राखी नारळी पूर्णिमा स्पेशल 7 मिनिटांत इन्स्टंट झटपट नारळाचे मोदक बिना गॅस मावा किंवा साखरेचा पाक
राखी पूर्णिमा किंवा नारळी पूर्णिमा म्हणजे नारळ वापरुन आपण पदार्थ बनवतो कारण ह्या दिवशी नाराळच्या पदार्थला जास्त महत्व असते. आपण डेसिकेटेड कोकनट वापरुन इन्स्टंट म्हणजे झटपट 7 मिनिटात मिठाई बनवू शकतो. ही मिठाई बनवायला अगदी सोपी व झटपट होणारी आहे.
The Marathi Instant Zatpat Coconut Modak or Mithai Without Gas, Mawa or Syrup In 7 Minutes can of be seen on our YouTube Channel of Instant Coconut Modak or Mithai Without Gas, Mawa or Syrup In 7 Minutes
तसेच आपण अश्या प्रकारची मिठाई बनवताना त्याचे गणपती बाप्पाच्या आरती नंतर खिरापत म्हणून अश्या प्रकारचे मोदक सुद्धा बनवू शकतो.
डेसिकेटेड कोकनट वापरुन आपण बिना विस्तव तसेच बिना मावा किंवा बिना साखरेचा पाक न बनवता आपण मिठाई किंवा मोदक बनवू शकतो.
बनवण्यासाठी वेळ: 7 मिनिट
वाढणी: 11 मोदक/वड्या बनतात
साहीत्य:
1 कप डेसिकेटेड कोकनट
½ कप मिल्क पाऊडर
2 टे स्पून दूध
2 टे स्पून पिठीसाखर
½ टी स्पून वेलची पाउडर
1 टे स्पून टूटी-फ्रूटी
7-8 केसर काड्या
कृती: प्रथम केसर एक चमचा दुधामद्धे भिजत ठेवा. एका बाउलमध्ये डेसिकेटेड कोकनट, मिल्क पाऊडर, पिठीसाखर, वेलची पावडर, टूटी-फ्रूटी, केसर दूध घालून मिक्स करून मग अजून एक टे स्पून दूध घालून मिश्रण चांगले मळून घ्या.
मिश्रणाचे दोन भाग करून एक भाग घेऊन त्याचा गोल किंवा चौकोनी रोल बनवून घ्या. मग फॉईल पेपरमध्ये किंवा प्लॅस्टिक पेपर मध्ये घट्ट रोल करून फ्रीजरमध्ये 10 मिनिट ठेवा. 10 मिनिट झाल्यावर प्लॅस्टिक पेपर किंवा फॉईल पेपर काढून त्याचे एक सारखे तुकडे कापून घ्या.
दूसरा भाग घेऊन त्याचे एक सारखे 5 गोळे बनवून त्याला मोदकाचा आकार द्या. मग सर्व्ह करा.