अंगारकी संकष्टी चतुर्थी महत्व पूजाविधी व मंत्र
27 जुलै 2021 मंगळवार ह्या दिवशी अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. मंगळवारी अंगारकी संकष्टी चतुर्थी येणे म्हणजे त्याचा चांगला संयोग मानला जातो. प्राचीन कहाणी नुसार माता पार्वतीच्या म्हणण्या नुसार श्री भगवान शंकर हयानी गणेशजीना नवीन तोंड लावले होते. मग त्यांचे नाव गजानन ठेवण्यात आले. मग त्यानंतर गणेश चतुर्थीचे व्रत करण्याची परंपरा सुरू झाली.
The Marathi Angarki Sankashti Chaturthi Importance Puja Vidhi And Mantra can of be seen on our YouTube Channel of Angarki Sankashti Chaturthi 27 July 2021
कृष्ण पक्षामध्ये जी चतुर्थी येते त्याला संकष्टी चतुर्थी म्हणतात. मग काही महिन्यामध्ये असे काही संयोग येतात तेव्हा चतुर्थी मंगळवारी येते त्याला अंगारकी संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. ह्या वर्षी 27 जुलै 2021 मंगळवार ह्या दिवशी अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे त्याच्या मुळे आपले नाते श्री गणेश भगवान ह्याच्याशी जोडले जाते. असे म्हणतात की अंगारकी संकष्टी चतुर्थी च्या दिवशी श्री गणेशजीनची विधी पूर्वक पूजा व व्रत केल्याने सारे संकट दूर होतात. अंगारकी संकष्टी चतुर्थी मंगळवारी आली की त्याच्या बरोबर मंगळ भगवान ह्याचा सुद्धा आशीर्वाद जोडला जातो. असे म्हणतात की ह्या दिवशी श्री गणेशह्याची पूजा केल्यास मंगल ही मंगल होते. विशेष करून ह्या दिवशीची पूजा आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यसाठी सुद्धा असते. त्यासाठी काही खास नियम आहेत ते नीट पहावे.
चंद्र दर्शन: रात्री 9 वाजून 59 मिनिट
अंगारकी संकष्टी चतुर्थी श्री गणपती बाप्पाची पूजा :
– प्रतेक सणावाराला व व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून पूजेला बसावे.
– पूजेला बसताना लक्षात ठेवावे की आपले तोंड उत्तर दिशेला असले तर उत्तम किंवा पूर्व दिशेला असले तरी चालेल.
– स्वच्छ आसन ठेवून त्यावर पूजा करायला बसावे.
– गणपतीच्या मूर्तीला अभिषेक करून हळद-कुंकू अक्षता अर्पण करून लाल रंगाचे फूल व दूर्वा अर्पण कराव्या. गणपती बाप्पाना लाल रंगाचे फूल व दूर्वा फार प्रिय आहेत. तसेच फूल अर्पण करताना आपल्या मनातील इच्छा व्यक्त करावी व ती पूर्ण होण्यास प्रार्थना करावी.
– पूजा अर्चा झाल्यावर पुढील मंत्र मनपूर्वक म्हणावा.
. ॐ गणेशाय नमः किंवा ॐ गं गणपते नमः- दोन्ही मंत्रापैकी कोणताही एक मंत्र घेऊन त्याचा मंत्र जाप करावा. मंत्र म्हणण्याच्या अगोदर एकदा मनोभावे गणपती बाप्पाचे स्मरण करावे मग मंत्र जाप सुरू करावा.
– पूर्ण दिवस उपवास करून मग संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर प्रसाद दाखवून उपवास सोडावा. भोग दाखवताना त्यामध्ये शक्यतो मोदक दाखवावे कारण गणपती बाप्पाना मोदक अति प्रिय आहेत.
अंगारकी संकष्टी चतुर्थी चे महत्व:
अंगारकी संकष्टी चतुर्थी च्या दिवशी गणपती पूजनचे महत्व आहे. आपण ह्या अगोदर पहिले की मंगळवार ह्या दिवशी अंगारकी संकष्टी चतुर्थी येणे म्हणजे चांगला योग असतो. तसेच आपल्या संतानसाठी दीर्घायुषसाठी व चांगले आरोग्यसाठी सुद्धा महिला हे व्रत आहे. तसेच माता पार्वतीच्या म्हणण्यानुसार शंकर भगवान हयानी गणपती ला दुसरे मुख दिले होते त्यामुळे गणपती असे नाव पडले. त्यामुळे चतुर्थीचे व्रत करण्याची पद्धत चालू झाली.
अजून एक कथा अशी आहे की मंगळ देवानी गणपती बाप्पाना प्रसन्न करण्यासाठी कठोर व्रत केले मग प्रसन्न होऊन गणेश भगवान हयानी त्यांना दर्शन दिले होते. व त्यांना वरदान दिले की मंगळवार ह्या दिवशी चतुर्थी आलीकी मंगळ ह्या ग्रहाची पूजा करावी. भगवान गणेश त्यांच्या सर्व बाधा अडचणी दूर करेल त्याच बरोबर त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण करेल.