पावसाच्या सीजनमध्ये फल व भाज्या लवकर खराब होतात त्यासाठी काही महत्वाच्या सोप्या टिप्स त्याने १० दिवस चांगले राहू शकतात
पावसाच्या सीजनमध्ये फल व भाज्या लवकर खराब होतात कारणकी त्याच्यामधे ओलावा असतो म्हणून त्या जास्त दिवस टिकुन रहात नाहीत. त्यामुळे त्यांना जास्त दिवस ठेवता येत नाहीत. तसेच रोज रोज बाजारात जाऊन फळे व भाज्या आणायाल वेळ नाही व जाऊ सुद्धा शकत नाही. आता महामारीचा बाहेर धोका सुद्धा आहे त्यासाठी आपण 8 दिवसाच्या भाज्या किंवा फळे आणून ठेवतो किंवा ऑफिस व घरकाम करणाऱ्या महिलाना सारखे बाजारात जायला जमत नाही. त्यासाठी आज काही खास सोप्या किचन टिप्स व ट्रिक्स सांगत आहे.
The Marathi How To Store Vegetables And Fruits Fresh in Rainy Season can of be seen on our YouTube Channel of How To Store Vegetables And Fruits Fresh in Rainy Season
टिशू पेपरचा उपयोग करा:
पावासाळ्याच्या सीझनमद्धे हिरव्या पालेभाज्या स्टोर करणे फार मुश्किल होते. कारणकी त्याच्यामध्ये पाण्याचा अंश असतो त्यामुळे त्या सडून जातात व जास्त दिवस स्टोर करू शकत नाही. त्या जास्त दिवस राहाव्यात ह्यासाठी त्या स्वच्छ धुवून पाणी पूर्ण निथळून गेल्यावर टिशू पेपरमध्ये गुंडाळून ठेवाव्या. आपण किचन रोलचा सुद्धा वापर करू शकता. त्यामुळे पाणी शोषले जाऊन भाज्या जास्त दिवस चांगल्या राहू शकतात.
वेनिगरचा प्रयोग करून पहा:
पावसाळ्याच्या सीझनमध्ये फळांवर बैक्टीरिया असण्याचा संभव असतो. म्हणून त्या स्टोर करण्यापूर्वी एक बाउलमध्ये अगदी थोडेसे कोमट पाणी घेऊन त्यामध्ये एक झाकण भरून विनिगर घालून त्यामध्ये फळ 10 मिनिट तशीच ठेवून मग साफ पाण्यानी धुवून पुसून ठेवा.
थंड ठिकाणी स्टोर करा:
बटाटे, सफरचंद किंवा नाशपती ह्या सारखी फळे किंवा फळभाज्या हवेशीर टोपलीमध्ये ठेवावी किंवा थंड व कोरड्या ठिकाणी ठेवावे. बटाटे व सफरचंद जवळ जवळ ठेवले तर बटाट्याला लवकर मोड येत नाहीत.
ओल्या कापडात गुंडाळून ठेवा:
सॅलड बनवण्यासाठी आपण काकडी, मुळा, गाजर, बीटरूट आणून ठेवतो तर ह्याला जास्त दिवस फ्रेश ठेवण्यासाठी ओलसर टॉवेल किंवा ओलसर कापडामध्ये गुंडाळून फ्रीजमद्धे ठेवा. त्यामुळे त्याच्या मध्ये हवा राहील व ते जास्त दिवस फ्रेश राहतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की दर दोन दिवस झालीकी सेम अश्याच पद्धतीचा अवलंब करा.
प्लास्टिक रैपर व स्टीमर चा उपयोग करा:
आपण केली आणतो पण ती लगेच काळी पडतात व त्याच्या साला मधून प्राकृतिक एथलीन गॅस सोडला जातो त्यामुळे केळे लवकर पिकते व काळे पडते. केळ्याना जास्त दिवस चांगले ठेवण्यासाठी त्याच्या वरच्या भागाला प्लॅस्टिकने झाकून ठेवावे.
कांदा व लसूण सुरक्षित ठेवण्यासाठी बांबूच्या टोपलीत ठेवावे म्हणजे त्याला सगळ्या बाजूनी हवा लगेल व त्याला मोड येणार नाहीत.
आपण भाज्या फ्रीजमद्धे ठेवतो तेव्हा त्या पेपेर किंवा प्लॅस्टिक मध्ये ठेवाव्या व खालच्या बाजूस ट्रे असतो त्यामध्ये ठेवाव्या म्हणजे त्याला एकसारखे तापमान राहून भाज्या जास्त दिवस टिकलीत भाज्याकधीसुद्धा फ्रीजच्या दरवाजाच्या जागी ठेवू नये करणकी त्याठिकाणी जास्त थंड तापमान असते
मांसाहारी पदार्थ फ्रीजमद्धे ठेवण्याच्या आयवजी फ्रीजर मध्ये ठेवावे कारणकी आपण फ्रीजचा दरवाजा सारखा उघडत असतो त्यामुळे त्या जागेचे तापमान सारखे वरखाली होऊन खराब होण्याचा संभव असतो.