गुरु पूर्णिमा 2021 मंत्र व उपाय आपली किस्मत चमकेल
गुरु पूर्णिमा ह वर्षी 24 जुलै 2021 ह्या दिवशी आहे. हिंदू पंचांग नुसार दरवर्षी आषाढ महिन्यात गुरु पूर्णिमा साजरी केली जाते. ह्या दिवशी गुरुची पूजा करण्याचे विशेष महत्व आहे. भारतात गुरु पूर्णिमा हा दिवस खूप श्रद्धा पूर्वक मानला जातो.
The Marathi Guru Purnima 2021 can of be seen on our YouTube Channel of Guru Purnima 2021 Muhurat Mantra And Upay
धार्मिक शास्त्रामध्ये सुद्धा गुरूचे महत्व फार आहे. गुरूला देवांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ मानले जाते. कारण की गुरुच आपल्याला देवा पर्यन्त जाण्याचा मार्ग दाखवतो. गुरुच्या कृपेने सर्व साध्य होत असते. गुरुच्या मुळे आपल्याला ज्ञान प्राप्त होते. गुरु आपल्याला सर्व संकटामधून बाहेर काढत असतो.
गुरु पूर्णिमा ह्या दिवशी वेद व्यास ह्यांचा जन्म झाला होता त्यामुळे ह्या दिवसाला व्यास पूर्णिमा सुद्धा म्हणतात. असे म्हणतात की वेदव्यास हयानी सर्वात पहिल्यांदा चारी वेदाचे ज्ञान दिले होते त्यामुळे महर्षि व्यास ह्यांना पहिल्यांदा गुरुची उपाधी दिली गेली.
गुरु पूर्णिमा ह्या दिवशी काही सोपे उपाय केलेतर आपल्याला बऱ्याच क्षेत्रामध्ये लाभ मिळू शकतो.
त्यासाठी काही सोपे उपाय:
गुरु पूर्णिमा ह्या दिवशी सकाळी लवकर उठावे स्वच्छ स्नान करून पांढरे किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. मग गुरुच्या फोटो समोर बसून नमन करावे. गुरु दक्षिणाच्या रुपामद्धे पिवळे वस्त्र भेट म्हणून द्यावे. आपल्या गुरुला प्रार्थना करा की आपल्याला नेहमी ज्ञान मिळावे व अहंकार पासून दूर ठेवावे.
ज्या लोकांचा भाग्योदय होत नाही व त्यांची आर्थिक स्थिति सुधारत नाही. त्या लोकानी गुरु पूर्णिमा ह्या दिवशी जरूरतमंद लोकांना पिवळे धान्य दान करावे किंवा पिवळ्या रंगाची मिठाई प्रसाद म्हणून वाटावी. असे केल्याने आपले भाग्य चमकेल.
ज्या मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नाही किंवा अभ्यासात अडचणी येतात अश्या मुलांनी गुरु पूर्णिमा ह्या दिवशी गीता ह्या ग्रंथाचे वाचन करावे. व गाईची सेवा करावी. असे केल्याने अभ्यासातील व्यत्यय दूर होईल.
ज्या मुलांच्या किंवा मुलींच्या वैवाहिक जीवनमध्ये अडचणी येत आहेत. किंवा लग्न होत नाही अश्या मुला-मुलीनी गुरु पूर्णिमा ह्या दिवशी गुरु यंत्राची स्थापना करून विधिपूर्वक पूजा करावी. हा उपाय बऱ्याच क्षेत्रा मध्ये सफलता देईल. व त्याच बरोबर वैवाहिक जीवनमध्ये अडचणी दूर होऊन सुखी जीवन जगाल.
आषाढ पौर्णिमेचा शुभ मुहूर्त
प्रारंभ २३ जुलै शुक्रवार सकाळी १० वाजून ३४ मिनिटे
समाप्ती २४ जुलै शनिवारी सकाळी ८ वाजून ६ मिनिटे.
ज्ञान व भाग्य वृद्धिच्या साठी मंत्र जाप करा
ॐ श्री गुरुदेव दत्त|
ॐ ग्रां ग्रीं ग्रौं स: गुरवे नम:।
ॐ ऐं श्रीं बृहस्पतये नम:।
ॐ गुं गुरवे नम:।
ॐ क्लीं बृहस्पतये नम:।