होममेड चॉकलेट मोदक | पाईनापल चॉकलेट मोदक | ड्रायफ्रूट चॉकलेट मोदक गणेश चतुर्थी भोग नेवेद्य खिरापत
चॉकलेट ह सर्वाना आवडतात लहान असो वा मोठे सर्व जण आवडीने खातात. गणपती बाप्पाना तर मोदक अतिप्रिय आहेत. गणपती उत्सवमध्ये रोज सकाळी व संध्याकाळी आपण आरती म्हणतो मग आरती झाल्यावर रोज ताजा नेवेद्य किंवा भोग बनवतो. चॉकलेट मोदक बनवून आपण ते नेवेद्य म्हणून दाखवू शकतो.
चॉकलेट मोदक बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहेत. आपण तीन प्रकारे हे मोदक बनवणार आहोत. एक म्हणजे ड्रायफ्रूट चॉकलेट मोदक, दोन लेयरमध्ये चॉकलेट मोदक व तिसरा प्रकार मध्ये पाईनापल चॉकलेट मोदक बनवणार आहोत. तिन्ही प्रकार छान लागतात व आकर्षक दिसतात.
The Ganesh Utsav 2021 Chocolate Modak can of be seen on our YouTube Channel of Chocolate Modak Pineapple Chocolate Modak Dry Fruit Chocolate Modak For Ganesh Chaturthi Bhog
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 25 चॉकलेट बनतात
साहीत्य:
200 ग्राम डार्क कंपाऊंड
100 ग्राम व्हाइट कंपाऊंड
2 टे स्पून काजू बदाम (तुकडे)
2-3 ड्रॉपर्स पाईनापल एसेन्स
2-3 ड्रॉपस ग्रीन कलर
कृती: प्रथम दोन स्टील बाउलमध्ये एक एक कप पाणी गरम करायला ठेवा. त्यामध्ये दुसरे छोटे स्टील भांडे ठेवा. ह्याला डबल बोईलिंग सिस्टम म्हणतात. डार्क चॉकलेट व व्हाइट चॉकलेट दोन्ही चॉकलेट बेसचे तुकडे करून घेऊन गरम करायला ठेवलेल्या छोट्या भांड्यात घाला. चॉकलेट बेस हळू हळू मेल्ट होउ लागेल. मधून मधून चमच्याच्या सहायानी हलवत रहा. बेस हळू हळू मेल्ट लालेत. बेस पूर्ण मेल्ट झाल्यावर विस्तव बंद करून भांडे खाली उतरवून घ्या. मग चमच्याच्या सहायानी मिश्रण हलवत रहा. मिश्रण इतके फेटायचे की ते चमच्यानी ओततान रिबिन सारखे खाली पडले पाहिजे. आपले दोन्ही चॉकलेट बेस आता मोदक बनवायला तयार झाले. आता चॉकलेट मोल्ड घ्या. मोल्ड प्लॅस्टिक किंवा सॉलिकॉन अश्या दोन्ही प्रकारचे मिळतात. त्यातील मोदक शेपचा ट्रे घ्या.
1. पहिला प्रकार ड्रायफ्रूट मोदक: काजू बदाम पिस्तेचे तुकडे करून घ्या. चॉकलेट मोल्डमध्ये थोडे ड्रायफ्रूटचे तुकडे घालून त्यावर चमच्याच्या सहायानी डार्क कंपाऊंड बेस घाला मग ट्रे टॅप करा म्हणजे एक सारखे चॉकलेट बनतील. मग ट्रे फ्रीजरमध्ये 5-7 मिनिट ठेवा. 7 मिनिट झाल्यावर ट्रे बाहेर काढून त्यामधील चॉकलेट मोदक बाहेर काढून तसेच थोडावेळ बाजूला ठेवून प्लेटमध्ये ठेवून गणपती बाप्पाना नेवेद्य दाखवून खिरापत सगळ्याना वाटू शकता.
2. दोन लेअर मोदक: ह्यामध्ये आपण डार्क व व्हाइट दोन्ही चॉकलेट बेस वापरणार आहोत. मोदक mमोल्ड ट्रे मध्ये प्रथम व्हाइट चॉकलेट बेस थोडे घाला मग त्यावरती डार्क चॉकलेट बेस घाला. काही मोदक असे बनवा मग प्रथम डार्क चॉकलेट बेस घाला मग त्यावर व्हाइट चॉकलेट बेस घाला. ट्रे टॅप करा मग ट्रे फ्रीजरमध्ये 5-7 मिनिट ठेवा. 7 मिनिट झाल्यावर ट्रे बाहेर काढून त्यामधील चॉकलेट मोदक बाहेर काढून तसेच थोडावेळ बाजूला ठेवून प्लेटमध्ये ठेवून गणपती बाप्पाना नेवेद्य दाखवून खिरापत सगळ्याना वाटू शकता.
3. पाइनापल मोदक: ह्यामध्ये आपल्याला फक्त व्हाइट चॉकलेट बेस वापरायचा आहे. व्हाइट कंपाऊंड बेसमध्ये 2-3 थेंब हिरवा फूड कलर व 2-3 थेंब पाइनापाल एसेन्स घालून 2-3 वेळा चमच्यानी फिरवा म्हणजे मार्बलसारखा बेस दिसेल. मग चमच्यानी बेस मोल्डमध्ये घालून मग ट्रे फ्रीजरमध्ये 5-7 मिनिट ठेवा. 7 मिनिट झाल्यावर ट्रे बाहेर काढून त्यामधील चॉकलेट मोदक बाहेर काढून तसेच थोडावेळ बाजूला ठेवून प्लेटमध्ये ठेवून गणपती बाप्पाना नेवेद्य दाखवून खिरापत सगळ्याना वाटू शकता.