20 Amazing Health Benefits of Papaya Benefits In Marathi

Health Benefits of Papaya Benefits
Health Benefits of Papaya Benefits

पपई सेवनाचे औषधी गुणधर्म व त्याचे अनगिनत फायदे 

पपई आपल्याला बाजारात अगदी सहज उपलब्ध होते. पपई कच्ची असो वा पिकलेली आपल्याला बाजारात कुठे सुद्धा मिळते. कच्ची पपई मध्ये खूप औषधी गुण असतात. बऱ्याच रोगावर ती गुणकारी आहे.

आयुर्वेदमध्ये पपई खूप पौष्टिक आहे असे मानले जाते त्याच्या मुळे दांत, घसा, जिभे वरचे घाव, सूज, अश्या प्रकारच्या रोगावर गुणकारी आहे. म्हणजेच औषधाचे काम करते.

पपई कच्ची असो वा पिकलेली त्यामध्ये मिनरल, विटामीन, प्रोटीन, एनर्जी आहे. तसेच ती कफ व वात कमी करते. पपई कापल्यावर त्यामधील पांढरा चिक पाचक आहे.

The Marathi 20 Amazing Health Benefits of Papaya Benefits can of be seen on our YouTube Channel of 20 Amazing Health Benefits of Papaya Benefits

Health Benefits of Papaya Benefits
Health Benefits of Papaya Benefits

पपईच्या सेवनाचे फायदे
पपईमध्ये विटामीन “A” , “C” फायबर, पोटॅशियम, एनर्जी सारखे पौष्टिक तत्व आहेत. पोपईच्या झाडांची पाने, बिया व मुळ व फळ हे उपचारासाठी वापरले जाते.

तोंडांमद्धे छाले किंवा घाव ठीक करण्यासाठी फायदेमंद:
बऱ्याचवेळा औषधाची एलर्जी किंवा आजारपणामुळे त्याचे काही साईड इफेक्ट म्हणून विटामीनची कमतरता होते व त्यामुळे तोंडामध्ये छाले येतात. त्यासाठी पोपईचे दूध जिभेवर लावल्याने घाव बरे होण्यास मदत होते.

दात दुखीवर लाभदायक पपई:
जर तुम्ही दात दुखी पासून त्रस्त आहात तर पोपई सेवन केल्याने लवकर आराम मिळू शकतो. पोपईचे दूध कापसाच्या सहायानी दुखणाऱ्या दातावर लावले तर आराम मिळतो.

घसा दुखीवर पोपई:
थंडीच्या दिवसांत बरेच वेळा घसा दुखतो किंवा घशाला आतून सूज येते तेव्हा पपई सेवन केल्यास लवकर आराम मिळतो. किंवा पोपईचे दूध पाण्यात मिक्स करून त्यानी गुळण्या केल्यास आराम मिळतो.

शरीरातील कमजोरी दूर करते पपई:
जर बरेच दिवसांपासून आजारी असाल व पौष्टिकताची कमी झाली असेलतर अशक्तपणा येतो तेव्हा पोपई सेवन केल्याने फायदा होतो. किंवा कच्ची पपई वापरुन त्याचा पदार्थ बनवून सेवन केल्याने कमजोरी दूर होते.

डायरिया दूर करते पपई:
जर जास्त मसालेदार जेवण किंवा बाहेरचे जेवण सेवन केल्याने डायरिया थांबत नसेलतर पपई गुणकारी आहे.
पिकलेल्या पपईच्या बिया भाता बरोबर सेवन केल्याने जुलाब थांबतात. किंवा कच्ची पपई वापरुन त्याची भाजी बनवून सेवन केल्याने आराम मिळतो.

लिव्हरच्या आजारांवर गुणकारी पोपई:
जर काही लिव्हर संबंधित काही तक्रारी असतील तर पपई सेवन केल्याने दूर होतात.

पैरालिसिस किंवा अर्धांगवायूसाठी पोपई गुणकारी:
पैरालिसिस किंवा अर्धांगवायू झाला असेल तर त्यासाठी पपईच्या बियांपासून तेल काढून गाळून त्याने मालीश केल्यास बऱ्याच प्रमाणात फायदा होउ शकतो.

