोडमध्ये विटामिन-बी6, ट्रिप्टोफैन, प्रोटीन व फोलिक एसिड सारखे पोषक तत्व भरपूर आहे त्यामुळे तनावा पासून छुटकारा मिळतो. त्याच बरोबर ओमेगा 3 फैटी एसिड मूड चांगला करतो. त्यामुळे चांगली झोप येते व डिप्रेशन येत नाही.
10. डायबिटीज
मधुमेहच्या समस्यासाठी अक्रोड सेवन करणे फायदेशीर आहे. आक्रोडच्या झाडांमद्धे व पानांमध्ये एंटी-डायबिटिक चा प्रभाव आहे. त्यामुळे रक्तातील ग्लूकोजचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.
11. एंटी-एजिंग
वाढत्या वया बरोबर त्वचे वरती सुरकुत्या यायला लागतात. त्या सुरकुत्या थांबवण्यासाठी आक्रोडचे सेवन करावे. आक्रोडमद्धे विटामिन-ई आहे जो त्वचा मुलायम ठेवण्यास मदत करतो. म्हणून सौन्दर्य प्रसाधणे बनवण्यासाठी आक्रोडचा उपयोग करतात.
नोट: अक्रोड ही उष्ण असतात त्यामुळे गरमीच्या सीझनमद्धे खाऊ नये. थंडीच्या सीझनमध्ये अक्रोड खाणे फायदेशीर आहे. एक व्यक्ति रोज 2-3 अक्रोड खाऊ शकतो.