यूरिक एसिड वाढले चिंता करू नका ह्या चार गोष्टी टाळा किंवा त्यासाठी सोपे घरगुती उपाय
युरीक एसिड आज कालच्या काळात खूप गंभीर समस्या बनली आहे.त्यामुळे सांधेदुखी व आर्थराइटिस सारख्या परेशानी होतात. तसेच असे लक्षात येते की आपल्याला वेळेवर समजत नाही. त्यासाठी काही घरगुती उपाय आहेत.
The High Uric Acid or Gout Home Remedies can of be seen on our YouTube Channel of High Uric Acid or Gout
आपल्या शरीरातील किडनी जेव्हा नीट काम करीत नाही तेव्हा युरीक अॅसिड च्या समस्या चालू होतात. किडनीचे काम आहे शरीरातील हानिकारक पदार्थ शरीराच्या बाहेर टाकणे. जेव्हा किडनीची हे काम करण्याची क्षमता कमी होते तेव्हा युरीक अॅसिड जमा व्हायला लागते. मग वाढलेले युरीक अॅसिड आपल्या हाडांमद्धे जमा व्हायला लागते. मग आपल्याला युरीक अॅसिडची लक्षण दिसू लागतात.
आपण जेव्हा काही खातो तेव्हा त्यामधून युरीक अॅसिड निर्माण होते मग त्यामधील जास्तचे युरीक अॅसिड किडनीद्वारा फिल्टर होऊन मूत्र मार्गांनी निघून जाते. जर शरीरात युरीक अॅसिड जास्त बनत चालले आहे व ते किडनी द्वारा जात नसेल तर रक्तात ते वाढत जाऊन मग हाडामध्ये जमा व्हायला लागते. मग त्यामुळे गाऊट च्या समस्या होउ लागतात. आपण युरीक अॅसिड चेक करून त्यावर डॉक्टरी सल्ला घेऊन लगेच उपचार करू शकतात.
युरीक अॅसिड वाढण्याची कारणे:
किडनी बरोबर काम करीत नसेल, दारूचे जास्त प्रमाणात सेवन करीत असाल तर, शरीरात आयर्न जास्त प्रमाणात असेलतर, उच्च रक्तदाब, थायरॉईडच्या समस्या, किंवा शरीराचे वजन जास्त असणे.
यूरिक एसिड ट्रीटमेंटसाठी घरगुती उपाय:
रोज सकाळी 2-3 अक्रोडचे सेवन करा. त्याच्या मुळे वाढलेले युरीक एसिड हळू हळू कमी होईल.
हाय फायबर सारखे पदार्थ म्हणजे ओटमिल, दलिया, ब्राऊन राईस ह्याच्या सेवनाने युरीक एसिडची मात्रा एब्जॉर्ब होऊन त्याची लेवल कमी होईल.
बेकिंग सोडाच्या सेवनाने युरीक एसिड कमी होण्यास मदत होईल. त्यासाठी एक ग्लास पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा मिक्स करून त्याचे एकसारखे आठ भाग करून दिवसभरात हे आठ ग्लास पाणी प्या. असे केल्याने युरीक अॅसिडची लेवल कमी होईल. खर म्हणजे
बेकिंग सोडा युरीक असिडचे कण तोंडण्यास मदत करून रक्तात विरघळण्यास मदत करते. पण लक्षात ठेवा बेकिंग सोडा जास्त सेवन केल्यास हाय ब्लड प्रेशर वाढण्याच्या समस्या होउ शकतात.
ओव्याचे सेवन रोज करा त्यामुळे युरीक अॅसिड कमी होते.
विटामीन “C” असणारे पदार्थ जास्तीत जास्त सेवन करा.
सॅलडच्या बरोबर रोज अर्धेतरी लिंबू सेवन करा. त्याच्या व्यतिरिक्त दिवसातून एकदा एक ग्लास लिंबू पाणी सेवन करा.
आपण जर बाहेरचे खाणे जास्त प्रमाणात सेवन करत असाल तर ते थांबवा. तसेच आपल्या आहारामद्धे फळ व भाज्या व त्याच बरोबर फायबर फूड शामील करा.
राजमा, छोले, अरबी, भात, व रेड मिट सेवन करू नका.
रोज सफरचंद सेवन करा त्यामुळे ब्लडमधील युरीक एसिड ची लेवल बरोबर राहील,
युरीक एसिड कमी करण्यासाठी तळलेले पदार्थ किंवा मसालेदार भोजन पासून दूर रहा. तूप व लोणी जास्त सेवन करू नका.
ओमेगा 3 फैटी एसिड सेवन करणे टाळा. तसेच माशाचा जातीमध्ये ट्यूना व सालमन ह्यामध्ये ओमेगा 3 फैटी एसिड ची मात्रा अधिक असते. व त्याचे सेवन केल्यास युरीक अॅसिडचे प्रमाण वाढते.
जर रोज 500 मिलिग्राम विटामीन “C” चे सेवन केले तर युरीक अॅसिड दोन महिन्यात कमी होईल.
रोज 2-3 लिटर पाणी सेवन करावे. जास्ती करून पाणी सेवन केले तर शरीराचे बरेच प्रॉब्लेम कमी होतात. पाणी जास्त सेवन केल्याने शरीरातील टॉक्षीन बाहेर जातात.
युरीक एसिड वाढले आहे तर ह्या गोष्टी सेवन करणे वर्ज करा. दही, डाळ-भात, जंक फूड व नॉनवेज हे पदार्थ जरूर टाळा.