नाग पंचमी महत्व मुहूर्त पूजाविधी व कहाणी
श्रावण महिना शंकर भगवानच्या भक्तासाठी अगदी खास असतो. ह्याच महिन्यात नाग पंचमी हा सण मानला जातो. ह्या दिवशी नाग दिवताची विशेष पूजा केली जाते.
The Marathi Nag Panchami 2021 Importance Muhurat Puja Vidhi & Katha can of be seen on our YouTube Channel of Nag Panchami Importance Muhurat Puja Vidhi & Katha
नाग पंचमी हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्ष पंचमी ह्या दिवशी साजरा करतात. ह्या दिवशी नागाची पूजा महत्व पूर्ण आहे. ह्या वर्षी 13 ऑगस्ट 2021 शुक्रवार ह्या दिवशी नागपंचमी हा सण आहे. नाग पंचमी हा सण महिलांचा अगदी आवडतीचा सण त्यादिवशी महिला नटून थटून नागाच्या वारुळावर पूजा करायला जातात.
नाग पंचमी महत्व:
नाग पंचमी ह्या दिवशी धन समृद्धी मिळण्यासाठी पूजा केली जाते. धार्मिक कारण असे आहे व नाग देवता माता लक्ष्मीची रक्षा करतात. नाग पंचमी ह्या दिवशी नाग देवताची विधी पूर्वक पूजा केल्यास आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्याच बरोबर ज्यांच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष आहे त्यांनी त्यासाठी ह्या दिवशी पूजा अर्चा व उपवास करावा म्हणजे त्याचा दोष कमी होतो. ज्यांच्या स्वप्नात नाग येतात त्यांची ह्या दिवशी नाग दवताची जरूर पूजा करावी. म्हणजे भीती सुद्धा दूर होते. धार्मिक शास्त्रा नुसार ह्या दिवशी 12 नागाची पूजा करतात.
नाग पंचमी पूजाविधी:
1. ज्योतिष शास्त्रानुसार पंचम तिथीचे स्वामी नाग देवता आहेत. ह्या दिवशी अष्ट नागानची पूजा करतात.
2. अष्टनागानची नाव – अनन्त, वासुकि, पद्म, महापद्म, तक्षक, कुलीर, कर्कट व शंख आहे.
3. ह्या दिवशी जर उपवास करायचा असेलतर आधल्या दिवशी म्हणजेच चतुर्थीच्या दिवशी एकदाच जेवण करावे मग नाग पंचमीह्या दिवशी उपवास करून संध्याकाळी उपवास सोडावा.
4. नाग देवताची पूजा करण्यासाठी लाकडी पाटावर मूर्ती किंवा फोटो ठेवावा मग पूजा करावी.
5. नागाच्या मूर्ती किवा फोटोवर हळद, कुंकू, अक्षता, फूल अर्पित कराव. मग कच्चे दूध, तूप, साखर मिक्स करून नाग मूर्ती किंवा फोटो समोर अर्पित करावे.
6. नाग देवाची पूजा झाल्यावर आरती उतरवली जाते.
7. मग नाग देवाची कथा आईकतात.
8. बरेच लोक शिव मंदिरमध्ये जाऊन नाग देवताची पूजा करतात.
नाग पंचमी पूजा मुहूर्त :
05:48:49 पासून 08:27:36 पर्यन्त पूजा काळ: 2 तास 38 मिनट
नाग देवाची कथा किंवा कहाणी:
कथा प्राचीन काळाची आहे. एक शेटजी होते त्यांना 7 पुत्र होते. सातीजणाचे विवाह झाले होते. सर्वात लहान मुलाची पत्नी ही हुशार व सुशील होती पण तिला भाऊ नव्हता.
एक दिवशी मोठ्या सुनेने सर्वाना म्हणजे बाकी सुनाना पिवळी माती आणायला जायचे आहे असे सांगितले मग सर्वजणी खुरप व घमेल घेऊन निघाल्या मिती आणायला मग त्या खुरपीने खणत होत्या तेव्हा तेथे एक साप निघाला मग मोठी सून खुरपनिच्या साहयानी सापाला मारू लागली तेव्हा सर्वात लहान सांगितले त्याला मारू नका तो बिचार निरपराध आहे. हे आइकून मोठ्या सुनेने सापाला मारले नाही. मग साप एका जागी जाऊन बसला. तेव्हा छोट्या सुनेने त्याला सांगितले तू येथेच बस आम्ही परत येतो. असे सांगून सर्व जणी घरी निघून गेल्या व घरकामात विसरून गेल्या की त्यांनी सापाला सांगितले होत आम्ही परत येतो.
