मिठाचे सोपे घरगुती उपाय तोटके सुख समृद्धीसाठी
मिठाचा वापर आपण जेवणात करतो त्यामुळे आपले जेवण टेस्टी लागते जर जेवणात मीठ नसेलतर आपले जेवण बेचव म्हणजेच आळणी लागते तसेच आपल्या जीवनाचे आह. जर आपल्या जीवनात सुख समृद्धी किंवा शांती नसेल तर आपल्याला आपले जीवन निराश वाटते.
आपले जीवन सुखी समाधानी होण्यासाठी काही घरगुती सोपे उपाय आहेत तेपण घरातील फक्त मीठ वापरुन. तुम्हाला आश्चर्य वाटले ना पण मीठ वापरुन ही उपाय आपण केले तर नक्कीच काहीतरी फरक पडेल व आपले जीवन सुखी समाधानी होईल.
The Marathi Astrological Home Remedies of Salt or Benefits of Salt can of be seen on our YouTube Channel: Salt Remedies Mithache Totke or Fayde
1. गृह कलहपासून वाचण्यासाठी:
घर म्हंटलेकी भांडण आलेच. पण घरात सतत भांडण होत असतीलतर खडे मीठ घेऊन त्यातील एक तुकडा बथरूममद्धे एका कोपऱ्यात ठेवाव. मग दर महिन्याला तो मिठाचा खडा बदलावा. त्यामुळे नवरा बायको मधील क्लेश कमी होतील किंवा होत नाहीत.
2. घरामध्ये धन संपत्तिचा प्रवाह राहण्यासाठी:
प्रेतक घरामध्ये धन संपत्तीचा अभाव दिसून येतो त्यासाठी एका ग्लाससमद्धे पाणी घेऊन त्यामध्ये थोडे मिक्स करून तो ग्लास नैऋत्य दिशेच्या कोपऱ्यात ठेवावा व त्याच्या मागे लाल रंगाचा दिवा लावावा. ग्लास मधील पाणी व मीठ रोज बदलावे.
3. वास्तुदोष दूर कसा करावा:
एका काचेच्या बाउलमध्ये खडे मीठ घेऊन ते बाउल बाथरूम किंवा टॉयलेट मध्ये ठेवावे. दर आठोडयाला मीठ बदलावे. तसेच गुरुवार सोडून बाकीच्या दिवशी घरात पोछा मारताना पाण्यात मीठ घालावे.
4. रोगापासून मुक्ती मिळवण्यासाठी:
घरात जर कोणी जुन्या आजारापासून पीडित असेल तर त्याच्या उशाशी एका काचेच्या बाउलमध्ये मीठ ठेवावे. एका आठोडयानंतर मीठ बदलावे. असे केल्याने तब्येतीत सुधार होतो.
5. मन बेचैन असेल तर शांत करण्यासाठी:
जर आपले मन बेचैन आहे किंवा अशांत आहे तर अंघोळीच्या पाण्यात थोडे खडे मीठ घालावे व त्या पाण्यानि आंघोळ करावी किंवा आपल्या दोन्ही हातात मीठ घेऊन थोडा वेळ तसेच ठेवावे मग मग ते मीठ वॉशबेसिनमध्ये टाकावे
6. शनीची पीडा किंवा प्रभावापासून वाचण्यासाठी:
जर आपल्या जेवणात मीठ कमी असेल तर वरतून मीठ कधीसुद्धा घेऊ नये. त्याच्या आयवजी काळे मीठ घ्यावे त्यामुळे शनी, चंद्र व मंगळचा दुष्परिणाम होत नाही.