आपण पूर्ण दिवस खूप काम करतो त्यासाठी रात्री आपल्याला चांगली झोप येणे जरुरीचे आहे. त्यामुळे मेंदू शांत होऊन आपल्या हृदयाचे व रक्त वाहिन्यांचे कार्य चांगले राहते त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहते. जर आपली झोप नीट झाली नाहीतर हृदय रोग, किडनीच्या रोगाच्या समस्या, हाय ब्लड प्रेशर, डायबीटीज व स्ट्रोकचा धोका वाढतो. जगामध्ये लाखो लोकांना अनिद्राच्या समस्या आहेत. काही जणांना झोप येणे फार मुश्किल होते. रात्री चांगली झोप आली नाही तर दुसऱ्या दिवशी आळस येतो व आपले शरीर व मन थकल्या सारखे होते.
The Marathi Home Remedies For Sleeping Problems can of be seen on our YouTube Channel of Home Remedies for Good Sleep at Night
रात्रीच्या वेळी चांगली झोप येणे ही महत्वाचे आहे त्यामुळे आपले शरीर स्वास्थ संतुलित राहते व मेंदूला आराम मिळतो. जर रात्रीच्या वेळी सारखी झोपमोड होत असेल किंवा शांत झोप येत नसेलतर काही घरगुती उपाय करून पहा.
चांगली झोप येण्यासाठी जिरा आहे फायदेमंद आहे. आपणा सर्वाना जिरे माहीत आहेच त्यामध्ये बरेच गुण आहेत. आयुर्वेदामद्धे त्याचे महत्व आहे झोप येत नसेल तर त्यासाठी जिरे खूप फायदेमंद आहेत. गरम दूध सेवन करणे झोप येण्यासाठी उपयोगी आहे त्याच बरोबर त्यामध्ये जायफळ पावडर मिक्स करून सेवन केले तर अनिद्रा ची समस्या दूर होईल.
चांगली झोप येण्यासाठी घरगुती सोपे उपाय:
तेल मालिश:
आपल्या डोक्याला व तळपायाल भृंगराज तेल लाऊन मालीश केलेतर चांगली झोप येण्यास मदत होते. ह्या तेलानी मालीश केलेतर नर्वस सिस्टमला आराम मिळतो.
दिवसाचे वेळापत्रक तयार करा:
आपण आपल्या दिवसाचे वेळापत्रक तयार करून रात्रीच्या वेळी वेळेवर झोपायला बेडवर गेलो तर निश्चितच त्याचा चांगला परिणाम आपल्याला पाहायला मिळेल. जर वेळेवर झोपायची सवय नाही लावली तर आपल्याला अनिद्राच्या समस्याला तोंड द्यावे लागेल.
गरम दुधाचे सेवन करावे:
दुधामद्धे ट्रिपटोपॉन आहे त्यामुळे झोप चांगली येण्यास मदत होते. रोजरात्री झोपताना गरम दूध सेवन केलेतर चांगली झोप येण्यास मदत होते. तर रोज रात्री झोपताना एक कप गरम दुधात ½ टी स्पून दालचीनी पावडर मिक्स करून सेवन करावे त्यामुळे चांगली झोप येते.
जायफळ:
गरम दूध सेवन करणे चांगले आहे त्याच बरोबर जायफळ पावडर मिक्स करून सेवन केले तर अनिद्राच्या समस्या दूर होऊन चांगली झोप येते. झोपताना एक कप दुधात दोन चिमूट जायफळ पावडर मिक्स करून सेवन करावे. किंवा फ्रूट ज्यूसमद्धे जायफळ पावडर मिक्स करून प्यावे.
केशरचा उपयोग:
चांगली झोप येण्यासाठी केशरचा वापर करावा. एक कप गरम दुधात दोन चिमूट केशर मिक्स करून सेवन करावे. त्याने सुद्धा चांगली झोप येते.
जिरे फायदेमंद:
जिरेमध्ये औषधी गुण भरपूर आहेत. आयुर्वेदिक चिकित्सामध्ये झोप येण्यासाठी जिरे फायदेशीर आहेत. झोपताना जिरे घालून चहा सेवन करावा. एक कप दूध, एक चमचा जिरे व एक केळे मिक्स करून रात्री झोपण्याच्या अगोदर सेवन करावे. जिऱ्यामध्ये मेलाटोनिन आहे त्यामुळे अनिद्रा व झोपेच्या तक्रारीवर होणाऱ्या जिरे चांगले काम करते. मेलाटोनिन ही एक असे हार्मोन आहे जे झोप येण्यासाठी मदत करते.