पंजाबची प्रसिद्ध डोडा बर्फी बिना मावा बिना पनीर
डोडा मिठाई ही पंजाबी लोकांची लोकप्रिय मिठाई आहे. खर म्हणजे ही मिठाई बनवण्यासाठी बरेच कष्ट लागतात कारण की अगोदर गहू भिजवून त्याला चांगले मोड आणावे लागतात. मग ते वाटून चांगले तुपामध्ये भाजवे लागते. त्यासाठी बरीच मेहनत व वेळ लागतो. डोडा बर्फी आपण सणवार ह्या दिवशी किंवा इतर दिवशी सुद्धा बनवू शकतो. बनवायला अगदी सोपी व झटपट होणारी आहे.
The Marathi Doda Barfi Dodha Mithai can of be seen on our YouTube Channel of Punjabi Doda Barfi Dodha Mithai Most Popular Without Mawa Paneer
आज आपण पंजाबी लोकनची डोडा मिठीई अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत त्यासाठी आपण इन्स्टंट प्रोसेस वापरणार आहोत. त्यामुळे त्याला जास्त वेळ लागत नाही व झटपट मिठाई बनते. तसेच बिना मावा बिना पनीर आपण ही मिठाई बनवणार आहोत.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4-6 जाणसाठी
साहीत्य:
½ लिटर दूध
1 वाटी (मध्यम आकाराची) दलिया
½ वाटी साखर
4 टे स्पून तूप
2 टे स्पून दही
2 टे स्पून कोको पावडर
½ टी स्पून वेलची पावडर
¼ वाटी डेसिकेटेड कोकनट
ड्रायफ्रूट तुकडे करून
कृती: प्रथम दूध गरम करून घ्या. ड्रायफ्रूटचे तुकडे करून घ्या. कोको पावडर ¼ क दुधात मिक्स करून घ्या.
एका पॅनमध्ये 1 टे स्पून तूप गरम करून त्यामध्ये दलिया 5 मिनिट मंद विस्तवावर भाजून घ्या. मग त्यामध्ये गरम केलेले दूध घालून मिक्स करून मंद विस्तवावर आटवून घ्या. मिश्रण घट्ट झालेकी त्यामध्ये दही घालून मिक्स करून 2 मिनिट गरम करून मग त्यामध्ये साखर घाला. साखर विरघळून मिश्रण घट्ट झालेकी त्यामध्ये कोको पावडर व वेलची पावडर घालून मिक्स करून मिश्रण तूप सुटे पर्यन्त आटवून घ्या. मग त्यामध्ये थोडे ड्रायफ्रूटचे तुकडे घालून मिक्स करून घ्या. मग विस्तव बंद करून मिश्रण थोडे थंड होउ द्या.
एका स्टीलच्या ट्रेला बटर पेपर लाऊन त्यामध्ये मिश्रण काढून एक सारखे थापून वरतून ड्रायफ्रूट ने सजवून सेट करायला ठेवा. नंतर त्याचे पिसेस कट करून सर्व्ह करा.