महाराष्ट्रियन कोकणी पद्धतीने खमंग भरलेली मसाला भेंडी मुलांसाठी
भेंडीची भाजी सर्वाना आवडते. लहान असो किंवा मोठे सर्वजण भेंडीची भाजी आवडीने खातात. आपण भेंडीची भाजी निरनिराळ्या पद्धतीने बनवू शकतो. कोकणी पद्धतीने भरलेली भेंडीची भाजी मस्त खमंग लागते.
कोकणी पद्धतीने भाजी म्हणजे त्यमध्ये नारळ हवाच. अश्या प्रकारची भेंडीची भाजी बनवताना ओला नारळ, आल-लसूण-हिरवी मिरची व कोथिंबीर वापरली आहे. त्यामुळे भाजी खूप खमंग लागते. आपण चपाती बरोबर किंवा भाकरी किंवा पराठा बरोबर सर्व्ह शकतो.
भरलेली मसाला भेंडी आपण मुलांना डब्यात पण देऊ शकतात.
The Marathi Maharashtrian Kokani Style Stuffed Masala Bhindi can of be seen on our YouTube Channel of Kokani Bharleli Masala Bhindi
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 जाणसाठी
साहीत्य:
200 ग्राम भेंडी (कोवळी)
मीठ चवीने
मसाला करीत:
1 छोटी वाटी ओला नारळ
2 हिरव्या मिरच्या
7-8 लसूण पाकळ्या
½” आले तुकडा
मीठ चवीने
फोडणी करिता:
1 टे स्पून तेल
1 टी स्पून मोहरी
1 टी स्पून जिरे
¼ टी स्पून हळद
¼ टी स्पून हिंग
7-8 कडीपत्ता पाने
कृती:
प्रथम भेंडी धुवून, पुसून त्याचे देठ कापून घ्या. मग एका भेंडीचे 3 तुकडे कापून वरच्या बाजूनी अधिक चिन्हच्या आकाराची चीर द्या म्हणजे आपल्याला तेथे मसाला भरता येईल. चिरलेली भेंडी बाजूला ठेवा.
मिक्सरच्या भांड्यात ओला नारळ, कोथिंबीर, आल-लसूण-कोथिंबीर थोडेसे जाडसर वाटून घ्या. मग वाटलेला मसाला थोडा थोडा जेथे चीर दिली आहे तेथे भरा. भेंडीमध्ये मसाला भरून झाल्यावर बाजूला ठेवा.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे,हिंग, हळद व कडीपत्ता घालून घालून मसाला भरलेली भेंडी घालून मिक्स करा. फक्त 2 मिनिट झाकण ठेवा व काढा. आता भेंडी मंद विस्तवावर परतून घ्या. छान खमंग अशी परतून झालीकी विस्तव बंद करून बाउलमध्ये काढून घ्या.
गरम गरम मसाला भेंडी चपाती बरोबर सर्व्ह करा.