त्वचा विकारांसाठी फायदेमंद पपई:
आजकाल नवीन नवीन कॉस्मेटिक प्रॉडक्ट बनत असून त्यापासून त्वचा रोग होण्याची भीती निर्माण झाली आहे त्यासाठी घरच्या घरी पोपई पासून घरगुती उपाय केले तर त्यापासून फायदा होउ शकतो.
पपईच्या झाडपासून जो रस येतो तो रस त्वचेवर लावल्यास फायदेमंद होतो.

रिंगवर्म किंवा खाज त्यासाठी फायदेमंद पपई:
आजकालच्या प्रदूषणमध्ये आपल्या त्वचेला खाज येते किंवा रिंगवर्म येतात तेव्हा अश्या परेशानीला पपई फायदेमंद आहे.
पपईच्या बिया वाटून त्यामध्ये ग्लिसरीन मिक्स करून रिंगवर्मच्या भागावर लावल्यास आराम मिळतो.

सूजआली असेलतर कमी करते पपई:
जर काही कारणांनी शरीरावर जखम झाली असेलतर व तेथे सूज आली असेलतर त्या भागावर पोपईचा गर वाटून लावल्यास सूज कमी होते.

कोलेस्ट्रॉल कमी करण्यास फायदेमंद पपई:
पपईचे सेवन कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. कारणकी पपईमध्ये एंटीऑक्सीडेंट गुण आहेत. ते कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते.

रोग प्रतिरक्षक क्षमता वाढवण्यास मदत करते पपई:
रोग प्रतिरोधक क्षमता वाढवण्यासाठी पपईचे सेवन करावे. कारण त्याच्या मध्ये रोग प्रतिकार शक्ति वाढवण्याचे गुण आहेत.

डोळ्याचे आरोग्य चांगले राहून दृष्टी सुधारते पपई:
पपईमध्ये विटामीन “A” व “C” आहे त्यामुळे तो डोळ्याच्या आरोग्यासाठी फायदेमंद आहे.

पाचन तंत्र नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेमंद पपई:
पपईच्या सेवनाने पचन तंत्र चांगले राहते कारण की त्यामध्ये तसे गुणधर्म आहेत. तसेच बुद्धकोष्टता सुद्धा दूर होण्यास फायदेमंद आहे.

मासिक पाळीच्या वेळी होणारे दुखणे दूर करते पपई:
मासिक पाळीच्या वेळी वात दोषांमुळे दुखणे येते ते पपईच्या सेवनाने दूर होते कारण त्यामध्ये तसे गुणधर्म आहेत.

शरीराचे वजन कमी करण्यास फायदेमंद पपई:
पपईमध्ये शरीराचे वजन कमी करण्याचे गुण आहेत त्यामुळे नियमित पोपईचे सेवन करा. त्यामुळे पचन तंत्र चांगले राहून विषारी द्रव बाहेर पडण्यास मदत होते.

डायबिटीजच्या लक्षणा पासून बचाव करते पपई:
डायबिटीज च्या लक्षणाना कमी करते पपई. पोपई च्या बियांचे सत्व हे लाभदायक आहे कारण की त्यामध्ये एंटी डायबिटिक गुण आहेत

मनावरील तनाव कमी करण्यास मदतगार:

जर आपण काही कारणांमुळे डिप्रेशनचे शिकार झाला असला तर पपईचे सेवन करणे फायदेमंद आहे. कारणकी त्यामध्ये एंटी डिप्रेशन गुण आहेत.

डेंगू किंवा चिकनगुनिया चा ताप येत असेल तर पपईची पाने गुणकारी:
डेंगू किंवा चिकनगुनिया चा ताप येतो तेव्हा रक्तातील प्लेटलेट कमी होतात त्यामुळे आपल्या जीवाला धोका होउ शकतो तेव्हा पपईच्या पानाचा रस काढून सेवन करावा त्यामुळे रक्तातील प्लेटलेट लवकर वाढतात.

केसांचे आरोग्य चांगले ठेवते पपई:
आपले केस सुंदर, चमकदार व डेनड्रफ फ्री ठेवण्यासाठी आठोडयातून एकदा पोपईचा पॅक लावा. त्यासाठी पपईचा गर व दही मिक्स करून केसांवर लावावे व 20-25 मिनिट तसेच ठेवून स्वच्छ शांपुनी केस धुवावे.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.