मग दुसऱ्या दिवशी त्यांना ते आठवले मग त्या सर्व जणी सापा जेथे बसायला सांगितले होते तेथे गेल्या साप तसाच तेथे बसून होता मग छोट्या सुनेने साप भाऊ नमस्कार असे म्हंटल्यावर साप म्हणाला तू मला भाऊ म्हंटले आहे म्हणून तुझी चूक माफ करतो. नाहीतर तुला मी चांगलेच घबरवले असते. तेव्हा तिने माफी मागितली तेव्हा साप म्हणाला आज पासून आपण बहीण भाऊ मग ती म्हणाली मला कोणी नाही बरे झाले मला भाऊ मिळाला.
असेच काही दिवस गेल्यावर तो साप माणसाचे रूप घेऊन तिच्या घरी आला व म्हणाला माझ्या बहिणीला पाठवा. त्या म्हणाल्या हिचा तिचा तर कोणी भाऊ नाही. मग साप म्हणाला मी तिचा लांबचा भाऊ आहे मी लहान पाणीच घर सोडून गेलो होतो. त्यावर विश्वास ठेवून त्यांनी लहान सुनेला त्याच्या बरोबर पाठवले तेव्हा वाटेत साप म्हणाला मी तोच साप आहे ज्याला तू भाऊ मानले आहे. तेव्हा तो म्हणाला तू माझ्या बरोबर चल जेथे तुला रस्ता कठीण वाटेल व भीती वाटेल तेथे माझी तू शेपटी पकड तिने तसेच केले व ते त्याच्या घरात पोहचले तेथील धन-ऐश्वर्य पाहून ती अगदी चकित झाली.
एके दिवशी सापाच्या आईने तिला सांगितले की तू भावाला थंड दूध दे व ती बाहेर निघून गेली. तिच्या ते लक्षात आले नाही व तिने गरम दूध दिले व त्याचे तोंड गरम दुधानी चांगलेच भाजले. ते पाहून सापाची आई खूप चिडली पण सापाच्या सांगण्या नुसार ती शांत झाली. मग साप म्हणाला की तिला आता तिच्या घरी सोडले पाहिजे. सापाच्या वडिलांनी तिला खूप सारे दाग दागिने सोन नाण देऊन घरी सोडले.
धन पाहून मोठी सून म्हणली तुझा भाऊ बराच धनवान दिसत आहे. हे आइकून त्याने अजून धन आणून दिले तिने झाडू पान सोन्याचा मागितला तो सुद्धा तिला मिळाला.
सापानि बहिणीला एक अद्भुत हार दिला होता. त्याची स्तुति तेथील राणीने आईकली होती तेव्हा तिने राजाला सांगून प्रधान मंत्रीला तो हार आणायला सांगितला. मंत्री शेटजीकडे हार आणायला गेला तेव्हा शेटजीने तो हार दिला.
छोट्या सुनेला खूप वाईट वाटले ती भावाला झालेली सर्व घटना सांगितली. तिने त्याला सांगितले की जेव्हा राणी तो हार गळ्यात घालील तेव्हा तू साप बनव व जेव्हा ती तो हार परत करील तेव्हा तो परत हीरे माणिक असलेला बनव अगदी तसेच झाले
मग राजानि शेटजीला सांगून छोट्या सुनेला बोलावले तेव्हा तिला म्हणला की तू कसली जादू केली मी तुला शिक्षा देईन. तेव्हा तिने राजाला सांगितले की तो हारच असा आहे मी गळ्यात घातला तर तो हीरे माणकाचा होतो व दुसऱ्यानी घातला तर तो साप बनतो. मग तिने तो हार गळ्यात घातला तर तो हीरे माणिकचा हार बनला. तेव्हा राजानि हार परत दिल व त्याच बरोबर अजून धन दिले. ते पाहून मोठी सूनेल जळफळाट झाला तिने आपल्या नवऱ्याला हे सर्व सांगितले व तिला विचारले हे सर्व धन कुठून आणले. मग त्याच वेळी साप तेथे प्रकट झाला व म्हणला जर माझ्या बहिणीला कोणी त्रास दिल तर मी त्यांना खाऊन टाकीन. हे सर्व पाहून छोट्या सुनेचे पती प्रसन्न झाले व त्यांनी सापाचे आदरातिथ्य केले त्या दिवसा पासून नाग पंचमी हा दिवस साजरा केला जातो. व स्त्रिया सापाला आपला भाऊ मानतात.