डिलीशियस झटपट शेवयांची बर्फी गणपतीसाठी खिरापत
आपण नेहमी सणवाराला किंवा इतर दिवशी शेवयाची खीर बनवतो किंवा शेवया वापरुन शीरखुरमा बनवतो. पण आपण कधी शेवयाची बर्फी बनवली आहेका? शेवयाची बर्फी बनवायला अगदी सोपी व झटपट होणारी आहे. भाजलेल्या शेवया आपल्याला बाजारात अगदी सहजपणे उपलब्ध होतात.
शेवयाची बर्फी ही अगदी निराळी व स्वादिष्ट बर्फी आहे. आपण कोणी पाहुणे येणार किंवा झटपट स्वीट डिश बनयायची असेलतर नक्की बनवून बघा. शेवयाची बर्फी बनवताना शेवया, दूध, साखर व ड्राय फ्रूट वापरले आहेत.
The Marathi Sewai Barfi Semiya Burfi Vermicelli Barfi can of be seen on our YouTube Channel of Delicious Sewai Barfi Semiya Burfi Vermicelli Barfi For Ganesh Chaturthi
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 4 जाणसाठी
साहीत्य:
50 ग्राम बारीक शेवया (भाजलेल्या)
1 टे स्पून तूप
1/2 लिटर दूध
½ कप साखर
¼ कप डेसिकेटेड कोकनट
2 टे स्पून मिल्क पाऊडर
½ टी स्पून वेलची पावडर
6-7 बदाम व पिस्ता (तुकडे करून)
1 टी स्पून पिठीसाखर
कृती: शेवया थोड्या कुस्करून घ्या. ड्राय फ्रूटचे तुकडे करून घ्या. एका पॅनमध्ये तूप गरम करून कुस्करलेल्या शेवया घालून 2 मिनिट भाजून बाजूला ठेवा. मग 1 मिनिट डेसिकेटेड कोकनट भाजून बाजूला ठेवा.
पॅनमध्ये दूध गरम करून 5-7 मिनिट उकळवून घ्या. मग त्यामध्ये साखर घालून 3-4 मिनिट उकळवून घ्या. आता त्यामध्ये भाजलेल्या शेवया व डेसिकेटेड कोकनट घालून मिक्स करून थोडे घट्ट होई पर्यन्त आटवून घ्या. मग त्यामध्ये मिल्क पाऊडर व वेलची पावडर घालून मिक्स करून विस्तव बंद करा.
एका स्टीलच्या प्लेटला किंवा ट्रेला तूप लावून त्यामध्ये मिश्रण काढून घ्या. मग एकसारखे थापुन घेऊन वरतून ड्राय फ्रूटने सजवून थंड झाल्यावर वड्या कापून घ्या. मग डब्यात भरून ठेवा.
टीप: ह्या वड्या लवकर संपवाव्या.