2 चमचा तेल 5 मिनिटांत खुपसारे उपवासासाठी कुरकुरीत साबुदाणा वडा
साबुदाणा वडा महाराष्ट्रियन पद्धतीने अगदी कमीतकमी तेलात खुपसारे झटपट साबूदाणा वडा बनवा.
साबुदाणा वडा आपण उपवासाच्या दिवशी किंवा इतर वेळी ब्रेकफास्ट साठी सुद्धा बनवू शकतो.
उपवास म्हंटले की आपण तेलकट तुपकट पदार्थ सेवन करतो त्यामुळे आपल्याला त्याचा त्रास सुद्धा होतो. जर आपण अगदी कमीत कमी तेल वापरुन पदार्थ बनवला तर किती मस्त होईल.
The Marathi in 2 spoon Oil Crispy Tasty Sabudana Vada can of be seen on our YouTube Channel of Zatpat Sabudana Vada in Appe Pan
साबूदाणा वडा आपण डीप फ्राय करण्याच्या इयवजी आप्पे पत्रात झटपट कमी तेलात बनवू शकतो. छान कुरकुरीत होतात व टेस्टीसुद्धा बनतात.
साहीत्य:
1 कप साबूदाणा
2 मध्यम आकाराचे बटाटे
2 टे स्पून शेंगदाणा
2 टे स्पून ओला नारळ
2 टे स्पून कोथिंबीर (चिरून)
2 हिरव्या मिरच्या (चिरून)
1 टी स्पून साखर
मीठ चवीने
2 टे स्पून तेल
कृती: प्रथम साबूदाणा धुवून घ्या मग त्यामध्ये पाणी घाला (1 कप साबूदाणा असेलतर 1 कप पाणी घालून झाकून 5-6 तास भिजू द्या. शेगदाणे भाजून सोलून त्याचा कूट करून घ्या, बटाटे उकडून सोलून किसून घ्या. हिरव्या मिरच्या व कोथिंबीर चिरून घ्या.
एका बाऊलमध्ये भिजलेला साबूदाणा, उकडलेले बटाटे, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, शेंगदाणे कूट, मीठ व साखर घालून मिक्स करून घ्या. जरूर भासलीतर 1 टे स्पून पाणी घालून परत मिक्स करून घ्या. मग त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊन थोडेसे दाबून घ्या.
आप्पे पॅनला तेल लाऊन गरम करायला ठेवा. आप्पे पॅन गरम झाल्यावर त्यामध्ये बनवलेले साबूदाणा गोळे ठेवा बाजूनी थोडेसे तेल सोडून मंद विस्तव करून झाकण ठेऊन 4-5 मिनिट साबूदाणा वडे फ्राय करून घ्या. 5 मिनिट झाल्यावर झाकण काढून वडे उलट करून परत फ्राय करून घ्या. अश्या प्रकारे सर्व साबूदाणा वडे बनवून घ्या.
गरम गरम साबूदाणा वडे दही किंवा चटणी बरोबर सर्व्ह करा.