10 अमेझिंग किचन टिप्स ऑर ट्रिक्स फॉर बिगिनर्स
मुली नवीन स्वयंपाक करायला शिकतात तेव्हा त्यांच्या साठी उपयुक्त किचन टिप्स आहेत. बरेच वेळा पदार्थ बनवताना त्यासाठी काही सोप्या टिप्स किंवा ट्रिक्स वापरल्या तर त्या जास्त उपयोगी पडतात व वेळ वाचून आपला पदार्थ मस्त बनतो.
The Marathi 10 Amazing Useful Kitchen Tips And Tricks For Beginners can of be seen on our YouTube Channel of Useful Kitchen Tips And Tricks
अश्याच काही सहज सोप्या टिप्स आहेत त्या आचरणात आणून आपण आपले पदार्थ छान बनवू शकता.
1. पुरी बनवताना:
बऱ्याच जणांची तक्रार असते की पुरी फुलत नाही. आपली पुरी छान टम फुगून खुसखुशीत व्हायची असेलतर पुरीचे पीठ भिजवताना त्यामध्ये 2 टे स्पून मैदा व 2 टे स्पून रवा व 1 टे स्पून तेल घालून मिक्स करून अगदी घट्ट पीठ मळावे म्हणजे पुरी लाटताना त्याचा शेप बिघडत नाही व छान फुलते.
2. पावभाजीची भाजी:
आपण रेस्टोरंटमध्ये पावभाजी ऑर्डर करतो त्याभाजीचा रंग खूप छान लालसर असतो. आपण घरी तशीच भाजी बनवू शकतो व तसंच सेम रंग येण्यासाठी भाजी बनवतांना त्यामध्ये थोडे बीटरूट उकडून त्याचा लगदा करून घालू शकतो. त्यामुळे भाजीला चांगला रंग येतो व टेस्ट सुद्धा चेंज होत नाही.
3. दहिवडा अगदी छान बनण्यासाठी:
आपण उडीद डाळ भिजवून वाटून घेतो व त्याचे वडे बनवतो पण त्यामुळे वडे हलके होत नाहीत व आतमध्ये थोडे घट्टसर राहतात. वडे छान बनवण्यासाठी डाळ वाटल्यावर त्यामध्ये एक उकडलेला बटाटा किसून घालून चांगले फेटून घ्यावे.
4. साबूदाणा खीर बनवताना आपण साबूदाणा भिजवून दुधात घालतो. अगोदर दूध गरम करून घ्या. एका जाड बुडाच्या कढईत आतून थोडे तूप लाऊन त्यामध्ये भिजवलेला साबूदाणा घालून थोडा परतून घ्या. मग त्यामध्ये उकळलेले दूध घालून उकळी आलीकी साखर घालून परत उकळी आणा खीर मस्त होईल.
5. आपण इडलीचे पीठ तयार झालेकी त्यापासून इडली, डोसा, उत्तपा बनवतो मग पीठ उरलेकी आपण तसेच फ्रीजमद्धे ठेवतो मग ते थोडे आंबुस होते. तेव्हा त्यामध्ये थोडे नारळाचे ताजे दूध काढून मिक्स करावे. डोस अगदी मस्त होतात.
6. राजमा पंजाबी स्टाईल:
राजमा बनवताना त्यामध्ये एक उकडलेला बटाटा सोलून किसून घालावा त्यामुळे राजमा मसालाला छान टेस्ट येते व ग्रेव्ही घट्टसर होते.
7. तांदळची खीर बनवताना:
तांदळाची खीर बनवताना त्यामध्ये थोडा रवा भाजून घाला छान घट्टसर होते व टेस्ट सुद्धा छान येते.
8. कोशिंबीरमध्ये दही घातल्यावर थोडा वेळाने ती पातळ होते:
कोशिंबीरमध्ये दही घातल्यावर ती पातळ होते व संध्याकाळ पर्यन्त रहात नाही. तर कोशिंबीर बनवताना दही अगोदरच एका कापडात बांधून थोडावेळ लटकवून ठेवावे म्हणजे दहयामधील जास्तीचे पाणी निघून जाईन.
9. कॉफी बनवताना आपण जायफळ वापरतो:
कॉफी बनवताना आपण जायफळ वापरतो पण प्रेतक वेळेस जायफळ उगाळत बसण्यामध्ये वेळ वाया जातो. तेव्हा जेव्हा आपण कॉफी पावडर आणतो तेव्हाच त्याच्यामध्ये जायफळ पावडर बनवून मिक्स करून घ्या.
10. आपण मुळा किसतो मग त्याचे सुटलेले पाणी फेकून देतो:
मुळा किसून झाल्यावर त्याचे पाणी सुटते ते पाणी फेकून न देता ते आमटीमध्ये घालावे आमटी चवीला छान लागते व मुळयाचे सुटलेले पाणी गुणकारी सुद्धा असते.