आषाढी एकादशी उपवास स्पेशल डिश अगदी निराळी करून बघा नक्की आवडेल
उपवास म्हंटले की आपण उपवासाचे नानाविध पदार्थ बनवतो. परत आषाढी एकादशी असेल तर विचारुच नका. मराठीमध्ये एक म्हण आहे “एकादशी व दुप्पट खाशी”. आपण उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणा वडा किंवा भगर बनवतो. असे म्हणतात की संकष्टीच्या दिवशी भगर उपवासाला चालत नाही पण आपण इतर उपवसाच्या दिवशी भगर सेवन करू शकतो.
आता आपण भगर व बटाटा वापरुन एक छान नवीन उपवासाचा पदार्थ बनवणार आहोत.
The Marathi Ashadhi Ekadashi Upvas Special Dish can of be seen on our YouTube Channel of Fasting Special Dish
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहीत्य:
1 वाटी वरई
2 मध्यम आकाराचे बटाटे
1 टे स्पून तूप
2-3 हिरव्या मिरच्या
1 टी स्पून जिरे
2 टे स्पून कोथिंबीर
2 टे स्पून शेंगदाणे कूट
1 टे स्पून डेसिकेटेड कोकनट
मीठ चवीने
तेल शालो फ्राय करण्यासाठी
कृती:
प्रथम बटाटे धुवून सोलून मोठ्या भोकाच्या किसणीने किसून घ्या. मग 2-3 वेळा स्वच्छ पाण्यानि धुवा. म्हणजे त्यामधील बटाट्याचा राप निघून जाईन. हिरवी मिरची व कोथिंबीर धुवून चिरून घ्या. शेंगदाणे कूट बनवून घ्या. वरई धुवून घ्या. एका प्लेटला तूप लावून बाजूला ठेवा.
एका पॅनमध्ये 1 टे स्पून तूप गरम करून त्यामध्ये जिरे व हिरवी मिरची घालून थोडी गरम करून घ्या. मग त्यामध्ये 1 ½ कप पाणी घालून गरम होऊ द्या. पाणी गरम झालेकी त्यामध्ये कोथिंबीर व वरई घालून मिक्स करून पॅनवर दोन मिनिट झाकण ठेवा. दोन मिनिट झालेकी झाकण काढून मिश्रण हलवून घ्या. वरई शिजली की त्यामध्ये किसलेला बटाटा, शेंगदाणे कूट, डेसिकेटेड कोकनट, मीठ चवीने घालून मिक्स करून 2-3 मिनिट मंद विस्तवावर बटाटा शिजू द्या. बटाटा किसलेला आहे त्यामुळे लवकर शिजेल. आता विस्तव बंद करून मिश्रण तूप लावलेल्या प्लेटमध्ये काढून एकसारखे थापून घ्या व थंड करायला ठेवा. थंड झाल्यावर त्याच्या वड्या कापून घ्या. आपल्याला पाहिजे तेव्हडया वड्या फ्राय करून बाकीच्या वड्या हवाबंद डब्यात काढून फ्रीजमद्धे स्टोर करू शकता मग पाहिजे तेव्हा 2-3 दिवसांत परत वापरू शकता.
नॉनस्टिक पॅन गरम करून त्याला तेल लावून त्यावर कापलेल्या वड्या ठेवून बाजूनी थोडे तेल सोडून दोन्ही बाजूनी छान फ्राय करून घ्या.
गरम गरम उपवासच्या वड्या उपवासाच्या चटणी बरोबर सर्व्ह करा.