रोज सकाळी सेवन करा केळी व दही आणि पहा अनगिनत फायदे
केळी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावाह आहेत. सर्वांना केळे खाणे आवडते. आपण केळी व दूध ह्याचे नेहमी सेवन करतो. पण आपल्याला माहीत आहे का? की दूध व दही खाणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावाह आहे. तसेच त्याचे काय फायदे आहेत. त्याच्या सेवनाने आपल्या आरोग्याच्या समस्या दूर होतात. कारण की दही मध्ये भरपूर चांगल्या प्रमाणात बैक्टीरिया, कैल्शियम, विटामिन्स व मिनरल्स आहेत. त्याच बरोबर केळ्यामध्ये विटामिन, आयर्न व फाइबर आहे. ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. केळे व दही आपण आपल्या ब्रेकफास्टमध्ये शामील करू शकतात.
The Marathi 6 Benefits of Having Curd And Banana For Breakfast can of be seen on our YouTube Channel of Benefits of Having Curd And Banana
आपल्या आसपास बऱ्याच प्रकारच्या चीज जे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावाह आहे. अशी बरीच कॉम्बिनेशन आहेत त्याच्या सेवनाने आपल्या शरीराला फायदे होतात.
आपण पाहू या केळे व दही ह्याच्या सेवनाने फायदे काय होतात ते पाहू या
1. पोटा संबंधीत तक्रारी दूर होतात:
पोटा संबंधीत तक्रारी दूर करण्यासाठी दही व केळे मिक्स करून सेवन करा. त्यामुळे पोटाच्या तक्रारी दूर होऊन ब्लड प्रेशर कंट्रोल राहते.
2. हाडातील कैल्शियम साठी फायदेमंद:
केळ्यामध्ये इनुलिन नावाचे फाइबर व दहयामधील चांगले बैक्टीरिया सपोर्ट करते त्याने हाडामध्ये कैल्शियम चांगले शोषले जाते.
3. पोट साफ होण्यास मदत म्हणजेच बद्धकोष्ठतेच्या (Constipation) समस्या कमी होतात:
पोट साफ होत नाही त्यामुळे आपल्याला पूर्ण दिवस बेचैन वाटते. तर त्यासाठी केळी, दही व किसमिस मिक्स करून सेवन करावे. त्याच्या सेवनाने नक्की फायदा होईल.
4. शरीराला इंस्टेंट एनर्जी मिळण्यासाठी फायदेमंद:
काही वेळेस कोणतेसुद्धा काम करताना थकल्या सारखे वाटते. व काम करण्यास उत्साह वाटत नाही. त्यासाठी केळे व दही मिक्स करून सेवन करावे त्यामुळे इंस्टेंट एनर्जी मिळते. हे आपण सकाळी ब्रेकफास्टमध्ये सेवन केले तर जास्त फायदेमंद होते.
5. शरीराचे वजन कमी करण्यासाठी:
आपल्या शरीराचे वाढलेले वजन कमी करण्यासाठी सकाळी ब्रेकफास्टमध्ये केळे व दही मिक्स करून खावे कारण की त्याच्यामध्ये फायबर आहे त्यामुळे पोट भरून लवकर भूक लागत नाही.
6. हृदया संबंधित तक्रारी दूर होतात:
दही व केळे सेवन केल्याने फॅट बर्न होतात व कॉलेस्टॉल कमी होऊन हृदया संबंधित तक्रारी दूर होतात
(डिस्केलमर: ह्या लेखामध्ये दिलेली माहिती सामान्य माहिती करीत दिलेली आहे हा एक्स्पर्ट व्यक्तीचा लेख नाही)