कृष्ण जन्माष्टमी स्पेशल मखाने बर्फी
कृष्ण जन्माष्टमी स्पेशल मखाने बर्फी नेवेद्य साठी आपण बनवू शकतो. मखाने बर्फी बनवायला अगदी सोपी आहे तसेच झटपट होणारी आहे.
तसेच मखाने आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहेत. त्याचे गुणधर्म आपल्या आरोग्यासाठी फायदेमंद आहेत. मखाने म्हणजे कमळाचे बी आहे. मखाने मध्ये पौस्टिकतेचे भरपूर गुण आहेत. मखाने मध्ये प्रोटीन, कैल्शियम, पोटेशियम, फास्फोरस, आयर्न, केरोटीन, विटामिन बी-१, वसा, खनिज तत्व व सोडियम च्या बरोबर ते एंटीऑक्सीडेंट़् आहे. त्याच्या मुळे ते आपल्या आरोग्यासाठी गुणकारी आहे व ते आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवते. ह्यामध्ये असे काही औषधी गुणधर्म आहेत की ते आपल्या पचनशक्ती पासून किडनीचे रोग सुद्धा दूर करते. आपल्या इथे भारतात उपासाच्या दिवशी खाण्याची प्रथा आहे.
The Marathi Shri Krishna Janmashtami Special Makhana Burfi can of be seen on our YouTube Channel of Shri Krishna Janmashtami Special Makhana Barfi
आपण मखाने बर्फी इतर वेळी सुद्धा बनवू शकतो. किंवा सणावाराला सुद्धा बनवू शकतो.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 3 जणसाठी
साहीत्य:
50 ग्राम मखाने
¼ कप काजू
½ कप डेसिकेटेड कोकनट
½ लिटर दूध
¾ कप साखर
½ टी स्पून वेलची पावडर
1 टे स्पून तूप
ड्राय फ्रूट सजावटीसाठी
कृती: एका कढईमध्ये मखाने 2 मिनिट मंद विस्तवावर गरम करून घ्या म्हणजे मखाने छान कुरकुरीत होतील. मग मखाने बाजूला एका प्लेट मध्ये काढून ठेवा. त्याच कढईमध्ये काजू गरम करून बाजूला काढून ठेवा. त्यानंतर डेसिकेटेड कोकनट एक मिनिट परतून बाजूला काढून ठेवा. त्यानंतर मखाने व काजू मिक्सरमध्ये थोडे जाडसर ग्राइंड करून घ्या.
पॅन गरम करायला ठेवा त्यामध्ये दूध गरम करून 5-7 मिनिट थोडे आटवून घ्या. मग त्यामध्ये साखर घालून मिक्स करून 2 मिनिट गरम करून त्यामध्ये ग्राइंड केलेली मखाने पावडर व डेसिकेटेड कोकनट घालून वेलची पावडर घालून मिक्स करून थोडे घट्ट होई पर्यन्त आटवून घ्या. मग त्यामध्ये 1 टे स्पून तूप घालून मिक्स करून घ्या. आता विस्तव बंद करा.
पोळपाटाला थोडसे तूप लाऊन घ्या. मग त्यावर मिश्रण काढून एक सारखे थापुन घेऊन त्यावर ड्रायफ्रूटन सजवून मग त्याच्या वड्या कापून देवाला नेवेद्य दाखऊन मग सर्व्ह करा.