डिलीशीयस पोहा मोदक बिना मावा बिना साखरेचा पाक गणपती बापांसाठी नेवेद्य भोग खिरापत
आता गणपती उत्सव चालू आहे. तर आपण रोज सकाळी व संध्याकाळी गणपतीची मनोभावे आरती करतो व नेवेद्य म्हणून आपण काही गोड पदार्थ दाखवतो. मोदक हे गणपती बापाह्यांचे आवडतीचे. आपण गणपतीबापांची रोज सकाळ संध्याकाळ आरती म्हणतो. आपण ह्या अगोदर बऱ्याच प्रकारचे मोदक रेसीपी पाहिल्या. आता अजून एक नवीन मोदक चा प्रकार पाहणार आहोत.
The Perfect Pohyache Modak For Ganpati Festival can of be seen on our YouTube Channel of Soft Zatpat Pohyache Modak For Ganeshji Bhog
पोह्याचे मोदक बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहेत. तसेच ते स्वादिष्टपण लागतात. अश्या प्रकारचे मोदक आपण संकष्टी चतुर्थीला किंवा अंगारकी चतुर्थीला सुद्धा बनवू शकतो. दिसायला व चवीला मस्त लागतात.
पोह्याचे मोदक बनवताना आपण जाडे किंवा पातळ कोणतेसुद्धा पोहे वापरू शकतो.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 21 छोटे मोदक
साहित्य:
1 कप पोहे
½ कप गूळ किंवा अजून थोडा वरती जास्त
2 टे स्पून डेसिकेटेड कोकनट
2 टे मिल्क पाऊडर
½ टी स्पून वेलची पावडर
8-10 काजू
1 टे स्पून टूटी फ्रूटी
कृती: प्रथम पोहे निवडून चाळून घ्या. गूळ चिरून घ्या. मग एक पॅन गरम करायला ठेवा व त्यामध्ये पोहे मंद विस्तवावर 5-7 मिनिट कोरडेच भाजून घ्या. मग विस्तव बंद करून पोहे थंड करायला ठेवा.
पोहे थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात भाजलेले पोहे, गूळ, डेसिकेटेड कोकनट, मिल्क पाऊडर. वेलची पावडर, काजी-बदाम, घालून थोडेसे जाडसर वाटून घेऊन बाउलमध्ये काढून घ्या. मग त्यामध्ये तूप घालून थोडेसे दूध, टूटी फ्रूटी घालून मिक्स करून त्याचे छोटे छोटे गोळे बनवून मोदक शाचा मध्ये मोदक बनवून घ्या.
पोह्याचे मोदक झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून गणपती बाप्पान नेवेद्य दाखवून मग प्रसाद वाटा.