अंडी किंवा अंडे सेवन करण्याचे फायदे व तोटे अंडे का फंडा
अंडी किंवा अंडे सेवनाचे डायबिटीज व हृदय रोग असणाऱ्याना काय धोका आहे ते जाणून घ्या.
आता जगभर महामारीने लोक त्रासले आहेत. त्यासाठी आपली रोग प्रतिकार शक्ति वाढायला पाहिजे ह्यासाठी डॉक्टर सल्ला देतात उकडलेली अंडी खा त्याने रोग प्रतिकार शक्ति वाढेल.
अंड्यामद्धे प्रोटीन, कैल्शियम व ओमेगा-3 फैटी एसिड अशी तत्व आहेत. ही सर्व तत्व आपल्या शरीरासाठी जरुरीची आहेत. त्याच बरोबर कैल्शियम हे आपळ दात व हाडे मजबूत ठेवते.
आपण जसे रोज भाज्या सेवन करतो त्याच बरोबर अंडी सुद्धा सेवन केली पाहिजेत. कारण की त्याचे औषधी गुणधर्म बरेच आहेत. त्याच बरोबर आपल्या शरीराची रोग प्रतिकार शक्ति वाढते.
The Marathi Health Benefits of Eggs can of be seen on our YouTube Channel of Health Benefits Of Eating Eggs
अंडी आपले आरोग्य चांगले ठेऊ शकते त्याच बरोबर ते बेघडवू सुद्धा शकते. आपल्याला ही चेष्टा वाटत असेल पण ही सत्य आहे. कारणकी रोज अंडी सेवन केली तर ब्लड कोलेस्ट्रॉल वाढू शकते. त्यामुळे हृदयरोगाची चिंता वाढू शकते. तसेच रोज अंडी सेवन केल्याने उच्च कैलोरीने शरीराचे वजन वाढू शकते. म्हणूनच आपल्या नाश्तामध्ये अंडे सेवन करणे फायदेशीर आहे का नुकसान दायक आहे ते जाणून घ्या.
रोज अंडी सेवन करण्याने होते नुकसान:
पूर्ण अंड्यामद्धे कैलोरी, वसा व कोलेस्ट्रॉल उच्च मात्रा आहे. पण रोज जास्त अंडी सेवन केलीतर ब्लड कोलेस्ट्रॉलचा स्तर वाढून हृदय रोग होऊ शकतो. तसेच उच्च कैलोरीच्या मुळे शरीराचे वजन वाढू शकते. जर आपण अंड्यातील फक्त पांढरा भाग सेवन केलातर कैलोरी, वसा व कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकतो. जर अंड्यातील पिवळा भाग म्हणजेच योक जास्त प्रमाणात सेवन केले तर काय होऊ शकते.
अंड्यामद्धे जास्त प्रमाणात कैलोरी आहेत:
एका अंड्यामद्धे साधारणपणे 75 कैलोरी असून नाश्तामध्ये तीन अंडी म्हणजे 225 कैलोरी मिळतात त्यामुळे जास्त प्रमाणात कैलोरी सेवन करण्याने वजन वाढू शकते.
प्रमाणात योग्य पद्धतीने अंडे सेवन करा:
अंड्याच्या पिवळ्या भागामध्ये कोलेस्ट्रोल व फैट जास्त प्रमाणात असते. म्हणून आपल्या चांगल्या आरोग्यासाठी अंडे उकडल्यावर त्यातील पिवळा भाग (योक) काढून मग पांढरा भाग सेवन केले पाहिजे. त्यामुळे शरीराला नुकसान न होता फायदाच होतो.
अंडी उकडतान नीट उकडावी:
जर अंडे नीट पूर्ण उकडले गेले नाही व थोडेजरी कच्चे राहिले तर त्यामुळे फूड प्वाइजनिंग होऊ शकते. त्याच बरोबर शरीरावर सूज किंवा उल्टी किंवा पोट बिघडू शकते. अंडी नेहमी चांगल्या दुकानातून ताजी घ्यावीत. जर जुनी अंडी किंवा खराब अंडी सेवन केल्याने रोग होऊ शकतात.
असे रोग असणाऱ्या लोकानी रोज अंडी सेवन करू नये:
ज्याना हाय ब्लड प्रेशर, डाइबिटीज़ व हृदय संबंधी रोग आहेत त्यांनी अंड्यातील पिवळा भाग सेवन करू नये. कारणकी पिवळ्या भागामध्ये जास्त प्रमाणात कोलोस्ट्रोल आहे. ते हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. जास्त प्रमाणात अंडी सेवन केल्याने लकवा, नपुंसकता, पाय दुखणे, वजन वाढणे ह्या समस्या होऊ शकतात.
अंडी किंवा अंडे सेवन करण्याचे फायदे:
आपण ह्या अगोदर पहिले आहेच की अंड्यामद्धे प्रोटीन, कैल्शियम व ओमेगा-3 फैटी एसिड अशी तत्व आहेत. ही सर्व तत्व आपल्या शरीरासाठी जरुरीची आहेत. त्याच बरोबर कैल्शियम हे आपळ दात व हाडे मजबूत ठेवते.
अंडे सेवन केल्याने शरीराला जरूरी असणारे अमीनो एसिड मिळते त्यामुळे स्टैमिना वाढत.
अंड्यामद्धे विटामिन ए आहे ते आपल्या केसांना मजबूत करते. त्याच बरोबर डोळ्याची रोशनी वाढवते.
अंड्यामद्धे असणारे फोलिक एसिड व विटामिन बी-12 स्तन कैंसर होण्या पासून वाचवते. विटामिन बी-12 मेदूचे आरोग्य चांगले ठेवून स्मरणशक्ती वाढवते.
गर्भवती महिलानी आपल्या जेवणात अंड्याचे सेवन करावे त्यामुळे बाळाची वाढ चांगली होते.
अंडी सेवनाचे तोटे किंवा नुकसान:
आपण ह्या अगोदर पाहिले आहे की जर अंडे नीट पूर्ण उकडले गेले नाही व थोडेजरी कच्चे राहिले तर त्यामुळे फूड प्वाइजनिंग होऊ शकते. त्याच बरोबर शरीरावर सूज किंवा उल्टी किंवा पोट बिघडू शकते.
अंडी जास्त प्रमाणात सेवन केल्यामुळे कैंसर होण्याचा संभव असतो. नवीन रिसर्च नुसार आठोडयातून तीन पेक्षा जास्त अंडी सेवन करू नये नाहीतर प्रोस्टेट कैंसर होण्याचा धोका संभवतो.
ज्याना हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज व हृदय संबंधी रोग आहेत त्यांनी अंड्यातील पिवळा भाग (योक) सेवन करू नये. कारण त्यामध्ये कोलोस्ट्रोल जास्त प्रमाणात असते.
जास्त प्रमाणात अंडी सेवन केल्याने लकवा, नपुंसकता, पाय दुखणे, वजन वाढणे ह्या समस्या होऊ शकतात.
नोट: अंडी किती व केव्हा सेवन करावीत त्यासाठी डॉक्टरी सल्ला जरूर घ्यावा.