राखी/नारळी पूर्णिमा स्पेशल कोकणी पद्धतीने ओल्या नारळाची पुरणपोळी
राखी पूर्णिमा किंवा नारळी पूर्णिमा ह्या दिवशी देवाला नेवेद्य नारळ वापरुनच बनवला जातो. म आपण नारळाच्या वड्या किंवा रवा नारळ लाडू किंवा नारळी भात बनवतो. कोकणामध्ये नारळ हा प्रेतक पदार्थमध्ये वापरला जातो.
The Marathi Olya Naralachi Puran poli can of be seen on our YouTube Channel of Olya Naralachi Puran poli Rakhi/Narali Pornima Special
आपण पुराण पोळी बनवतो तेव्हा पारंपारिक पद्धतीने चनाडाळ किंवा तुरीची डाळ वापरतो. पण आपण ओला नारळ वापरुन पुरपोळी बनवली आहे का? ओल्या नारळाची पुरपोळी खूप छान लागते. बनवायला अगदी सोपी व झटपट होणारी आहे.
ओल्या नारळाची पुरपोळी बनवताना ओला नारळ व गूळ वापरला आहे. ह्या राखी पूर्णिमेल किंवा नारळी पूर्णिमेल बनवून पहा नक्की आवडेल.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 8 पोळ्या बनतात
साहीत्य: आवरणसाठी:
2 कप गव्हाचे पीठ
¼ टी स्पून हळद
1 टे स्पून मैदा
मीठ चवीने
1 टे स्पून तेल
सारणासाठी:
2 कप ओला नारळ
½ कप गूळ (आपल्याला पाहिजे असेलतर अजून)
½ टी स्पून वेलची पावडर
2 टे स्पून मिल्क पावडर
तूप पोळीला वरतून लावण्यासाठी
कृती: आवरणासाठी: एका बाउलमध्ये गव्हाचे पीठ, मैदा, मीठ व पाणी मिक्स करून घट्ट पीठ मळून घ्या मग वरतून तेल लावून मळून झाकून ठेवा.
सारणासाठी: नारळ खोवून घ्या. गूळ किसून किंवा चिरून घ्या. पॅन गरम करायला ठेवा. त्यामध्ये गूळ व ¼ कप पाणी घालून मिक्स करा. मग गूळ पूर्ण विरघळला व त्याला चांगली उकळी आली की त्यामध्ये खोवलेला नारळ घालून मिक्स करून मिश्रण थोडे घट्टसर आटवून घ्या. मग त्यामध्ये मिल्क पावडर व वेलची पावडर घालून मिक्स करून घ्या. आता विस्तव बंद करून मिश्रण थंड करायला ठेवा.
पुरणपोळी करण्यासाठी: मळलेल्या पिठाचे एकसारखे 8 गोळे बनवा. तसेच नारळाच्या सारणाचे एकसारखे 8 गोळे बनवा. पिठाचा एक गोळा घेऊन पुरीच्या मापाचा गोळा लाटून घ्या. त्यावर ओल्या नारळाचा गोळा ठेवून पुरी मुडपून पोळी लाटून घ्या.
तवा गरम झालकी त्यावर पोळी छान खमंग भाजून घ्या. अश्या प्रकारे सर्व पोळ्या लाटून भाजून घ्या.
गरम गरम पोळी सर्व्ह करताना वरतून तूप घालून सर्व्ह करा.