स्वीट कॉर्न वापरुन अगदी नवीन डिश बनवा घरातले म्हणतील ह्या अगोदर का नाही बनवली
आता स्वीट कॉर्न चा सीझन आहे त्यामुळे बाजारात आपल्याला अगदी मुबलक प्रमाणात स्वीट कॉर्न उपलब्ध होऊ शकतात. स्वीट कॉर्नच्या आपण बऱ्याच प्रकारच्या डिश बनवू शकतो. आपण स्वीट कॉर्न सूप, चटपटे स्वीट कॉर्न किंवा स्वीट कॉर्न भेळ किंवा स्वीट कॉर्न पकोडा बनवू शकतो.
The Marathi Sweet Corn New Recipe for Breakfast or Starter can of be seen on our YouTube Channel of Sweet Corn Different Recipe
आज आपण स्वीट कॉर्नचा एक नवीन पदार्थ बनवणार आहोत. अश्या प्रकारचा पदार्थ आपण ब्रेकफास्टसाठी किंवा दुपारी चहा बरोबर किंवा जेवणात सुद्धा बनवू शकतो. बनवायला अगदी सोपी व झटपट होणारी आहे.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहित्य:
1 कप स्वीट कॉर्न दाणे
1 छोटे गाजर (धुवून, सोलून बारीक चिरून)
1 छोटी शिमला मिरची (बारीक चिरून)
1 टे स्पून कोथिंबीर (धुवून बारीक चिरून)
2 हिरव्या मिरच्या (चिरून)
1/2 “ आले (चिरून)
½ टी स्पून लाल मिरची पावडर
¼ टी स्पून हळद
¼ टी स्पून हिंग
½ टी स्पून गरम मसाला
½ टी स्पून काळे मीठ
½ टी स्पून धने-जिरे पावडर
मीठ चवीने
2 टे स्पून बेसन
1 टे स्पून तांदळाचे पीठ
तेल फ्राय करण्यासाठी
कृती:
प्रथम कणीस धुवून सोलानेच्या (साले काढायच्या यंत्रांनी) स्क्रॅप करून दाणे काढून घ्या. कोथिंबीर, आले, हिरवी मिरची बारीक चिरून घ्या. गाजर सोलून बारीक चिरून घ्या. शिमला मिरची धुवून बारीक चिरून घ्या.
एका बाउलमध्ये स्वीट कॉर्नचे स्क्रॅप केलेले दाणे, चिरलेले गाजर, शिमला मिरची, कोथिंबीर, आले, हिरवी मिरची, लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला, धने-जिरे पावडर, काळे मीठ, मीठ चवीने, बेसन, तांदळाचे पीठ घालून मिक्स करून घ्या. पाणी आजिबात वापरायचे नाही.
मग मळलेल्या पिठाचे छोटे छोटे पॅटीस बनवून घ्या. इडली स्टँडला तेल लावून त्यामध्ये एक एक पॅटीस ठेवा मग 12-15 मिनिट वाफवून घ्या.
पॅनला तेल लावून घ्या. त्यामध्ये वाफवलेले पॅटीस ठेवा. बाजूनी तेल सोडून दोन्ही बाजूनी छान खमंग शालो फ्राय करून घ्या.
गरम गरम स्वीट कॉर्न चा नवीन पदार्थ टोमॅटो सॉस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करा.