10 मिनिटांत चटपटीत कुरकुरीत इन्स्टंट पोह्याचा मेदुवडा
भारतामधील दक्षिणभाग म्हंटले की इडली सांबर, वडा सांबर खूप लोकप्रिय तसेच कालांतराने भारतभर लोकप्रिय सुद्धा झाले. वडा सांबर म्हंटले की आपल्या डोळ्यासमोर खमंग मेदू वडा डोळ्या समोर येते ही डिश चवीला अप्रतिम व चविष्ट लागते. मेदू वडा बनवताना उदीडदाळ भिजवून त्याचा मेदूवडा बनवतात. पण बरेच जणांना मेदूवडा खूप आवडून सुद्धा खाता येत नाही कारणकी तो पचायला जड असतो.
आज आपण मेदूवडा अगदी निराळ्या पद्धतीने पहाणार आहोत. त्यासाठी 5-6 तास उदीडदाळ भिजवून वाट पाहायची गरज नाही. आपण 10 मिनिटांत पोह्यापासून इन्स्टंट मेदुवडा बनवू शकतो.
The Marathi Crispy Medu Vada can of be seen on our YouTube Channel of Pohyache Medu Vade
बनवण्यासाठी वेळ: 10 मिनिट
वाढणी: 8-10 मेदुवडे बनतात
साहीत्य:
1 कप पोहे (जाड पोहे)
2 ब्रेड स्लाईस
1 छोटा कांदा (चिरून)
2 हिरव्या मिरच्या (चिरून)
1 टी स्पून चिली फ्लेस्क
1 टे स्पून कोथिंबीर (चिरून)
7-8 कडीपत्ता पाने (चिरून)
मीठ चवीने
तेल तळण्यासाठी
कृती: प्रथम पोहे स्वच्छ निवडून चाळीवर घेऊन त्यावर पाणी घालून निथळत ठेवा. आपण कांदा पोहे बनवताना कसे भिजवतो तसे) मग 10 मिनिट झाकून बाजूला ठेवा.
कांदा, हिरवी मिरची व कोथिंबीर चिरून घ्या. ब्रेड मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
एका मोठ्या आकाराच्या बाऊलमध्ये भिजवलेले पोहे, ब्रेडक्रम, हिरवी मिरची, चिली फ्लेस्क, कोथिंबीर, कडीपत्ता पाने, मीठ घालून मिक्स करून घ्या. 1 टे स्पून पाणी घालून मिश्रण मळले तरी चालेल.
मग त्याचे छोटे छोटे चपटे गोळे बनवून त्याला मध्ये भोक पाडून घ्या. आपण जसे मेदू वडा बनवताना करतो तसे. अश्या प्रकारे सर्व वडे बनवून घ्या.
एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मेदुवडे छान कुरकुरीत तळून घ्या.
गरम गरम पोह्याचे मेदुवडे टोमॅटो सॉस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करा.