कपड्यांवरचे अंडरआर्म्सचे डाग कसे काढायचे 5 सटीक उपाय
शरीरातील घाम, डियोड्रेंट, एलर्जीच्यामुळे कपड्यांवर घामाचे डाग पडतात विशेष म्हणजे आपल्या काखेत किंवा गळा, मान किंवा मनगट. आपल्या कपड्यांचा रंग अंडरआर्म्सच्या ठिकाणी बदलतो. पांढऱ्या कपड्यांवर किंवा लाइट कपड्यांवर घामाचे पिवळे डाग पडतात.
The Marathi 5 Simple But Powerful Ways to Remove Sweat Stains From Clothes can of be seen on our YouTube Channel of How to remove sweat stains from clothes
कपड्यांवर अश्या प्रकारचे डाग पडले तर ते काढणे मुश्किल होते. अश्या डागानमुळे आपले डेलिकेट कपडे सांभाळणे मुश्किल होते. अश्या परिस्थितित कपडे सारखे धुवून खराब होण्याचा संभव असतो तसेच एका धुण्यात अश्या प्रकारचे डाग काढणे शक्य होत नाही. जर आपल्याला कपड्यावरील डाग दिसले तर लगेच आपण काही टिप्स वापरुन डाग काढू शकता. त्याच बरोबर आपले महागाचे कपड्यांचे शाईनसुद्धा वाचवू शकता.
आज आम्ही येथे काही टिप्स व हैक्स सांगणार आहोत त्यामुळे अश्या प्रकारचे डाग पडणे कमी होईल. हे डाग मिठाच्या मुळे लागतात. म्हणून त्यावर काम करणारे उपाय करायला पाहिजे.
1. हाइड्रोजन पेरोक्साइड (फक्त पांढऱ्या कपड्यांसाठी)
जर आपल्या पांढऱ्या कपड्यांवर अश्या प्रकारचे डाग असतील तर त्यासाठी मेन इंग्रीडिएंट आहे हाइड्रोजन पेरोक्साइड. हाइड्रोजन पेरोक्साइडमध्ये ब्लीचिंग क्वालिटी आहेत त्यामुळे फक्त पांढऱ्या कपड्यांसाठी त्याचा उपयोग केला पाहिजे. बाकीच्या रंगीत कपड्यासाठी ह्याचा वापर केला तर कपड्यांचा रंग जाऊ शकतो.
आपण जर हाइड्रोजन पेरोक्साइडचा वापर करणार असाल तर पाणी व हाइड्रोजन पेरोक्साइड हे सम प्रमाणात घेऊन डाग पडलेल्या भागावर लाऊन थोडावेळ तसेच ठेवा. मग नॉर्मल आपण जसे कपडे धुतो तसे धुवा. आपला डाग निघून जाईन.
2. बेकिंग सोडाचा उपयोग करू शकता:
खर म्हणजे बेकिंग सोडा हा जास्त फायदेमंद आहे. त्याच्या वापरामुळे बऱ्याच प्रकारचे डाग निघून जातात. आपल्या घरात नेहमी बेकिंग सोडा असतो त्यामुळे तो आपण अगदी सहजपणे वापरू शकतो.
बेकिंग सोडा व पाणी 3:1 ह्या रेशोनी घेऊन त्याची पेस्ट बनवून डागावर लाऊन त्यावर जुन्या टूथब्रशच्या सहायानी घासून थोडावेळ तसेच ठेवून मग धुवावे.
3. पांढरे विनिगर –
जसे बेकिंग सोडा आपल्याला घरातील ट्रिक्ससाठी उपयोगी पडतो त्याच प्रमाणे पांढरे विनिगर सुद्धा साफसफाईसाठी उपयोगी आहे. जर आपल्याकडे पांढरे विनिगर असेल तर त्याचा वापर करून आपण पंढऱ्या कपड्यांवरचे डाग काढण्यासाठी सुद्धा उपयोगी आहे. पण लक्षात ठेवा की पांढरे किंवा लाईट कपड्यांवरचे डाग काढण्यासाठीच उपयोग करा. व्हाइट विनिगरचा वापर केला की कपड्याना थोडा वास येतो तर नंतर कपडे फैब्रिक कंडीशनरचा वापर करून धुवावे.
१ कप पाणी व २ चमचे व्हाइट विनिगर मिक्स करून डाग पडलेल्या भगावर लावावे मग अर्धातास कपडे तसेच भिजत ठेवावे मग साफ पाणी वापरुन डिटर्जेंटनी धुवावे.
कपड्यांवरचे घामाचे डाग कसे काढायचे:
अश्या प्रकारे कपडे धुतले तर पक्के झालेले डाग नक्की निघतिल त्यासाठी ४ सोप्या टिप्स आहेत.
4. एस्पिरिन ह्या गोलीचा वापर करा:
एस्पिरिन ही एक अशी औषधाची गोळी आहे त्याच्या वापर डाग काढण्यासाठी करू शकता.
२ एस्पिरिनच्या गोळ्या व १/२ कप कोमट पाणी मिक्स करून २-३ तास कपड्या वरील डाग भिजत ठेवा मग नॉर्मल आपण जसे कपडे धुतो तसे धुवा.
अंडरआर्म्सचे डाग:
5. लिक्विड डिटर्जेंटचा वापर करा-
लिक्विड डिटर्जेंटचा वापर आपण अगदी सहजपणे डाग काढण्यासाठी करू शकता. कारण की डाग काढण्यासाठी हा एक रामबाण उपाय आहे. आपल्याला फक्त वापर करताना थोडासा बदलाव करायचा आहे.
आपल्या कपड्यांचा डाग पडलेल्या जागेवर लिक्विड डिटर्जेंट लावून थोडे घासून घ्या. मग सूर्य प्रकाशात २-३ तास ठेवावे मग स्वच्छ धुवावे. कपड्यावरील डाग निघून जाईन.